आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोरायसिस ऑफ लिव्हर व उपचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी एक केस अशी आली की, रुग्णाच्या रक्तात प्लेटलेट काउंट कमी होते. ६५ वर्षांच्या या रुग्णास २ वर्षे आधी ताप आला होता. ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. व्हायरल ताप असल्याने प्लेटलेट कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांना वाटले की, व्हायरल फीव्हरमुळे असे झाले असावे. पुढच्या सात दिवसांत रुग्णांची तब्येत ठीक झाली. त्यांचे प्लेटलेट काउंट ८०००० होते. तरीही त्यांची इतर लक्षणे दिसून येत नव्हती. त्यांना बरे वाटत असल्याने डॉक्टरकडे गेले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून जेव्हा त्यांनी सीबीसी (ब्लड काउंट चेक) केले तेव्हा प्लेटलेट कमी आढळून आल्या. एक वर्षापूर्वी या रुग्णाने हेमटोलॉजिस्ट(रक्ततज्ज्ञ)शी संपर्क केला. परीक्षण व तपासणी केल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की ते सामान्य आहेत. उपचारांची गरज नाही.
काही दिवसांपूर्वी हाच रुग्ण माझ्याकडे आला. त्याच्या रक्तातील साखर वाढलेली होती. त्याच्या पायावरही सूज होती. एकदा पुन्हा त्यांची
तपासणी करण्यात आली. जेव्हा सर्व रिपोर्ट आले तेव्हा असे दिसून आले की, रुग्णाचे लिव्हर योग्य प्रकारे कार्य करत नाही. ते असाधारण वाटले. तसेच त्यांच्या शरीरातील अल्बुमिनची मात्रा घटलेली होती. यामुळे त्यांच्या पायावर सूज येत होती. तेव्हा त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितली. त्यांना सोरायसिस आॅफ लिव्हर असे निदान झाले. त्यांच्या पायावर सूज आणि प्लेटलेट काउंट कमी होण्याचे ते चिन्ह होते.
सोरायसिस आॅफ लिव्हर या आजारात लिव्हर योग्य प्रकारे काम करत नाही. कारण यात ब-याच अवधीपासून नुकसान होत असते. हा आजार हळूहळू काही वर्षांत दिसू लागतो. सुरुवातीला यात काही लक्षणे दिसून येत नाही. आजार जसजसा वाढतो तसे रुग्णांना थकवा, अशक्तपणा, चिडचिडेपणा, पायावर सूज, त्वचा पिवळी पडणे, पोटात पाणी साचणे, त्वचेवर झुरळासारख्या चकत्या पडणे आणि प्लेटलेट काउंट कमी होतात. पोटात जे पाणी भरलेले असते त्यात इन्फेक्शन होते. त्याशिवाय इतर कॉम्प्लिकेशन म्हणजे हेपेटिक अॅनसेफेलोपथी आहे. यात अन्ननलिका आणि पोटातील नसात ब्लीडिंग होते. काही वेळा ते लिव्हर कॅन्सरचे असल्याचे दिसून येते. हेपेटिक अॅनसेफेलोपॅथीमध्ये काही वेळा भ्रम होताे. कारण यात रुग्ण बेशुद्ध पडतो. सोरायसिस अॉफ लिव्हर दारू, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी यामुळे होऊ शकतो. जर काही वर्षांपासून एखादी व्यक्ती दिवसातून दोन-तीन वेळा ड्रिंक घेत असेल तर त्याला सोरायसिसचा त्रास होऊ शकतो. माझ्याकडे आलेला रुग्ण दारू पीत नव्हता तरी त्याला सोरायसिस नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारामुळे झाला.
फॅटी लिव्हर म्हणजे काय?
दारू पिणा-या बहुतांश लोकांना फॅटी लिव्हर (लिव्हरचा आकार वाढणे)चा त्रास जाणवतो. काही लोकांमध्ये काही औषधी किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डरच्या कारणाने होते. काही केसमध्ये डॉक्टरांना अचंबा वाटतो, दारू न पिणा-या रुग्णंाचे लिव्हर कसे वाढले? परंतु यात कोलेस्टेरॉल, स्थूलपणा व टाइप २ च्या डायबिटीस कारणे होती.
लिव्हर मोठे होणे
लोकांत वाढलेल्या लिव्हरमुळे त्रास होत नाही. तथापि, काही लोकांमध्ये याचा आकार वाढल्याने गंभीर परिणाम होतात. याला एनएएफएलडी असे म्हणतात. म्हणजे नॉन अल्कोहोलिक स्टेटोहिपॅटायटिस (नॅश) अशा प्रकारच्या स्थितीत लिव्हरच्या पेशीमध्ये अतिरिक्त चरबी साचते. काही वेळा यात सूज किंवा सोरायसिस किंवा लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता असते.
सोरायसिस आॅफ लिव्हरचे उपचार
कोणत्या लिव्हरमध्ये िकती नुकसान झाले आहे, सोरायसिसचा उपचार त्यावर अाधारित असतो. पहिला उद्देश लिव्हरमधील खराब टिश्यू हटवणे असा असतो. हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागते. तरीही या पर्यायावर काम केले जाते.
>जर लिव्हर दारूमुळे खराब झाले असेल तर सर्वप्रथम त्याला नियंत्रित केले जाते. जर काेणास एकदम दारू सोडवत नसेल तर त्याला व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यास सांगण्यात येते.
>दारूविना कोणाच्या लिव्हरचा आकार वाढत असेल तर साखर नियंत्रित केली जाते.
>हिपॅटायटिसपासून हाेणा-या सोरायसिसमध्ये लिव्हरच्या पेशी वाचवण्यासाठी औषधी दिली जाते.
>काही प्रकारच्या सोरायसिस ऑफ लिव्हरमध्ये उपचार धीम्या गतीने चालतो. उदाहरणार्थ, ज्या लोकांचा प्रायमरी बायलियरी सोरायसिस असतो.
>अन्य उपचारांत खाज, थकवा, दुखणे इत्यादी लक्षणांपासून सुटका होते. रुग्णास ओस्टिओपोरायसिसपासून बचाव करता येण्यासाठी पोषक घटक घेण्यास सांगितले जाते.
>अनेक रुग्णांच्या पोटात पाणी भरते. अॅडेमा आणि अॅससिटेसला कमी मिठाच्या अाहारापासून नियंत्रण करता येते. जर पोटात पाणी खूप साचले तर शरीराचा भार कमी करण्यासाठी ते काढून टाकण्यात येते.
>रक्तदाबाच्या औषधाने लिव्हरला रक्तपुरवठा करणा-या शिरावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे ब्लीडिंग थांबवले जाऊ शकते. याला पोर्टल हायपरटेन्शन असे म्हणतात.ज्यातून ब्लीडिंग होऊ शकते अशा अन्ननलिका किंवा पोटात वाढलेल्या शिरा पाहिल्या जातात.
जर पोटातील शिरा फुगत असतील तर उपचार करणे आवश्यक असते. जर तुम्हाला हा उपचार सहन होत नसेल तर बँड लॅगेशनच्या प्रक्रियेतून जावे लागते. गंभीर प्रकरणात तुमच्या नसांना ट्रान्सगुलर इंट्राहेपटिक पोर्टोसिस्टॅमिक शंट (टिप्स) लावाव्या लागतात.
संक्रमण : यासाठी तुम्हाला अँटिबायोटिक्स दिली जातात. इन्फ्लुएंझा, न्यूमोनिया या हिपॅटायटिससाठी लसीकरण दिले जाते.
लिव्हर कॅन्सरची शक्यता : यात डॉक्टर नियमितपणे ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी करण्यास सांगतात.
हेपटिक अॅनसिफेलोपॅथी : यात लिव्हरच्या खराब फंक्शनमुळे रक्तातील टॉक्सिन काढण्यासाठी औषधे दिली जातात.
लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी : सोरायसिसच्या गंभीर प्रकरणात जेव्हा लिव्हर काम करत नाही, तेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची आवश्यकता असते. हा एकमेव पर्याय असतो. लिव्हर ट्रान्सप्लांट ही एक प्रक्रिया असून यात एक उत्तम लिव्हर बसवण्यात येते. लिव्हर ट्रान्सप्लांट बहुतांश सोरायसिस आॅफ लिव्हरबाबतीच होते. काही वेळा दारूमुळे खराब झालेले लिव्हर बदलण्यासाठी सहा महिने उपचार घ्यावा लागतो.
लेखक हे एमडी, डीपीएचडी, डी. डायबेटॉलॉजिस्ट, एफआरएचएच (लंडन), चीफ डायबेटॉलॉजिस्ट असून ते श्रेया डायबिटीस केअर सेंटर कार्यरत आहे.