आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकशी लढण्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील सैन्यावर झालेल्या हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून आल्या. एक - पाकिस्तानला जागतिक स्तरावर वेगळे पाडायचे. दुसरी प्रतिक्रिया : जशास तसे उत्तर देण्याची आहे. पाकला जागतिक स्तरावर एकटे पाडणे खूप धोकादायक पाऊल ठरू शकते. यामुळे लोकनियुक्त सरकार कमकुवत ठरेल आणि दहशतवादी गटांना प्रोत्साहन मिळेल. उरीमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या १७ सैनिकांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून रणनीती आखण्याची गरज आहे. लोकांनी निवडलेले सरकार आणि लष्कर अशी पाकमध्ये दोन प्रमुख पात्रे आहेत. पाकमध्ये निपजलेल्या दहशतवादामागे यांचाच हात आहे. पाकचे पंतप्रधान दहशतवादास आळा घालू शकतील असे जर कोणाला वाटत असेल तर त्याची गणना मूर्खात केली जाईल. यात दोन प्रकारच्या गोष्टी करता येतील. पाकची गचांडी धरण्याची भारताची क्षमता. दुसरी छुप्या पद्धतीने पाक सैन्याला सतत अस्थिर ठेवण्याची आणि खिळखिळे करण्याची प्रक्रिया. पाक फौजा अस्थिर करण्याचे प्रयत्न उघडपणे बोलून दाखवणे योग्य नाही, परंतु पाकला आयात -निर्यात करताना भारतीय व्यापारावर अवलंबून ठेवून त्याची गचांडी पकडण्याची ताकद विकसित करता येईल. इस्रायलचा कट्टर शत्रू पॅलेस्टाइन इस्रायलमधून २० हजार कोटींचे साहित्य आयात करतो. मात्र भारताशी पाकचा व्यवहार नगण्य आहे. त्यामुळे पाकचेच नुकसान होईल. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याने व्यापार गमावून बसण्याची नामुष्की पाकवर ओढवेल. पाकिस्तानशी व्यापार वाढवल्यास उद्या चालून भारताला तेथील लोकशाही सरकारशी सौदेबाजी करण्याची ताकद देईल. जगात मानाच्या दृष्टीने भारत पाकपेक्षा खूप पुढे गेला आहे. पाक आपल्या शेजारी असलेला उपद्रवी घटक आहे. त्याच्याशी तसेच वागले पाहिजे.
दिवाकर झुरानी, २७ ,
द फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी, टफ्ट युनिव्हर्सिटी, अमेरिका
बातम्या आणखी आहेत...