आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ यांची असफल अमेरिका यात्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे दोनदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आले.
भारताची हेटाळणी करण्याकरिता आणि भीती दाखवण्यासाठी पाकिस्तानने कांगावा केला की, आम्ही अणुबाॅम्बचा उपयोग करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
काही दिवसांपूर्वी नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा वाॅशिंग्टन यात्रा केली. तीनच आठवड्यांत दोनदा अमेरिका दौऱ्यावर जाण्यासारखे असे काय घडले? यावर पाक सूत्राचे म्हणणे असे की, आधीचा दौरा हा राजकीय नव्हता. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनात सहभागी होण्याकरिता गेले होते. परंपरेनुसार जगभरातून आलेले सारे नेते सदिच्छा भेट म्हणून एकमेकांना अशा प्रसंगी भेटत असतात.

पाक सूत्राचे म्हणणे असे की, शरीफ यांचा अमेरिका दौरा या अधिवेशन काळात होता, त्यामुळे जगाचा गैरसमज झाला. पाकिस्तानी वृत्तपत्रांचे म्हणणे असे की, भारतीय मीडियाने गैरसमज पसरवला. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी शरीफ यांना पुरेसा वेळ दिला नाही आणि त्यांना गांभीर्याने घेतले नाही. याच वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र राष्ट्रपती ओबामा यांची भेट आणि दीर्घ चर्चा करण्यात यशस्वी झाले. इतकेच नाही, तर माेदी आणि ओबामा यांनी जगातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. त्यामुळे पाकिस्तानात परतल्यानंतर शरीफ यांनी पुन्हा अमेरिकेला जाण्याकरिता कंबर कसली. ओबामा यांची भेट घेण्याची तयारी केली. भारतावर मनमानी आरोप करून आपला स्वार्थ साधण्याचा पाकिस्तानने आटापिटा सुरू केला.

भारताची हेटाळणी करण्याकरिता आणि भीती दाखवण्यासाठी पाकिस्तानने कांगावा केला की, आम्ही अणुबाॅम्बचा उपयोग करण्यास मागेपुढे पाहणार नाही. शरीफ यांनी असे काही करू नये यासाठी महासत्ता अमेरिका पाकिस्तानची समजूत घालेल, अशी आशा पाक धोरणकर्त्यांना होती; पण पाकिस्तानने असा आततायीपणा केल्यावर भारत हातावर हात ठेवून बसेल की काय? भारत क्रोधित झाला अन् कठोर निर्णय घेतला तर पाकिस्तानची काय अवस्था होईल? अण्वस्त्रांच्या वापरासारख्या वेडेपणाला अमेरिका पाठीशी घालेल, अशी शक्यताच नाही. त्यामुळे दोनदा अमेरिका दौरा करून नवाझ शरीफ यांना काहीच आश्वासन मिळाले नाही. उलट अण्वस्त्रांबाबत केलेल्या वक्तव्यावर अमेरिकेने फटकारले. या मुद्द्यावर अमेरिकेने काहीही ऐकून घेतले नाही आणि काही आश्वासन दिले नाही. त्यामुळे मान खाली घालून परतावे लागले. शरीफ यांनी यावर हार मानली नाही. भारत बलुचिस्तानात सतत घुसखोरी करत असल्याची तक्रार अमेरिकेकडे केली. तेथील जनतेला फूस लावून इस्लामाबादच्या मार्गात काटे पसरवण्याचे काम भारत करत असल्याचे सांगितले. बलुची लोकांना भडकावून तो भाग पाकिस्तानपासून वेगळा करण्यात येईल काय, अशी भीती पाकिस्तानच्या मनात आहे. बांगलादेशप्रमाणेच बलुच प्रदेश तोडला जाऊ शकेल, अशी भीती अमेरिकेसमोर व्यक्त केली. नवाझ शरीफ एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी काश्मीरचा मुद्दा काढला. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर हडपण्याचा भारताचा डाव असल्याचे सांगितले. यामागे पाकिस्तानचा डाव असा होता की पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करून धडा शिकवेल. यामुळे पाकिस्तानला दोन फायदे होतील. एक म्हणजे पाकिस्तानला तोडण्याचे प्रयत्न भारत कायम सोडून देईल आणि दुसरा फायदा म्हणजे अमेरिकेच्या पाकिस्तानातील हितसंबंधांना नवसंजीवनी मिळेल. अफगाणिस्तानात शांतता स्थापित होऊन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात वाढत असलेला इसिसचा प्रभाव थांबवता येईल. पाकिस्तानचे तुकडे पडल्यापासून तो अस्वस्थ आहे. कसेही करून भारताला धडा शिकवला पाहिजे आणि आग्नेयेकडील देशांवर प्रभाव टाकावा, असे त्याला वाटते; पण हे काम अमेरिकेच्या माध्यमातून करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. पण असे करण्यापूर्वी ओबामा यांना विचार करावा लागेल. पाकिस्तान विजयी होताच भारतीय उपखंडात अल बगदादी आणि त्याची संघटना इस्लामिक स्टेटची घुसखोरी सुरू होईल. म्हणजे पाकिस्तान भारतावर कुरघोडी करेल. शिवाय अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात येतील. अर्थात ही सगळी नवाझ शरीफ यांच्या डोक्यातील खिचडी आहे. ती शिजवण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. पण अमेरिका आणि भारत नाही, तर संपूर्ण जगाचा आग्नेय भाग शरीफ यांच्या आततायीपणामुळे नरक बनेल.

वास्तव असे आहे की, आपल्या सुरक्षेसाठी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील इतर प्रदेश स्वतंत्र होऊन नवीन देश बनले किंवा भारतात विलीन झाले तर वैश्विक समीकरणेच बदलून जातील. शरीफ हे पाकिस्तान वाचवण्यासाठी जगाला महायुद्धात ढकलण्याचे आत्मघाती पाऊल उचलत आहेत. आग्नेय आशियाला खाईत लोटण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. मोदी यांनी ओबामांसह अनेकांशी चर्चा केली आहे आणि जगासमोर सत्य स्थिती मांडली. आगामी काळात राष्ट्रसंघातील शक्तिशाली घटक असलेल्या सुरक्षा परिषदेची सदस्य संख्या वाढवली पाहिजे आणि त्याच वेळी जगातील भारताचे स्थान पाहता भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवले पाहिजे. या बाबी जगातील इतर देश मान्य करतात. वाचकांना माहीत आहे की, आगामी काळात राष्ट्रसंघाला शक्तिशाली बनवण्यासाठी आलेल्या सूचनांत भारत एक दृढ आणि विकसित देश बनल्यामुळे त्याला राष्ट्रसंघाच्या रचनेत सामावून घेण्यात येईल.

भारताच्या पंतप्रधानांनी आपली योग्यता आणि भारताचे महत्त्व ज्या पद्धतीने अधोरेखित केले, त्याने संपूर्ण जग प्रभावित झाले. यामुळे पाकिस्तानला निराशा येणे स्वाभाविकच होते. त्यामुळे तोंड बारीक करून परतण्याशिवाय शरीफ यांच्यासमोर पर्याय उरला नाही. पण त्यांनी त्या वेळी मनात विचार पक्का केला होता की, लवकर अमेरिकेत परत येऊ आणि जगाला चकित करू. त्यामुळे ते पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. आपल्या देशाचे जागतिक महत्त्व दाखवण्यासाठी न्यूयाॅर्कच्या भूमीवर अवतरित झाले. दरम्यान, पाकिस्तानातील नवाझ शरीफविरोधी वातावरण अचानक थांबले. इतकेच नाही, तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जे मार्शल लाॅ आणण्यासाठी उतावीळ झाले होते, ते नवाझ शरीफ यांची बाजू घेऊ लागले. याचा अर्थ असा की, नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या जनतेला कोणते तरी मोठे स्वप्न दाखवून गप्प बसवले आहे. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तो भारताला शत्रूस्थानी मानत आहे. भारताला कमी लेखण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे आपल्या या शत्रूवर मात करण्यासाठी भारतीय नेत्यांनी दृढ संकल्प करण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या सरकारने मनोमन ठरवले आहे की भारताशी आता जे युद्ध होईल ते अंतिम असेल आणि ते आण्विक युद्ध असेल. त्यामुळे विचार करण्याची आणि चिंतन करण्याची वेळ आता आपली आहे.
m_hussain@gmail.com
बातम्या आणखी आहेत...