आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोरायसिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोरायसिस एक असा त्वचारोग आहे, ज्यात त्वचेच्या कोशिकांचे (पेशींचा समूह) जीवनचक्रच बदलते. या कारणामुळे पेशींची वेगाने त्वचेच्या पृष्ठभागावर निर्मिती होऊ लागते. त्वचेवरील ही अतिरिक्त कोशिका जाड, चिपचिपे शल्क आणि सुकलेले लालसर खाजवल्यावर बनतात तशा चकत्या बनतात. त्यात कधी-कधी वेदनाही होतात. हे सर्व कधी-कधी गंभीर स्वरूप घेते.
सोराइसिस काय होते: सोरायसिसच्या वास्तविक कारणांसंबंधी पूर्णपणे सध्या तरी कळलेले नाही. मात्र असे मानले जाते की, ही समस्या शरीरातील कोशिकांसह इम्युनिटी तंत्राच्या (प्रतिकारशक्ती) बिघाडामुळे होते. विशेष स्वरूपात रक्तातील पांढऱ्या पेशीतील एका प्रकारामुळे होतो. त्याला टी लिम्फोसाइट अथवा सेल (पेशी) म्हणतात. ज्या लोकांना सोरायसिस होतो वा असतो, त्यांच्या टी सेल त्वचेच्या आरोग्यपूर्ण कोशिकांना आपला निशाणा बनवतात.
रिस्क फॅक्टर (जोखमीचा घटक) सोरायसिस कुणालाही होऊ शकतो. मात्र काही अशी कारणे आहेत, जी एखादा सोरायसिसच्या कचाट्यात येण्याची शक्यता वाढवतात. जसे कौटुंबिक इतिहास, जिवाणू (बॅक्टेरिया) आणि व्हायरसचे (विषाणू) संक्रमण, जाडेपणा, धूम्रपान, तणावाच्या कारणाने शरीराचे इम्यून तंत्र म्हणजेच प्रतिकारशक्ती प्रभावित होते. तसेच अत्याधिक तणावदेखील सोरायसिसची शंका वाढवतो.
लक्षणे: एक व्यक्ती ते दुसऱ्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणे वेगवेगळी असू शकतात. म्हणजे ही लक्षणे व्यक्तिपरत्वे भिन्न असतात. मात्र बहुतांश व्यक्तींमध्ये लक्षणे सामान्य रूपात दिसून येतात. जसे की, त्वचेवर लाल रंगाच्या चकत्या, ज्यावर चंदेरी रंगाचे शल्क (खवले वा पोपडी) असते. शल्क असलेले दाग (मुलांमध्ये दिसून येतात), रुक्ष, खडबडीत, ओरखडे असलेली त्वचा, ज्यातून रक्तही येऊ शकते. जाड आणि मांसात जरा सामान्यांच्या तुलनेत अधिक फसलेली बोटांची नखे, सुजलेले आणि कडे जोड असलेले असते. सोरायसिसची लक्षणे तेव्हाच गंभीर होतात, जेव्हा संक्रमणासारखी गळ्यात रुक्षपणा अथवा त्वचेचे संक्रमण, त्वचेवर मार लागणे, सारखे कापले जाणे, ओरखडा येणे, एखाद्या किड्याचा काटा टोचणे वा त्या किड्याचा चावा घेणे अथवा गंभीर सनबर्न चटका, तणाव, थंडीचा हंगाम, धूम्रपान करणे, दारूचे अत्याधिक सेवन व बायपोलार डिसऑर्डर आणि उच्चरक्तदाबासाठी घेतली जाणारी काही औषधेदेखील सोरायसीसचे कारण बनू शकतात.
तपासणी: फिजिकल तपासणी आणि मेडिकल हिस्ट्रीद्वारे याची तपासणी केली जाते. त्वचा, डोके आणि नखे यांची नियमित तपासणी केली जाते. अधिक गंभीर प्रकरणात स्किन बॉयोप्सीदेखील करण्याची आवश्यकता पडते. यासाठी रुग्णाच्या त्वचेचा छोटासा नमुना घेतला जातो. त्वचेची बॉयोप्सी सामान्यत: अॅनेस्थेशिया (भूल) देऊनच केली जाते.
उपचार: उपचारांचा प्राथमिक उद्देश त्वचेवरील पेशींना अत्याधिक वेगाने विकसित होण्यापासून रोखणे हेच आहे. औषधांबरोबरच थोडा वेळ उन्हातही थांबा. यामुळे सोरायसिस आजार गंभीर होण्यापासून आपल्याला रोखणे शक्य होईल. याशिवाय सोरायसिसच्या उपचाराच्या अनेक पद्धतीदेखील प्रचलित
आहेत. जसे...
इस लाइट थेरपी: या उपचारात नैसर्गिक अथवा कृत्रिम अल्ट्रा व्हायोलेट किरणांचाही उपयोग केला जातो. फोटोकेमोथेरपी वा सेरालेन प्लस अल्ट्रा व्हायोलेट. यात रुग्णाला प्रकाशाप्रति संवेदनशील बनवणारी औषधे दिली जातात. सोरायसिसच्या जास्तीच्या गंभीर प्रकरणात या थेरपीचा उपयोग केला जातो. यात घालमेल होणे, डोकेदुखी, आग आग होणे आणि खाज येण्याची तक्रार असते. कोणी काही कालावधीनंतर बरे होतात. मात्र, सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर दुष्प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो. हा उपचार त्वचेला प्रकाशाबाबत अधिक संवेदनशील बनवतो. बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये प्रोटीनयुक्त औषधी, इंजेक्शन वा आयव्हीद्वारे दिली जाते. हा टी सेल(पेशी)च्या हालचालींना रोखतो.
एक्झायमर लेसर: या थेरपीचा उपयोग कमी वा सामान्य सोरायसिससाठी केला जातो. यात केवळ प्रभावित वा परिणाम झालेल्या त्वचेचाच उपचार केला जातो. यामुळे परिणाम वा नुकसान झालेल्या त्वचेच्या भागावर, विशेषत: वेव्हलेंथच्या प्रकाशाच्या नियंत्रित किरणांना सरळ सोरायसिसच्या शल्कावर (खवले, पोपडे) शल्क बनण्याची प्रक्रिया आणि सूज कमी करण्यासाठी टाकले जातात. खाजेच्या आसपासच्या निरोगी त्वचेला नुकसान पोहोचत नाही. पारंपरिक फोटोथेरपीच्या तुलनेत यात कमी सेशन घेतले जातात. कारण यात अधिक शक्तिशाली किरणांचा वापर केला जातो. या उपचाराच्या पश्चात त्वचेचे लालपण आणि पोपडे होण्यासारखी लक्षणे दिसू लागतात.
लेखक हे वरिष्ठ सल्लागार, त्वचारोग विशेषज्ञ,बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.