आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल करन्सीसाठी आधार कार्ड उपयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोककल्याणाच्या योजनांमध्ये आधार कार्ड सर्वात महत्त्वाची योजना आहे. यापूर्वीच्या यूपीए सरकारचा हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या हाती आहे. आधार कार्डला ई-कॉमर्स प्रकल्पाशी जोडल्यास देशातील अनेक समस्यांवर उपाय सापडतील तसेच देशाची अर्थव्यवस्थाही बळकट होईल. १९९० मध्ये ई-कॉमर्सची सुरुवात झाली होती. परिणामी आज आपल्याला प्रत्येक उत्पादने ऑनलाइन मिळू शकतात.

देशातील अनेक उत्पादकांच्या उत्पादनास योग्य भाव मिळत नाही. छत्तीसगडचे उदाहरण ताजे आहे. व्यापाऱ्यांच्या अरेरावीमुळे शेतकऱ्यांनी ढिगांनी आलेल्या टोमॅटोवर ट्रॅक्टर चालवले. व्यापाऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी शेतकऱ्यांनी ई-कॉमर्सचा आधार घेत ऑनलाइन विक्री केली असती तर ही वेळ आली नसती.

ऑनलाइन पेमेंटसाठी आजही आपण व्हिसा आणि मास्टर कार्डसारख्या विदेशी कंपन्यांवर विसंबून आहोत. त्याऐवजी रुपे पेमेंट प्लॅटफॉर्म आणि आधार कार्डच्या समन्वयातून नवा भारतीय पर्याय उपलब्ध करू शकतो. जकात, मेट्रो, पेट्रोलियम, आरोग्यासारख्या सेवा आधार कार्डशी जोडल्यास देशातील जास्तीत जास्त नागरिक ई-कॉमर्सशी जोडले जातील. याविषयीचे गुन्हे टाळण्यासाठी फिंगर प्रिंटचाही आधार घेता येईल.

यामुळे खेडी आणि शहरांमधील अंतर कमी होईल. फोनवरून औषधांच्या सेवेसह आजाराचे निदान होण्याच्या सुविधाही घरपोच मिळाव्यात. यामुळे दवाखान्यांमधील रांगाही कमी होतील. नव्या कॅशलेस मिशनची ही सुरुवात असेल. प्लास्टिक नोटेचा कचरा पसरवण्याऐवजी सध्या कोट्यवधींनी जमा झालेल्या काळ्या पैशांमधून केवळ शंभर रुपये सामान्यांच्या आधार कार्डमध्ये जमा करावेत. याद्वारे डिजिटल करन्सीची सुरुवात होईल.
अमन शर्मा, २५
अॅल्युमनाई वेल्लौर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट अॅल्युमनाई आयआयएससी, बंगळुरू.
बातम्या आणखी आहेत...