आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरा बिग बॉस तर उत्तर कोरियात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ची संकल्पना कशी सुचली? याचे उत्तर बिग ब्रदरमध्ये आहे. ही संकल्पना सर्वप्रथम जॉर्ज ऑरवेल यांचे प्रसिद्ध पुस्तक १९८४ मध्ये रेखांकित झालेली आहे. या पुस्तकात सरकारचे आपल्या नागरिकांवर आणि त्यांच्या आयुष्यावरही दहशत पसरल्याचे वर्ण न होते. त्यांची नजर प्रत्येक गोष्टीवर असून ती सर्वकाही ऐकत असते.
जगभरातून विरोध होत असूनही उत्तर कोरिया आॅरवेलची कल्पना प्रत्यक्षात आणण्यावर अडून बसला आहे. सरकारविरोधी कोणतीही कृती करणाऱ्यास केवळ तुरुंगातच नव्हे तर त्यांच्या तीन पिढ्यांना फाशीची शिक्षा देऊ शकते. खटला चालवण्याचा प्रश्नच नाही. अटकेसाठी केवळ संशय आला तरी पुरेसे आहे. माहितीच्या सर्व साधनावर सरकारचे नियंत्रण आहे. हे सरकार कायम युद्धाच्या पवित्र्यात असते. तसेच जनतेला भूक आणि गरिबीच्या खाईत लोटते आहे. या देशाने अलीकडेच दोन मुद्द्यांवर जगाचे लक्ष वेधले. एक आता कोणावर विनोद करणे किंवा नजर देखील टाकण्यास बंदी घातली. म्हणजे हुकूमशहाला आता विनोदही सहन करणार नाही. आता विनोद केल्यास प्योंगयांगमध्ये कोणासही त्याच्या कुटुंबीयासह कोठडीत टाकण्यात येते.
दुसरे म्हणजे त्यांनी केलेल्या अणुचाचण्या आणि त्याची गती आहे. उत्तर कोरियाचा एकमेव सहकारी चीनचीही अवघडलेली अवस्था आहे. त्यांच्याकडील अण्वस्त्रे चीनला खूप मोठ्या जोखमीची वाटतात. अनेकवेळा बंदीशी सहमती दाखवूनही कोरियाच्या प्रकरणात उत्तर कोरियाच्या सरकारला सत्ताभ्रष्ट करू शकत नाही. त्यामुळे चीन बोलतो एक आणि करतो दुसरेच! अशी अवस्था आहे. किम जोंग उन हा हुकूमशहा लोकप्रिय असला तरी मास्टर माइंड आहे. तो खूप हुशारीने खेळी खेळतो आहे. मग सावधान! विनोद करू नका. बिग ब्रदर पाहतो आहे.
बातम्या आणखी आहेत...