आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्ञानातून जेव्हा मुक्ती मिळेल तेव्हाच निर्वाण प्राप्त होईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्तू प्रत्यक्षात दिसते तशी ओळख करून घेणे म्हणजे ज्ञान, असे म्हणता येईल. याचाच अर्थ टेबलला टेबल म्हणून ओळखणे हे ज्ञानाच्या श्रेणीत येते, तर त्याला खुर्ची असे म्हणणे अज्ञान म्हटले जाते. परंतु उत्तराधुनिकतेच्या भावनेने ओतप्रोत वर्तमानकाळात ‘वास्तविकता’ हा शब्द आपली वास्तविकता हरवून बसलेला असतो. जर्मन शास्त्रज्ञ हाइसनबर्गने शास्त्रज्ञांना एक क्रांतिकारक मंत्र दिला आहे. त्याच्या मते, अणूच्या नाभिकीय स्तरावर एका छोट्याशा अणू कणाच्या योग्य स्थितीचा अंदाज करणे अशक्य आहे. अनुमानाच्या पातळीवर आपण केवळ शक्यतांबद्दलच बोलू शकतो, वस्तूच्या वास्तविकतेबद्दल नाही. परंतु जर सर्व वस्तू खालच्या नाभिकीय पातळीवर अणूपासूनच निर्मित असतील तर वस्तूंच्या वास्तव अर्थाचे फारसे महत्त्व उरत नाही. अशा स्थितीत ज्ञानाच्या संदर्भात आपली माहिती निश्चितच एखाद्या बदलाची अपेक्षा ठेवते. अशा वेळी जेव्हा ज्ञान आपला मूळ तात्त्विक अर्थ हरवून बसले असेल तर आम्ही या कल्पनेला काेणती नवी व्याख्या अथवा माहिती देऊ शकतो?

या प्रश्नाचे उत्तर आपणास प्राचीन काळातील बौद्ध तत्त्वज्ञानात सापडते. येशू ख्रिस्ताच्या काळातील दुस-या शतकात जन्मलेले बौद्ध तत्त्वज्ञ आचार्य नागार्जुन यांच्या मते, ज्यास आपण परंपरावादी वास्तवयुक्त ज्ञान म्हणतो, ते प्रत्यक्षात एखाद्या वस्तूच्या विषयात आपल्या खासगी वक्तव्यापेक्षा फारशी अधिक माहिती नसते. नागार्जुनच्या मते, जग तसेच व्यावहारिक वस्तूंचे वास्तव असे की, ते निरंतर परिवर्तनशील आहे. शेवटी ते क्षय पावते तसेच मृत्यूला प्राप्त होते. अशा निरंतर परिवर्तनीय तथा क्षणभंगुर जगाला भाषेचा युक्तिबद्ध आकार तथा प्रकारांमध्ये बांधणारे तथाकथित ज्ञान वस्तूचे वास्तविक रूप उघड करण्याऐवजी त्याच्यापासून आपणास वंचित ठेवण्याचे कार्य करते.

नागार्जुनच्या मते, भाषेद्वारे ज्ञानाला अभिव्यक्ती तथा आकार प्राप्त होतो. परंतु भाषेचे रूप तथा प्रारूप वस्तूचे रूप तथा प्रारूपच्या तुलनेत अधिक पटीने सत्य तथा अपरिवर्तनीय आहे. लवकर किंवा उशिराने वस्तूचे विशेष ज्ञान हाेणे म्हणजे धर्म आहे. परंतु भाषेमध्ये ते आपली अभिव्यक्ती कायम ठेवते. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास भाषा शाश्वत असते, परंतु वस्तू क्षणिक असतात. कारण आपले वास्तविकतेबद्दलचे आकलन सदैव भाषा तथा त्याच्या आकार तथा श्रेणीमध्ये रचनाबद्ध असते. यासाठी आपण भाषेमध्ये अवस्थित आकार तथा श्रेणींना वस्तूचा स्वभाव अथवा वास्तविकता अथवा वास्तविकतेला जोडून पाहू लागतो. बौद्ध तत्त्वानुसार जगाची स्वत:ची ओळख अथवा वास्तविकता नाही. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास जग स्वभावशून्य आहे. या कारणामुळे नागार्जुनद्वारे प्रदत्त बौद्ध तत्त्वज्ञानाच्या या शाखेला शून्यवादाची संज्ञा देण्यात आली आहे. जग तसेच त्याच्या ज्ञानाशी संबंधित आपल्या आकलनाचे तसेच सर्व शून्यवादी विश्लेषण आजसुद्धा अनेक अर्थांनी तितकेच प्रासंगिक आहे, जितके नागार्जुनच्या काळात होेते.

जग आणि जगातील कोणत्याही वस्तूमध्ये अनंत शक्यता असतात. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास जगातील कोणतीही वस्तू, भाषा तथा त्याचे आकार तथा श्रेणीमध्ये कसल्याही बंधनात नसतात. जग स्वयं भाषेपासून पूर्णत: स्वतंत्र आहे, परंतु आम्ही शारीरिक, मानसिक, सामाजिक तथा अन्य वातावरणात बंदी जगात विविध प्रकारच्या आवाहनाशी जोडले जातो. या आवाहनांना भाषेत बंदिस्त करून आपण विविध वस्तूंच्या विषयात आपले वक्तव्य करत असतो तथा त्यांना अशा प्रकारे इतरांसमोर प्रकट करत असतो. अशी वक्तव्ये इतरांची वास्तविकता कथन करत आहेत, असे वाटते. नागार्जुनच्या मते, असे ज्ञान जग तथा त्याला जोडलेल्या चेतनेच्या अमर्याद शक्यतांना संकुचित करते आहे. तथा अशा अर्थाने ते अपरिहार्यही आहे. बाह्य जग तथा आंतरिक चेतना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तथा भाषा व त्यास जोडलेले ज्ञान प्रपंचापासून शून्य आहे.

या जगाला आपण आपल्या टीकाटिप्पणीवरून मुख्यत्वे संकुचित करतो. भाषा तथा तिच्या व्याप्तीला बौद्ध तत्त्वात प्रज्ञा म्हटले आहे. ती निर्वाणच्या रूपात प्रकट केली जाते. अशा प्रकारे भाषेच्या बंधनात असलेल्या जगासंदर्भात आपले ज्ञान आम्हाला जगाच्या बंधनाच्या रूपात सादर करते. त्याच प्रज्ञेद्वारे त्या ज्ञानापासून त्या जगाच्या बंधनापासून अापल्या चेतनेला मुक्त करते. अशा प्रकारे प्राचीन बौद्ध तत्त्वज्ञानात मुक्तीच निर्वाणाची अवस्था आहे.

येथे नागार्जुनचे मत आपण अशा प्रकारे समजून घेऊया. कोणत्याही प्रसंगी अापण जग तथा निसर्गातील कोणत्याही वस्तूवर दृष्टिक्षेप टाकला तर आपण त्यांना गाढ निद्रेच्या अवस्थेत असल्याचे पाहतो. जग अथवा निसर्ग फक्त आपल्या अस्तित्वाचीच जाणीव करून देतात. आपण कोण असल्याची जाणीव नव्हे. ते कोण आहेत, त्यांची ओळख, त्यांच्या परिचयाचे निर्धारण आपण आपल्या उद्देशाच्या अाधारेच करून घेतो. ज्या प्रकारे निसर्गाच्या शांत वातावरणात आपलाच प्रतिध्वनी आपणास ऐकण्यास मिळतो त्याच प्रकारे आपणसुद्धा निसर्गास त्याच भाषेत बंदिस्त करतो. तथा त्यापासून निघालेल्या त्याच्या परिचयास जगाचे स्वत्व अथवा स्वभाव मानू लागतो. नागार्जुनाच्या मते, जग तथा निसर्ग एका गहि-या शांततेत लीन आहे. आपण शब्दाच्या पलीकडे जाऊन स्वत:ला शांत करवून घेतले तर जगाच्या त्या विश्रांतीला आपण आत्मसात करू शकू. जर आपण तसे करू शकलो तर तेच जग अाधी आपल्यासाठी श्रमाचे केंद्र होते. आता आध्यात्मिक विश्रामाचे केंद्र होईल.

याव्यतिरिक्त जर आपण लक्षपूर्वक पाहिले तर बाह्य स्वरूपात लादण्यात आलेली ओळख मग ती जीवित अथवा निर्जीव वस्तूची का असेना, मानवी जगतात द्वंद्वाचे कारण तथा निसर्ग जगतात नैसर्गिक संपत्तीच्या ऱ्हासाचे कारण बनते. आपल्या पर्यावरणानुसार तथा सुविधानुसार अन्य वस्तूंना व्याख्येत गुंफतो. यामुळे जाती, धर्म, लिंग असे भेद उत्पन्न होतात. अशा प्रकारे बौद्ध तत्त्वात शून्यवादाच्या शाखांचे शिक्षण केवळ अाध्यात्मिक पार्श्वभूमीवर प्रासंगिक असते. होय, आपल्या प्रापंचिक, सामाजिक, नैतिक जीवनातही आपणास नवी भूमिका प्रदान करत आहे, असे वाटते.