आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकच्या स्वप्नांना इतके महत्त्व का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडीजच्या विरोधात पहिल्या कसोटीमध्ये विक्रमी अंतर राखून मिळालेला विजय हा क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाचा दिवस होता. खेळाडूंची कठोर मेहनत आणि समर्पणभावनेस माझा सलाम! परंतु क्रीडा क्षेत्रात फक्त क्रिकेटमध्येच जगाला आपला जोश आणि क्षमतेची झलक दाखवणार आहोत काय, असा प्रश्न उपस्थित होतो. ३ हजार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या आठवड्यापासून प्रारंभ होत आहेत. तेथे २०७ देश आपल्या प्रतिभेचा चमत्कार दाखवण्याच्या उद्देशाने दाखल होतात. मी क्रिकेटच्या विरोधात नाही. पण एखाद्या देशाची प्रतिष्ठा आणि सौभाग्यासाठी या खेळांना जितके महत्त्व दिले जाते ते आपण समजून घ्यायला हवे. या वर्षी आनंदाची बाब म्हणजे विविध क्रीडा प्रकारांतील १२० खेळाडूंचे आजवरचे सर्वात मोठे प्रतिनिधी मंडळ आपण रिओला पाठवत आहोत. परंतु त्यांना सव्वा कोटी जनतेचे पुरेसे प्रोत्साहन मिळाले आहे काय? त्यांना प्रदर्शनास सेकंदातील दशांश हिस्सा सुधारण्यासाठी चार वर्षांची कठोर मेहनत करावी लागते. त्यांच्यामुळेच देशाला सन्मान प्राप्त होतो. स्पर्धा इतकी कठोर असते की त्यांना ज्या सुविधा देण्यात येतात त्या मिळण्याचा त्यांना हक्कच आहे, असे मला खूप आधीपासूनच वाटत होते.
देशात अशा प्रतिभावंतांची कमतरता नाही. परंतु खेळण्याची इच्छा व सुविधांची मात्र कमतरता जाणवते. बहुतांश धावपटू तिसऱ्या दर्जाच्या शहरातील किंवा गावखेड्यातील आहेत. महानगरात तर ते अभावानेच आढळून येतात. आपल्या शिक्षण व्यवस्थेतील मूळ समस्या अशी की, आपण खेळांना महत्त्व दिलेच नाही. आॅलिम्पिक केवळ पदकापुरतेच मर्यादित नाही. आपण चांगल्या सुविधा देऊ शकलो व तरुणांना प्रेरित करून त्यांची प्रतिभा विकसित करू शकलो तर दहा वर्षांनंतर आपणच त्याचे आयोजनही करू शकतो. मग जो विकास होईल तो कल्पनातीत असेल.
बातम्या आणखी आहेत...