आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेच्या वेगाऐवजी हरित तंत्रज्ञानावर भर हवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिनमध्ये काही महिन्यांपूर्वी रेल्वे क्षेत्रातील सर्वात मोठा व्यापार मेळा भरला होता. यात शून्य कार्बन उत्सर्जन असलेल्या रेल्वेचे सादरीकरण करण्यात आले. हायड्रोजन वायूवर चालणारी ही पहिली ट्रेन असून याद्वारे पर्यावरणास नुकसानदायी ठरणारा कोणताही वायू उत्सर्जित होत नाही.
या ट्रेनमधून फक्त वाफ आणि घन स्वरूपातील पाणी बाहेर फेकले जाते. तसेच ट्रेन चालताना तिचा आवाजही कमी येईल. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच प्रवासी रेल्वे आहे. एल्सटॉम या कंपनीने ही ट्रेन विकसित केली आहे.

या ट्रेनच्या छतावर हायड्रोजनची इंधन टाकी असेल. इंजिनसाठी आवश्यक असलेला हायड्रोजन आणि ऑक्सिजन थेट वातावरणातून मिळेल. या दोन्ही वायूंचे रूपांतर विजेत होते. ही वीज लिथियम बॅटरीमध्ये संग्रहित केली जाईल. कंपनीच्या दाव्याप्रमाणे, ही ट्रेन ताशी ८७ मैल एवढ्या वेगाने धावते. हायड्रोजन साठवण्याची क्षमता एवढी असेल की तेवढ्या साठ्यात ती ४९७ मैलांचा प्रवास करू शकेल. ही ट्रेन कार्बन न्यूट्रल असल्यामुळे वातावरणात कार्बन उत्सर्जन होत नाही. त्यामुळे ती पारंपरिक डिझेल ट्रेनपेक्षा कित्येक पटींनी अधिक टिकाऊ आहे. या ट्रेनमुळे जर्मनीचे जीवाश्म इंधनमुक्त देश होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. यासोबतच जर्मनी स्वीडन, डेन्मार्क, स्कॉटलंड आणि फिनलंडसारख्या स्वच्छ इंधन असलेल्या देशांच्या पंक्तीत सामील होईल. जर्मनीत या ट्रेन डिसेंबर २०१७ पर्यंत धावू लागतील. पुढील महिन्यात नव्याट्रेन प्रायोगिक तत्त्वावर चालवल्या जातील. जर्मनीत सध्या चार हजार रेल्वेचे जाळे आहे.
भारतात ट्रेन हे प्रवासाचे प्रमुख माध्यम आहे. मात्र गेल्या काही वर्षांत रेल्वे यंत्रणा आणि त्यातील सुविधांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले आहे. आता ट्रेनमध्ये अनेक बदलांवर चर्चा सुरू आहे. ट्रेनच्या वेगावर अधिक लक्ष दिले जात आहे. मात्र हे बदल करतानाच आपण अशा प्रकारे पर्यावरणपूरक यंत्रणेवर भर दिल्यास भविष्यातील प्रदूषणाचे संकट टाळता येऊ शकेल.
अपूर्व गौर,२२
आयआयटी, रुरकी
बातम्या आणखी आहेत...