आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवांच्या स्वस्ताईने जागरूकतेवर प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूरसंचार कंपन्यांमध्ये स्वस्तातील सेवा देण्याच्या दृष्टीने झालेली ही पहिलीच मोठी क्रांती असावी. याला टेलिक्रांती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रिलायन्स जिओच्या नित्यनव्या ऑफरमुळे अन्य कंपन्याही याच स्पर्धेत उतरल्या आहेत. बाजारात जेवढी स्पर्धा अधिक, तेवढा ग्राहकांचा फायदा अधिक, हे बाजारवादी अर्थव्यवस्थेचे तत्त्व प्रथमच स्पष्ट रूपाने दिसत आहे. 

पण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिओने स्वस्तातील डाटा आणि फोनकॉलची सुविधा दिली नसती तर तिचे दर आधीप्रमाणेच राहिले असते का? ग्राहक दूरसंचार सेवांबाबत अधिक जागरूक झाले आहेत का? आणखी अशा किती सेवा आहेत, ज्यासाठी जनतेला योग्य दरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात? मग प्रत्येक वस्तूचा योग्य भाव मिळण्यासाठी अशी ऑफर किंवा बाजारात स्पर्धा निर्माण व्हायची वाट पाहायची का? बाजारवादी अर्थव्यवस्थेच्या यशस्वितेसाठी ग्राहक जागरूक असणेही महत्त्वाचे आहे. कारण या व्यवस्थेच योग्य दरासोबतच दर्जाही महत्त्वाचा असतो. 

कोणत्याही व्यवस्थेतील दोन्ही घटक परस्परांवर नियंत्रण ठेवत असतील तेव्हाच ती व्यवस्था यशस्वी होते. वस्तू आणि सेवांचे रास्त दर, उत्तम दर्जा, निवडीसाठी अनेक पर्याय, ग्राहकाची क्षमता आणि आवडीनुसार डिलिव्हरीची सेवा, ग्राहकाचा आदर राखणे तसेच त्याची अस्मिता जपणे ही बाजारवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना आपल्याला यातील काय मिळते, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.  

आजही बाजारात अनेक वस्तूंची मूळ किंमत आणि बाजारातील त्यांची किंमत यात खूप मोठा फरक आहे. अशा वस्तूंची नावे देणे इथे योग्य नाही. मात्र, ग्राहकांनी जागरूक होऊन अशा अवाजवी किमतींविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.
 
- कुलदीप कुमार, १९, एमबीए, महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी, रोहतकू
बातम्या आणखी आहेत...