आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शपथग्रहणापूर्वी ट्रम्प टॉवरमध्ये राजकारणाचा ‘गोंधळ’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सध्याचा काळ हा राजकीय सर्कससारखा झाला आहे. मॅनहॅटन येथील ट्रम्प टॉवरच्या २६ व्या मजल्यावर सध्या एखाद्या बहुप्रतिष्ठित नोकरीसाठी ऑडिशन सुरू असल्याचेच दृश्य पाहायला मिळत आहे. ही नोकरी मिळण्यासाठी रांगेत उभारलेल्यांमध्ये प्रतिभावान आणि हौशी लोकांचाही समावेश आहे. कुणाला ‘यू आर फायर्ड’ म्हटले जात आहे, तर कुणाला ‘यू आर हायर्ड’ असा आदेश मिळत आहे.
ट्रम्प सरकारच्या नव्या टीममध्ये नियुक्त्यांसाठी नेमकी कोणती रणनीती आखण्यात आली आहे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. सध्या तरी ट्रम्प टॉवरमधील ‘ट्रम्प जॉब फेअर’मध्ये स्थान मिळवलेल्यांमध्ये साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली, राजकीय तज्ज्ञ बेट्सी डिवोस आणि कृष्णवर्णीय निवृत्त सर्जन बेन कार्सन यांचा समावेश आहे. या नावांची घोषणाही लवकर केली जाईल. या संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेत कुणाला पारदर्शी धोरण आणि वैचारिक दृष्टिकोनाची अपेक्षा करत असेल तर त्याची घोर निराशा होऊ शकते.

ट्रम्प यांच्या कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती होत आहे, मात्र कागदोपत्री काहीच तयारी नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही देशात नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांकडून आलेली एक यादी तयार असते. प्रत्येक नावावर चर्चा होते. नेत्यांची पात्रता व अनुभव पारखला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या इतिहासानुसार, ते एखाद्या विभागाची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर सोपवण्यापूर्वी तिचा अनुभव आणि प्रादेशिक संतुलन याचा विचार करतात. गेल्या काही वर्षात लिंग आणि जात विविधतेचाही विचार केला जात आहे. ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये निवडलेल्यांना कोणतीही खास ऑर्डर आलेली नाही. परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा विभागासाठी कोणत्या व्यक्तीची निवड करायची यावर ट्रम्प यांची सल्लागारांशी चर्चा सुरू आहे. मात्र ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर त्यांच्या व्यवसायाचा प्रभाव दिसून येईल असा अंदाज आहे. कारण त्यांच्या अनेक व्यावसायिक भागीदारांचे विविध देशांतील सरकारांशी चांगले संबंध आहेत. अमेरिकेनंतर ट्रम्प यांचा कारभार दुबई, मुंबई, पुणे, कॅनडा, ब्रिटन, इंडोनेशिया, पनामा, सॅन दिएगो, इस्तंबूल, इस्रायल आदी ठिकाणी पसरलेला आहे.

ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदासाठी लेफ्टनंट जनरल मायकल प्लेन आणि सेंट्रल इंटेलिजन्सच्या संचालकपदासाठी माइक पोम्पेओ ही नावे वरील स्थानी आहेत. या दोन्ही पदांची नावे निश्चित करण्यासाठी कोणताही वैचारिक दृष्टिकोन नसल्याचेच दिसून येते. स्टीफन बेनन हेदेखील याच पठडीतले. हे ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार आहेत. रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख रिन्स प्रिबस यांना नवे ‘चीफ ऑफ स्टाफ’ बनवण्यावर सर्वसहमती होऊ शकेल. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पक्षाचे नेतृत्व तसेच प्रत्येक सदस्याला खुश ठेवण्याचे काम उत्तम सांभाळले आहे.

जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळी सत्ता हस्तांतरण प्रक्रियेत सक्रिय असलेल्या जोश बॉल्टन यांच्याबाबत विश्लेषकांचे मत चांगले आहे. ट्रम्प यांनी त्यांना पाचारण केले, मात्र त्यांना प्रशासनात नवे चेहरे हवे आहेत. ट्रम्प यांच्याबाबतीत असे बोलले जाते की, त्यांनी एखाद्या मुद्द्याचे नेतृत्व पत्करले की त्यासंबंधी कुणी कितीही चांगली कल्पना मांडली तरी ती निरर्थक ठरते. असे असले तरी ओबामा केअरसारख्या आरोग्यविषयक योजना, हवामान बदल तसेच अनिवासीसारख्या विषयावर ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत.

बॉल्टन यांच्याप्रमाणे अनेक लोक ट्रम्प मुद्द्यावरून काळजीत आहेत. त्यांना ट्रम्प हे अमेरिकेतील प्रसिद्ध हास्यकलाकार ग्राउचो मार्क्स यांच्याप्रमाणेच वाटतात. ते कोणताही मुद्द्यावरून पलटवार करू शकतात. यासाठी ते स्वत:ची तत्त्वेही अनेकदा विसरून जातात.
व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर ट्रम्प यांच्या कंपुतले काही जण त्यांच्यावर पुस्तकही लिहितील. मात्र ट्रम्प यांच्या अनिश्चित स्वभावामुळे ते कठीण काम आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा असा अनिश्चित स्वभाव आणि काम करण्याची अनियमित प्रक्रिया आपल्यासाठी जंगल सफारी केल्यासारखीच असू शकते.
नव्या जबाबदाऱ्यांसाठी नवखे चेहरे
{ संयुक्त राष्ट्राचे अमेरिकन राजदूत म्हणून निक्की हेली हे नाव पुढे आहे. त्यांना निवडणूक जिंकता येते, मात्र परराष्ट्र धोरणाचा अनुभव शून्य आहे.

{ डॉ. कार्सन हे प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे गृह व शहर विकास विभागाची जबाबदारी दिली जाऊ शकते. राष्ट्राध्यक्षपदाच्या प्राथमिक निवडणुकीत ट्रम्प यांच्यासमोर त्यांचा पराभव झाला होता. ते एका घराचे मालक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे गृह विभाग सोपवला जातोय की काय अशी चर्चा आहे.

{ बेट्सी डिवोस या ‘अमेरिकन फेडरेशन फॉर चिल्ड्रन’ या समूहाच्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. रिपब्लिकन पार्टीच्या त्या मोठ्या निधीदात्या आहेत.
} द न्यूयॉर्क टाइम्स संपादकीय मंडळ
बातम्या आणखी आहेत...