आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटीर उद्योगांनी चीनवर करू मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागचा काळ आठवून पाहा. त्या काळात खेडी स्वयंपूर्ण होती. मिठाशिवाय इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याची गरजच पडत नव्हती. तेव्हा गरजाही मर्यादित होत्या. आता खासगी आयुष्यात डोकावून पाहिल्यास बहुतांश गोष्टी गरज म्हणून नव्हे, तर चैनीसाठी घेतल्या जातात. भारताच्या प्रगतीत महत्त्वाचा घटक ठरलेले उत्पादन क्षेत्र अाता आऊटसोर्सिंग करत आहे. कारण आपण तयार केलेली वस्तू महाग पडते. आपण सामानापेक्षा वाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनावर जास्त खर्च करतो आहोत.

मध्यवर्ती उत्पादन करणे किती फायदेशीर ठरते हे चीनने दाखवून दिले. प्रत्येक उत्पादन स्वस्तात तयार होते. मग ही आऊटसोर्सिंग आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तितकीच फायद्याची आहे का? जर पुन्हा कुटिरोद्योगांचे मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन केले तर भारतातील बेरोजगारींची समस्या दूर होईल. खाद्य उत्पादने, कपडे, भांडी, लोखंड, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कृषी उत्पादने जर चांगल्या ब्रँडच्या नावाने घराघरात तयार करून या काही उत्पादनाचे सेंट्रल मार्केटिंग आणि डी सेंट्रलाइझ्ड मॅन्युफॅक्चरिंग करण्याची गरज आहे. यामुळे निश्चितपणे छोटी शहरे आणि गावे स्वयंपूर्ण होतील. सर्व बाजूने विचार केला आणि खर्च थोडा जास्त आला तरी आपण स्वावलंबी होऊ. जेथे मागणी आहे तेथेच वस्तूचे उत्पादन झाले तर कमी वाहतूक खर्च लागेल. त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रसुद्धा सेंट्रल मार्केटिंगद्वारे सेवा जवळच्या भागात पाेहोचवू शकेल.

भारतात केवळ लोकसंख्या वाढलेली नसून मानव संसाधनयुक्त देश आहे. मला त्याचे काय? ही भावना सोडून राष्ट्रीय भावना जागृत करण्याची गरज आहे. मग कोणताही परकीय आपले सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षेला आव्हान देऊ शकणार नाही!
बातम्या आणखी आहेत...