आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेला धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील मुस्लिम समाजावर होत असलेल्या कारवाया आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोग्या आहेत. समानता, स्वातंत्र्य, बंधुभावाच्या घोषणा देणाऱ्या देशावर दहशतवादी हल्ले झाल्यानंतर या देशात निराशेचे सूर उमटू लागले. त्यामुळे शासनाने मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्वातंत्र्याची काळजी करण्याचे सोडून दिले. फ्रान्समध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनात असलेली दरी आणखी रुंदावली आहे. फ्रान्समध्ये समुद्रकिनाऱ्यावर मुस्लिम महिलांना बुर्किनी वापरण्यास बंदी घालण्यात आली. बुर्किनी, बुरखा तसेच बिकिनी मिळून तयार करण्यात आलेला स्विमिंग सूट आहे. हा सूट ऑस्ट्रेलियन डिझायनर अहेदा जनैत्ती यांनी मुस्लिम महिलांसाठी खास बिकिनीऐवजी अशा प्रकारचा सूट वापरण्यासाठी तयार केला होता. सुरुवातीला कान, नीस तसेच कोर्सिकाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचबरोबर देशातील इतर काही समुद्रकिनाऱ्यावर बुर्किनी वापरण्यास बंदी घालण्यात आली. परंतु उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा लोकानुनय करण्यासाठी हे प्रकरणाला अधिकच रंग देण्यात आला. न्यायालयानेही सुरुवातीला बुर्किनी बिकिनीवर बंदी योग्य असल्याचे म्हटले. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उच्च न्यायालयाने यावर बंदी घालणे योग्य नसल्याचे म्हटले.
कानचे महापौर डेव्हिड लिस्नार्ड यांनी बंदी योग्य असल्याचे सांगून बुर्किनी इस्लामी दहशतवादाचे प्रतीक आहे. यामुळेच उष्ण हवामानात असा पोशाख वापरणे योग्य नाही, असे म्हटले. तर अनेकांनी या पोशाखामुळे समुद्राचे पाणी खराब होते अशा प्रतिक्रिया दिल्या. त्यांचे म्हणणे कोणत्याही धर्मनिरपेक्ष देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. मुस्लिम समाजाशी अशा प्रकारचे वर्तन केल्याने फ्रान्सने समानता, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षतेची प्रतिमा गमावली आहे. राष्ट्रवादी पक्षांकडून बंदीचे स्वागत होणे म्हणजे फ्रान्सचा राष्ट्रवादी पाया डळमळीत करणारी भूमिका वाटते. त्याचबरोबर दहा टक्के मुस्लिम समाज असलेल्या लोकसंख्येच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करणे फ्रान्सला महागात पडू शकते.
बातम्या आणखी आहेत...