आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरण जा असे सांगणे खूप सोपे, पण ते शक्य होते का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या सामाजिक दृष्टिकोनातून पाहिल्यास 'जिसकी लाठी उसकी भैंस' ही म्हण काही खोटी नाही; परंतु मानवीयदृष्ट्या ही एक संकुचित स्वरूपाची भावना आहे. 'मनुष्य' मर्यादित असू शकतो, पण "माणुसकी' अमर्यादित असते. मानवी जीवनाची सार्थकता "द्वंद्व' समजण्यात आणि त्यातून पुढे येण्यात आहेत. पशूला "द्वंद्व' यासाठीच नसते कारण तेथे केवळ नैसर्गिक कर्म आहे. किंवा पशूसारखा व्यवहार ही त्याची मूळ प्रवृत्ती आहे. नैतिकतेशी संबंध जोडला तर आपल्या सर्व नैसर्गिक क्रिया कर्मात परिवर्तित होतात आणि मनुष्य आजीवन आपले निर्णय आणि विचारपद्धतीमध्ये ताळमेळ घालू लागतो. काही यशस्वी होतात, तर काही अयशस्वी ठरतात.
भगवद््गीता प्रतीकाच्या स्वरूपात कर्म, भक्ती आणि ज्ञान समजावण्याचा फक्त एक सफल प्रयत्न आहे, पण कल्पनातीत परिस्थितीच्या शक्यताशी माणसांचा परिचय करून देण्याचे श्रेय भगवद््गीतेलाच जायला हवे. कृष्णाला मग हवे तर मनुष्य समजा किंवा देव; संदेश तर तोच आहे-कर्म अकर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. भक्तीमध्ये समर्पणाचा अर्थ आपल्या मर्यादा आणि आपल्या मर्यादित अस्तित्वाचा आदर करणे आहे आणि ज्ञानातून आलेला अनुभव मनुष्याच्या चारित्र्यात समभावाचा अाधार बनू शकतो. गीता ढोबळमानाने एक अनुभव आहे. एक अशी व्यक्ती जी "द्वंद्वातून' जाते आहे.
प्रत्येक व्यक्तीत एक कृष्ण आणि आणि प्रत्यक्ष अर्जुनाचे रूप पाहण्यास मिळते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल; परंतु हे निखळ सत्य आहे की, चांगल्यात चांगला आणि वाईटातील वाईट माणसातही ती रूपे दिसून येतात. राेजच्या जीवनात तर हेच आढळते. केवळ नियमाशी बांधील असल्यामुळे सृष्टी जड आहे, ती या अर्थाने. जेव्हा की, माणूस आपल्या जीवनात नवनवीन आव्हानांशी लढत स्वत:साठी नवे अर्थ शोधत असतो. जीवन म्हणजे एक शोध असून अर्थपूर्ण करण्याची एक प्रक्रिया आहे. सृष्टी आणि माणसाच्या संबंधात नियमबद्धतेत खूप अंतर आहे.
‘ऊर्ध्वमूलमध: शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम...', भगवद््गीतेच्या पंधराव्या अध्यायातील पहिला श्लोक आहे. यात जीवनाला एका पिंपळ वृक्षाच्या स्वरूपात कल्पिले आहे. जिज्ञासेची गाेष्ट ही आहे की, या झाडाची मुळे वरच्या भागाला आहे आणि सृष्टीत विहार करणा-या सर्व प्राण्यांच्या स्वरूपात फांद्यांची कल्पना केलेली आहे. ज्याची मूळे ऊर्ध्वमुख आहे, अशा वृक्षाच्या स्वरूपात सृष्टीची कल्पना करणे यांचे दोन सांकेतिक अर्थ आहेत. सृष्टीच्या स्तरावर भिन्नता, विषमता आणि संकुचित अस्तित्व दिसून येते; परंतु या वृक्षाचा मूळरूपी आधार एकच आहे. दुसरी गोष्ट माणसाची जीवनयात्रा आपल्या याच मूळ स्थानाचा शोध आणि संशोधन करण्यामुळे आहे. कारण या झाडाच्या फांद्या वर-खाली पसरलेल्या आहे आणि इंद्रिये तशीच आहेत. विषयवासनेपासून प्रेरित होऊन माणूस कर्मबंधनात गुरफटत जातो. या झाडाला असंग आणि अनासक्तीच्या दृढ तलवारीने कापून त्याला आद्य पुरुषाला शरण गेले पाहिजे.
जेव्हा आम्ही स्वत: पूर्णपणे काही करायला मोकळे आणि बांधलेले नसतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो. या मधल्या अवस्थेला अनिर्णयात्मक म्हणायचे वा मग स्पंदनात्मक वा सृजनात्मक? संपूर्ण स्वातंत्र्य आणि संपूर्ण बंधन ही एक अाव्हानात्मक अवस्था अाहे. मानवजातीसाठी पहिली आदर्श, तर दुसरी शाप ठरेल. कुठे ना कुठे गीता सार अस्तित्ववादी परंपरेशी मिळतेजुळते वाटते. सारा खेळ जीवनशैलीच्या निवडीवर अवलंबून आहे. कोणत्याही एका मार्गाची निवड व उपयोग करून जीवन व्यतीत करावे, अशा अकल्पित परिस्थितीच्या आवरणाखाली मानवी जीवन असते. माणसाने असे जीवन व्यतीत करावे, हेही खूप क्लिष्टच होईल. तरीही ही विडंबना आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान पूर्ण मानवतेसाठी उपयुक्त मानले गेले आहे. या िवश्वरूपी झाडाची एकही शाखा तसेच एकही पान एकसारखे नाही. ज्याची प्रतिकृती केली गेली वा करता येईल, अशी एकही व्यक्ती नाही. एकसारखी असलेली एकही व्यक्ती नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. इतके वैविध्य, विलक्षणता अाणि वैचित्र्य काय केवळ योगायोग आहे? इतका स्वाभाविक पारस्परिक वेगळेपणा कोणत्या गोष्टीचे सूचन आहे? समाजाचा एक भाग असतानाही व्यक्ती आपल्यात एकच आहे; परंतु इतर लोकांत असलेला मूळ अंश त्याच्यातही आहे. म्हणून समानता असूनही आम्ही एकमेकांपासून वेगळे असतो. हा भेद आम्हाला उगम स्रोतापासून वेगळे न करता ते माहिती करून प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतो. जीवनाचे रहस्य जाणून घेणे म्हणजे स्वत:ला जाणून घेणे असे मानणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि हेच प्रयत्न सृष्टीची संरचना करण्यास सहायक ठरतात. आपल्या असण्याला एक तर अर्थपूर्ण करू शकेल वा आपल्या असण्याचा अर्थ समजून घेऊ शकेल, अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी माणूस सातत्याने प्रयत्नशील असतो.
भक्त व्हा, शरण जा, अहंपणाला त्या परम आराध्याच्या चरणी वाहून टाका, असे म्हणने खूप सोपे आहे. पण असे होऊ शकते का? आपली बुद्धी, आपले प्रयत्न, आपले धैर्य आणि स्वत:िवषयी वाटणा-या आत्मीयतेचा इतक्या सहजतेने त्याग करता येतो? भक्त कार्यरत नसतो का? आणि राहतो तर कसा राहताे? हे सर्व प्रश्न विचलित जरूर करतात; पण भगवद््गीतेत आलेले ज्ञान, कर्म आणि भक्तिमार्गावर येणारे अनुभव नुसत्याच कल्पना नाहीत, हे स्पष्ट आहे. एवढेच नव्हे, तर ज्या कधी सफल होऊ शकतात अशा मनुष्य जीवनाच्या संभावित अवस्था आहेत.
कारण मनुष्य स्वभाव गुणांनी प्रभावित असतो. याचमुळे मनोवृत्तीत चढ- उतार, कधी सार्वजनिक, तर कधी वैयक्तिक विचारधारेने प्रभावित होणे साहजिक आहे. मुक्तावस्था हे ध्येय असेल तर ही अवस्था निश्चितच मनातील भाव आणि वृत्तीच्या माध्यमातून होत असेल. एक मार्गी असणे आणि तीन मार्गांतील सार्थक तत्त्वांची सांगड घालून अनुसरण करण्यास बहुधा खूप अंतर नसावे.