आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर वाॅरचा मुकाबला करण्याची तयारीच खरी सुरक्षा देईल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाज प्रत्येकाच्या हातात सेलफाेन अाणि संगणक अाहे, अाम्ही डिजिटल इंडिया साकारण्याच्या प्रयत्नात अाहाेत. देशात सायबर क्राइम एक माेठे अाव्हान बनून समाेर उभे ठाकले अाहे. संगणकीय ज्ञान हे अाता एखाद्या विषयाच्या रूपात कुण्या शाळा किंवा विद्यापीठाचा माेहताज राहिलेला नाही. मात्र सायबर गुन्ह्याविषयी जागृती वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालयांनाच पुढे यावे लागणार अाहे, जेणेकरून युवा शक्तीला सायबर सुरक्षेची मूलभूत माहिती मिळू शकेल. सायबर कायदा प्रभावीपणे लागू करण्यासाठी प्रत्येेक व्यक्तीला ताे समजून घ्यावा लागेल. अन्यथा ही अतिशयाेेक्ती नाही की संभाव्य विश्वयुद्ध संगणकीय व्हायरसद्वारे लढले जाईल अाणि अातापर्यंतचे ते सर्वात विनाशकारी युद्ध ठरेल. ज्यामध्ये स्वयंचलित यंत्रे अापल्याविरुद्ध असतील. अापणास याची कल्पनादेखील नाही की, अतिरेकी काेणत्या डेटाचा वापर काेणत्या कार्यासाठी करतील. केवळ संरक्षणच नव्हे तर सार्वजनिक डेटाच्या अाणि प्रत्येक घटकातील लाेकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याची गरज अाहे. सायबर गुन्हे तपासनीस अाणि कायदेेतज्ञांच्या मदतीने संभाव्य गुन्हेविषयक घटनांची माहिती अापण मिळवू शकू. भारतात सायबर क्राइमच्या संदर्भात माहिती-तंत्रज्ञान कायदा २००० अाणि माहिती तंत्रज्ञान (संशाेधन) कायदा २००८ लागू अाहे. परंतु या श्रेणीतील काही प्रकरणात भादंवि, काॅपीराइट कायदा १९५७, कंपनी कायदा, सरकारी गाेपनीयता कायदा अाणि दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे जनता अाणि सरकार दाेघांनीही ‘अपडेट’ असायला हवे. अाज प्रत्येक जण डेटा एंट्री करताे. त्यामुळे सर्वांनाच डेटा सुरक्षित ठेवावा लागणार अाहे. मग ताे व्हाॅट्सअॅप, फेसबुुकवरील का असेना. देशातील संगणक तज्ज्ञांना अत्याधुनिक ज्ञानाने समृद्ध करून सामाेरे अाणले पाहिजे.
अमन शर्मा, २६
एलुमनाई वेल्लाेर इन्स्टिट्यूट अाॅफ टेक्नाॅलाॅजी, प्राेजेक्ट एलुमनाई अायअायएसी. बेंगलुरू.
बातम्या आणखी आहेत...