आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क टाइम्समधून: अमेरिकी मूल्यांची जाणीव ट्रम्प यांना नाही : ओबामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी आपल्या भाषणात हिलरी क्लिंटन यांच्यावर अमेरिकेच्या सुरक्षेशी त्यांनी खेळी केल्याचे, अमेरिकी मूल्ये पायदळी तुडवल्याचे थेट आरोप केले होते. त्याला उत्तर देताना फिलाडेल्फिया येथील डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेळाव्यात बोलताना ओबामा यांनी म्हटले, ‘हिलरी क्लिंटन समर्थ महिला उमेदवार असून त्यांना देशाबरोबरच जागतिक राजकारणाचा सखोल अभ्यास आहे. त्या अमेरिकेच्या उत्कृष्ट अध्यक्षा ठरतील, असे मला वाटते. त्या माझ्या राजकीय वारस असल्याचे अमेरिकींनी समजावे. व्हाइट हाऊससाठी आतापर्यंतच्या त्या सर्वाधिक योग्य नेत्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी मूल्यांची कधी जाणीवच नाही. त्यांना मतदान करू नका,’ असे आवाहन त्यांनी केले. मला जशी आजवर साथ दिलीत तशीच साथ हिलरींना द्यावी, असे ओबामा यांनी सांगितले. ट्रम्प दुर्जनांचे नेते आहेत, असे सांगून ओबामा म्हणाले,’हिलरी यांच्यात अमेरिकेला अशा लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे.’
ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर देताना आेबामा यांनी म्हटले, ‘हिलरी केवळ माझ्या सहकारी म्हणून माझ्यासाठीच नव्हे, तर अमेरिकी नागरिकांसाठी सर्वाधिक विश्वासू आणि प्रामाणिक नेत्या आहेत. आज अमेरिकींच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि त्यांना सुरक्षा देण्यासाठी अशाच लढवय्या नेत्यांची गरज आहे.’ आमच्या सहकार्यासाठी हिलरी नेहमीच आमच्या सोबत राहिल्या. बनी सँडर्स यांच्या समर्थकांना उद्देशून ते बोलत होते. या
समर्थकांचा हिलरींना आजही विरोध कायम अाहे. ओबामा यांनी अत्यंत कठोर शब्दात ट्रम्प यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांच्यापासून देशाला धोका असून कोणीही उठून आमची मूल्ये पायदळी तुडवत आहे. मग तो फॅसिस्ट असो वा कम्युनिस्ट,
जिहादी, देशातील कोणी दुर्जन. यांचा पराभव ठरलेला आहे. हिलरी यांचे ठामपणे समर्थन करणारे ओबामा यांचे भाषण निश्चितपणे
सर्व अमेरिकींवर प्रभाव टाकणारे ठरले. तसे पाहता काही वर्षांपूर्वी हिलरी आणि ओबामा हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते.
ओबामा यांनी ट्रम्प यांचा नामोल्लेख न करता म्हटले, ते रिपब्लिकन नाहीत ना कन्झर्व्हेटिव्ह. त्यांच्याकडे आपल्या देशातील समस्या सोडवण्याच्या ठोस उपाययोजना नाहीत. तशा असत्या तर त्यांनी सांगितल्या असत्या. ते केवळ आरोप करू शकतात. द्वेषभावना पसरवू शकतात. संताप व्यक्त करू शकतात. ट्रम्प यांनी ओबामा यांच्या अमेरिकी राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना ओबामा म्हणाले, त्यांच्याकडे जन्मदाखला आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण तुम्ही लोकांनी माझ्यासाठी जे केले तेच आता हिलरींसाठी करा. त्यांचाही मला स्वीकारले तसा स्वीकार करा. या मेळाव्याच्या प्रारंभी माजी संरक्षणमंत्री आणि सीआयएचे माजी प्रमुख लियोन इ. पॅनेटा यांचेही भाषण झाले. तेव्हा अनेक लोक “नो मोअर वॉर’च्या घोषणा देत होते. कारण डेमोक्रॅटिक पक्षात नेतृत्वावरून दोन गट आहेत. कारण डेमोक्रॅटिकच्या समर्थकांत तरुणांची संख्या अधिक आहे. मेळाव्याचा हा दिवस ओबामा समर्थकांसाठी मोठ्या बदलाचा दिवस होता. या वेळी पक्षाच्या काही नेत्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटलेले होते. कारण ओबामा यांना निरोप देण्याच्या ते मन:स्थितीत नव्हते. हिलरी यांचे नवे नेतृत्व मान्य नसणाऱ्यांत अनेक व्यक्तींचा समावेश होता. ओबामा यांनाच तिसऱ्यांदा संधी दिली असती, असे त्यापैकी काहींचे मत होते. ओबामा यांनी शेवटी सांगितले, आपली लोकशाही दिखाव्यासाठी नाही. अमेरिका “यस ही विल’ असाही देश नाही. अमेरिका “यस, वुई कॅन’ असा देश आहे.
पुढे वाचा... देशात सगळेच आलबेल नाही हे हिलरी यांनी समजून घ्यावे
बातम्या आणखी आहेत...