आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जरोख्यांच्या व्याजदरातील चढ-उतारातून फायदा मिळवू शकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार, फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड आॅफ इंडियाचे सदस्य.
गेल्या काही वर्षांत महागाईचे चढे दर आणि व्याजदराचा तुमच्या पर्सनल फायनान्सला मोठा फटका बसला आहे. चढे दर राहिल्याने तुम्हाला कर्जाच्या हप्त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे खर्चात कपात करावी लागत असेल. या कारणामुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक पत धोरणात व्याजदरात कपातीची अपेक्षा असते. परंतु व्याजदरात चढ-उतार होत असल्याने तुमच्या गुंतवणुकीवरही परिणाम होत असतो. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा लघु मुदती ठरावीक उत्पन्नाची गुंतवणूक म्हणजे कर्जरोखे, मुदती ठेवी इत्यादी चांगला परतावा देतात, पण व्याजदर कमी झाल्यानंतर दीर्घ अवधीच्या डेट म्युच्युअल फंडात गुंतवणुकीस चांगली संधी मिळते. तथापि, यात छोट्या गुंतवणूकदारांना फार रुची नसते. कारण त्यांना डेट मार्केटची माहिती नसते. अनेक गुंतवणूक सल्लागारसुद्धा यात गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीत. तरीही या योजनेत लोकांना चांगला पर्याय मिळतो. ज्यांना व्याजाच्या चढ-उतारातून पैसे कमवायचे असतात त्यांच्यासाठी ही चांगली संधी ठरते. दीर्घ मुदतीच्या कर्जरोख्याबाबत आपण समजून घेऊया.

इन्कम फंड्स
हे फंड्स मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट बाँड्स, डिबेंचर्स आणि शासकीय कर्जरोख्यात गंुतवणूक करतात. ट्रेझरी बिल्स, कॉल मनी मार्केट आणि सुरक्षित कर्जरोख्यांचा वापर पोर्टफोलियोला विभाजित करण्यासाठी करतात. अधिक लिक्विडिटी आणि कमी जोखमीसाठी फंड मॅनेजर्स उच्च दराच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. अशी कोणतीही योजना, जी परतावा वाढवते, त्यात काही प्रमाणात कमी दर असलेल्या बाँड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. इन्कम फंड्सचा उद्देश कुपन पेमेंटद्वारे सातत्याने उत्पन्न देणे असा आहे. हा प्रामुख्याने कॉर्पोरेट बाँड्समधून मिळतो. पण यात भांडवली फायदाही मिळतो. कारण बहुतांश सिक्युरिटीजची खरेदी-विक्री होत असते. व्याजदरातील चढ-उताराचा परिणाम कुपनद्वारे पेमेंट आणि सिक्युरिटीजच्या किमतीवर पडतो. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बाँडद्वारा कुपन पेमेंट वाढते. पण यात सरकारी कर्जरोख्याच्या किमतीही वाढतात. पण कुपन पेमेंटचे दर कमी होतात. कारण एक इन्कम फंड दोन्ही प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतो. यासाठी जोखमीत संतुलन असते. म्हणूनच व्याजदर जेव्हा चढे असतात तेव्हा या फंड्समध्ये चांगली संधी असते. कारण कुपन पेमेंट जास्त असते, तर दुसरीकडे व्याजदर घटल्याने सरकारी कर्जरोखे चांगला परतावा देतात.

गिल्ट फंड्स
नावावरूनच असे दिसते की, या फंडाची गुंतवणूक सरकारी कर्जरोख्यातच असते. यात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक असते. याची परिपक्वतेची मुदत जास्त असते. जी-सॅक म्हणजे सरकारी कर्जरोख्यावर व्याजदर वाढल्याने किंवा घटल्याने सर्वाधिक परिणाम होतो. यादृष्टीने डेट फंडात गिल्ट फंड सर्वाधिक चढ-उतार असलेला मानला जातो. व्याजदराच्या विरुद्ध दिशेला सरकारी कर्जरोखे चालतात. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा सध्याच्या सरकारी कर्जरोख्यात सौदे डिस्काउंटमध्ये होतात. कारण या काळात नवे सिक्युरिटी दर कुपनदराबरोबर मिळू लागतात. यादरम्यान या फंडात परतावा कमी होतो. याविरुद्ध व्याजदर वाढतात तेव्हा सध्याच्या सिक्युरिटीजचे भाव वाढतात. त्यावर प्रीमियम द्यावा लागतो. अशा वेळी हे फंड्स जास्तीचा परतावा देतात. कारण व्याजाचे दर दोन्ही बाजूस जातात. या फंडात जास्ती चढ-उतार असतात, परंतु हे चढ-उतारच गुंतवणुकीस चांगला पर्याय उपलब्ध करतात. काही गिल्ट फंडात कोलेटरलाइझ्ड लेंडिग अँड बॉरोइंग (सीबीएलओ) आणि अन्य मनी मार्केट इन्स्ट्रूमेंट्मध्ये चांगली खरेदी होते. यासाठी विविध फंडांतून मिळणा-या परताव्यात खूप फरक असतो. जो गुंतवणूकदार जोखीम उचलू शकतो आणि २ ते ३ वर्षांपर्यंत ही गुंतवणूक ठेवू शकतो त्यास या फंडातून चांगला परतावा मिळतो.

का निवडले पाहिजे?
जोखीम घेण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून आहे. इन्कम फंड्स गिल्ट फंडाच्या तुलनेत कमी चढ-उतार असणारे आहेत. त्यात गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलियोमध्ये चढ-उतार नको असतो. त्यांना इन्कम फंड चांगला वाटतो. नव्या गुंतवणूकदारांना व्याजदरातील बदल टिपणे अवघड जाते, परंतु दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणार असाल तर या फंडाचा फायदा घेता येतो. हे दीर्घ मुदतीचे कर्जरोखे असतील आणि तुम्हाला यातून नफा कमवायचा असेल तर या फंडात कमीत कमी २ ते ३ वर्षे गुंतवणूक करता येईल. २०१४ मध्ये फंडातील कराची कक्षाही बदलण्यात आली आहे. आता तीन वर्षांपासून पहिल्यांदा रक्कम काढल्यास शॉर्ट टर्म गेन टॅक्स लागेल. तो तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असेल. इन्कम फंड्ससोबत गिल्ट फंड्ससुद्धा दीर्घ कालावधीसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. काही चांगल्या फंड्सनी दहा वर्षांच्या गुंतवणुकीवर ९ ते १० टक्के परतावा दिला आहे. कर भरल्यानंतरही तो अन्य इन्स्ट्रूमेंटपेक्षा चांगला मानला जातो. तुमच्या अॅसेट अलोकेशनमध्ये या फंडास दीर्घ मुदतीसाठी डेट एक्सपोझरमध्ये सामील करता येते.

गुंतवणूक कशी कराल?
या फंडात एकतर एकदम रक्कम लावावी लागणार आहे किंवा नियमित रक्कम भरावी लागेल. छोटे गुंतवणूकदार एसआयपीद्वारे यात गुंतवणूक करू शकतात. एकदम गुंतवणूक करणार असाल तर सिस्टिमॅटिक ट्रान्सफर फंडातूनही पैसे काढू शकता. येथेही कराकडे लक्ष दिले पाहिजे. तीन वर्षांच्या आत जो आपली गुंतवणूक काढून घेईल त्याला मिळालेला फायदा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानला जाईल. दीर्घ मुदतीचे डेट म्युच्युअल फंड्स इंडेक्सेशनच्या फायद्याचे असल्याने चांगला पर्याय मानला जाऊ शकतो. दोहोत थोडी माहिती असेल तर चांगला फायदा मिळू शकतो.