आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायुसेनेच्या बेपत्ता विमानामुळे देशभक्तीवर प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांपूर्वी बंगालच्या खाडीवरून जाणारे विमान गायब झाले. यात ११ वायुसैनिक, २ सैनिक तसेच नौसेना आणि तटरक्षक दलाचे प्रत्येकी एक जवान बसलेले होते. सुरुवातीच्या माहितीनुसार माध्यमाने या घटनेची दखल घेतली नाही. यावरून आम्हा भारतीयांची प्रवृत्ती समजून येते. बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या बाबतीत सहानुभूती दाखवणाऱ्यांची संख्या खूप कमी का? तटस्थपणे विचार करा- तरुणांमध्ये लष्कर, नौसेना किंवा वायुसेनेत जाण्याऐवजी एखाद्या सरकारी नोकरीत किंवा एमएनसीमध्ये जाण्याचे आकर्षण का आहे? आपण जगातील प्रत्येक देशाच्या संकटकाळात उभे राहतो. मग देशातील या शूरवीरांच्या सुरक्षिततेसाठी आपले हात प्रार्थनेसाठी का जोडले जात नाहीत. त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन करणे आपले कर्तव्य नाही का?
खरे तर देशभक्तीची भावना एक नारा बनत चालली आहे. ते केवळ प्रतीकच बनले आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणे इथपर्यंतच आपली मजल जाते. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली, निदान आपल्या देशभक्तीची कल्पना खोलवर रुजलेली पाहिजे. ती वाढायला हवी. लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, त्याचे सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक स्तर वाढवणे म्हणजे देशभक्तीच आहे. अशा प्रकारे देशभक्ती वरवरचा नारा नव्हे. ती जीवनशैली व्हायला हवी. सैन्य, पोलिस, रक्षा दले, न्यायालये लोकशाही यंत्रणा, संविधान, कार्यपालिका या स्वतंत्र भारताच्या मूळ आधार आहेत. त्यांना बळकटी आणणे हीसुद्धा एकप्रकारे देशभक्तीच आहे. राज्यातील पाणी वाटपावरून अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही धुडकावला जातो, पण आपली देशभक्ती या अनादराचा विरोध करण्यास बाध्य करत नाही. पोलिसांकडून खूप काम करून घेतले जाते, पण आपण गप्प बसतो. महाशक्ती बनायचे असेल तर देशभक्ती हीच जीवनशैली झाली पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...