आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्टिओपोरोसिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्टिओपोरोसिसचा अर्थ पोरोस बोन. म्हणजे हा असा आजार आहे की यात हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात. गंभीर अवस्थेत ती ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे ती तुटणे स्वाभाविक आहे. विशेषत: ढोपर, मनगटे, पाठीच्या कण्याच्या हाडांवर याचा परिणाम होऊ लागतो. कधी खुर्चीतून उठतानाही हाडे मोडल्याची उदाहरणे आहेत, तर कधी वाकल्यानंतरही हाडे तुटतात.

कधी होतो हा आजार?
हा आजार साधारणपणे वयस्कर लोकांत आढळून येतो. परंतु तसेही काही नाही. कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो. मात्र वयस्कांत याचे परिणाम आढळून येतात. त्यांना उतारवयात ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅक्चरही होते. हाडाची लवकर झीज होते. अनेक वर्षे या आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. हाड तुटल्यानंतरच आजाराबाबत कळते. कधी-कधी तर अशा आजारात उंचीवरही परिणाम दिसू लागतो. पाठीत कुबड निघते.

काळजी का वाटते?
हा आजार लाखो लोकांमध्ये दिसून येतो. ही समस्या तर गंभीर आहेच; पण याचे योग्य कारण अद्याप सापडलेले नाही. परंतु ज्यामुळे आजार बळावतो, ती कारणे शोधून काढली गेली आहेत. यात वयाचा मुख्य मुद्दा आहे. माणसाची हाडे वयोमानानुसार ठिसूळ होतात. ३५ वर्षे उलटल्यानंतर शरीर नव्या हाडांची निर्मिती करत नाही. वयाबरोबरच तुमच्या हाडांची अवस्था नाजूक होते.

वंशपरंपरा
एखाद्या कुटुंबात हाडे तुटण्याची परंपराच असते. किरकोळ अंगकाठी, गौरवर्ण आणि सुडौल शरीरात या आजाराचे प्रमाण आढळते. हा आजार अानुवंशिक असल्याने कमी वयात तो कसा झाला याचे कारण समजून येते. निकृष्ट दर्जाचा आहार, कॅल्शियमची कमतरता असलेल्या पदार्थांचे सेवन, कमी वजन आणि निकृष्ट लाइफस्टाइल यामुळे हा त्रास जाणवू लागतो.

औषधे आणि अन्य आजार
ऑस्टिओपोरोसिसमध्ये स्टेरॉइड्स आदी औषधे दिली जातात. परंतु यात थायराॅइडमध्ये वाढ किंवा कमतरता जाणवणे असे प्रकार आढळून येतात. या आजारापासून बचाव करायचा असेल तर हाड तुटू न देण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर खाण्यात कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि डी जीवनसत्त्वाचा समावेश असावा. तसेच नियमित व्यायाम करणेही जरुरी आहे.

कॅल्शियम
यापासून बचाव करण्यासाठी वाढत्या वयातील मुलांना कॅल्शियमची गरज असते. जर हाडे मजबूत आणि वजनदार असतील तर भविष्यात ती चांगली राहतात. शरीराची वाढ होत असताना, पुरेशा प्रमाणात शरीरास कॅल्शियम मिळाले नाही तर नंतरच्या काळात ऑस्टिओपोरोसिसची समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. कारण ती शरीरातील कॅल्शियमच नष्ट करत असते. मेनाॅपॉजनंतर कॅल्शियमची भूमिका महत्वाची असते. तो हाडे मजबूत ठेवण्याचे काम करताे. मग एखादी महिला मेनॉपॉजच्या स्थित्यंतरातून बाहेर पडली असेल आणि तिला ऑस्टिओपोरोसिस असेल तरीसुद्धा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे मोडण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला किती कॅल्शियमची गरज आहे ते वयावरून ठरवता येते.

> ९ ते १८ वर्षे वयातील मुलामुलींना १३०० मिलिग्रॅम दररोज
> १९ ते ५० वर्षांच्या महिला आणि पुरुषांना १००० मिलिग्रॅम दररोज
> १९ ते ५० वर्षे वयातील गर्भवती किंवा आजारी महिलांसाठी १००० मिलिग्रॅम दररोज
> ५० वर्षांवरील महिला आणि पुरुषांसाठी १२०० मिलिग्रॅम दररोज

डेअरी उत्पादने कॅल्शियमचे स्रोत आहेत. एक ग्लास दुधातून ३०० ग्रॅम कॅल्शियम शरीरास मिळू शकते. याशिवाय कॅल्शियमच्या अन्य स्रोतांत हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे.

माहिती कशी मिळेल?
या आजारात डॉक्टरांना आधी स्केलेटल एक्सरे बोन डेन्सिटोमेट्री (बीएमडी)चे परीक्षण खास लॅबमध्ये करावे लागते. जर हाडाचे वजन कमी भरले तर एखादा दुसरा आजार तर नाही ना, हे जाणून घेण्यासाठी काही वेगळ्या टेस्ट होतील. यात अॉस्टिओमेलेसियाही असू शकतो. ही मेटाबोलिक हाडाचा आजार आहे. तो असामान्य मिनरलायझेशनमुळे हाडात आढळतो किंवा कोणाला हायपरथायरोडिझम होऊ शकतो. बाेन डेन्सिटोमेट्री सुरक्षित आणि वेदनारहित तपासणी आहे. यात हाडांच्या डेन्सिटीची तुलना उच्चतम डेन्सिटीशी होते.
महिलांमध्ये मेनॉपॉजच्या काळात हाडांच्या डेन्सिटीची तपासणी होते. ती अनेक पद्धतींनी केली जाते. अशा तपासणीमुळे शरीरातील विभिन्न भागातील हाडांची माहिती मिळेल. ड्युएल एनर्जी एक्सरे
अॅब्सॉर्पटियोमेंट्री (डेक्सा) एकदम अचूक तपासणी मानली जाते. काही अन्य मार्गानेही ऑस्टिओपोरोसिस जाणून घेता येते. यात सिंगल फोटोन अॅब्सॉर्पशियोमेट्री, क्वाँटिटेटिव्ह काॅम्प्युटेड टॅमोग्रॉफी (क्यूसीटी), रेडिओग्राफिक अॅप्सॉर्पशियोमेट्री आणि अल्ट्रासाऊंड यांचा समावेश आहे. मात्र कोणती तपासणी करायची ते डॉक्टर ठरवतील.

ट्रीटमेंट काेणती?
ज्या हाडात दोष असेल ते हाड वाचवता तर येत नाही, परंतु बाकी हाडे वाचवणे गरजेचे आहे. उपचारात फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन, गायनाकॉलॉजिस्ट आणि अँड्राक्रायनॉलाॅजिस्ट असतात.

उपचाराच्या पद्धती
अॅस्ट्रोजन रिप्लेसमेंट : याला ईआरटी म्हटले जाते. ज्या महिलांना ऑस्टिओपोरोसिस असण्याची शक्यता असते, त्यांच्यावर ही उपचार पद्धती लागू होते. यामुळे त्यांच्या हाडाची झीज अथवा होणारे नुकसान तसेच हाडे तुटण्याचा धोका कमी करता येतो. बोन डेन्सिटी मेनॉपॉजदरम्यान केली जाते. तेव्हा ईआरटी या रुग्णांसाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरवले जाते. यात स्तनाच्या कॅन्सरचा धोका असतो.

सिलेक्टिव्ह अॅस्ट्रोजन रिसेप्टर
न्यू अँटी अॅस्ट्रोजन्सला सिलेक्टिव्ह अॅस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर्स (एसईआरएम) या नावाने ओळखले जाते. यात हाडाचे वजन वाढते, त्याचबरोबर पाठीच्या कण्यातील हाडे तुटण्याची शक्यताही कमी असते. शिवाय स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका नसतो.

कॅल्सिटोनिन
हा नोझल स्प्रेप्रमाणे असतो. यात हाडांची मजबुती कळते. त्याचबरोबर हाडे तुटणे थांबवतो.