आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाचा मार्ग वैचारिक पातळीवर ठेचला जावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा आपण दहशतवादाचा विचार करतो तेव्हा विशिष्ट समूहावर केलेला हल्ला आठवतो. २६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रमाणे हल्लेखोरांनी जसे अनेकांना लक्ष्य बनवले, परदेशातील नागरिकांना विशेष लक्ष्य केले गेले; परंतु १४ जुलै रोजी निसच्या हल्ल्याने ही व्याख्याच बदलून टाकली. ३१ वर्षांच्या एका व्यक्तीने जाणूनबुजून १९ टन वजनाचा कार्गो ट्रक फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिवस साजरा करणाऱ्या लोकांच्या गर्दीत घुसवला. ८४ लोक ठार झाले आणि ३०३ जण जखमी झाले. कैक वर्षांपासून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बनवण्याचा काळ आणि अब्जावधी डॉलर्स खर्च झाल्यानंतर शत्रू इतक्या अमानुषपणे वार करेल, याचा कोणी विचार तरी केला असेल काय?
प्रत्येक व्यक्ती, मग तो याचा बळी ठरला जरी नसला तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे या दुर्घटनेचा साक्षीदार होतो. हा हल्ला अकल्पनीय, विचित्र आणि भयानक स्वरूपाचा म्हणावा लागेल. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे हल्ल्याचे लक्ष्य आणि ठिकाणांची अकल्पनीयता. आजच्या जगात जेव्हा एकटा लांडगा दहशतवाद्यांच्या मदतीशिवाय हल्ला करू शकतो. मग कितीही देखरेख कडक केली तरी सुरक्षेची हमी काय? सॉफ्ट टार्गेट म्हणजे जनतेला आधीच इशारा देणार तरी कसा? हल्ला कधी व कोठे होणार आहे हे आपल्याही सांगता येत नाही. मात्र, जागतिक स्तरावरून असे हल्ले रोखले जाऊ शकतात, हे सांगता येते. असे हल्ले मूर्त स्वरूप येण्याआधीच म्हणजे बाल्यावस्थेत रोखता येतात. असा घृणास्पद विचार करणाऱ्या विचार प्रक्रियेस लक्ष्य करावे लागेल. हल्ल्याचे कारण हल्लेखाेरांच्या वातावरणात असते. आपणास हल्ल्याचे उगमस्थान शोधले पाहिजे. मग वैचारिक वातावरणात बदल होऊन या दुष्ट विचार प्रक्रियेस उलथून टाकावे लागेल. हीच दहशतवादाच्या विरोधात लढाई आहे.
बातम्या आणखी आहेत...