आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकांना तंत्रसज्ज सुरक्षा द्या, लढाई आपण जिंकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरीमध्ये दहशतवादी हल्ल्यात १८ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे. पाकिस्तानच्या या करणीवर वृत्तपत्रे, टीव्ही आणि सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केवळ निषेध व्यक्त करून, राजकीय भूमिकेतून किंवा बैठका रद्द करून पाकिस्तानला उपरती होणार आहे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागे वळून पाहिले असता फार काही हाती लागत नाही. पाकला वठणीवर आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली तर खूप काळ लागणार आहे. दीर्घकालीन रणनीती आखावी लागणार आहे. आता आम्ही तत्काळ काही उपाययोजना करू शकत असू त्या म्हणजे आपल्या सैनिकांच्या अनमोल अशा प्राणांचे रक्षण करण्यासाठीच्या असाव्यात. पाश्चिमात्य देशात आपल्या इतक्या संख्येने त्यांचे सैनिक हौतात्म्य पत्करतात का? की ते दहशतवाद्यांना ठार तर मारतात पण स्वत: कधी बळी पडत नाहीत, असे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे का? याचा शोध घेतला असता, असे आढळून आले की, अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन इत्यादी देशात जवानांना डोक्यापासून पायापर्यंत मजबूत असे सुरक्षा कवच असते.
उरी हल्ल्यात इंधनाच्या टाक्यांना आग लागल्याने आपले जवान हुतात्मा झाले. तेव्हा सर्वप्रथम आपल्याला लष्करी दलांना सौर ऊर्जेसारखी अक्षय्य ऊर्जा दिली पाहिजे. त्यामुळे इंधनावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये. इंधन पुरवठ्यावर नेहमी शत्रूचे लक्ष्य असते. म्हणून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेली स्फोटके, लपून केलेले हल्ले, आत्मघाती स्फोट इत्यादीमुळे सैनिकांच्या हौतात्म्याची संख्या वाढते. अमेरिकेने अफगाणिस्तान व इराकमध्ये अशा प्रकारची चिलखती वाहने वापरली. त्यांच्यासाठी रोबोटचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गुप्त नेटवर्कने अत्याधुनिक तंत्राने अचूक माहिती ठेवायला हवी. आपल्या सैनिकांना फुलप्रूफ संरक्षण देण्यामागच्या या प्रक्रियेमुळे आपण ही लढाई निश्चित जिंकू.
बातम्या आणखी आहेत...