आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Venkaiah Naidu Defending Modi And Attaking Writer

माेदींविराेधी माेहिमेचा उद्रेक का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा घाेटाळ्यांच्या माध्यमातून कित्येक लाख काेटींचे सार्वजनिक धन लुटले जात हाेते त्या वेळी हे अकादमीवाले मूक प्रेक्षक बनून राहिले हाेते. लेखिका तस्लिमावर हल्ला झाला त्या वेळी ही मंडळी का गप्प बसली?

भारत सहिष्णु देश अाहे की नाही? हा मुद्दा अाजकाल व्यापक अर्थाने चर्चेत अालेला अाहे. वैश्विक दृष्टिकाेनाचे बहुवैविध्य, इथली विविध दार्शनिक तत्त्वे अाणि समुदाय अामच्या संस्कृतीचे प्रभावी घटक अाहेत. या जगातील चार प्रमुख धर्म अर्थात िहंदू, बाैद्ध, जैन अाणि शीख या धर्मांची जन्मभूमी अामचाच देश अाहे. अामच्या संस्कृतीमध्ये सहिष्णुता अाणि सामंजस्य जर नसते तर हे शक्यच झाले नसते अाणि अलीकडच्या काळात तर सहिष्णुता लाेप पावत चालल्याची अावई उठवली जात अाहे. जर का ही बाब खरी अाहे तर मग वाढत्या असहिष्णुतेला जबाबदार काेण? साधारणपणे ६० वर्षे काँग्रेसचेच सरकार सत्तेवर हाेते अाणि देशभरातील बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचेच सरकार हाेते. अामच्या मातृभूमीच्या अानुवंशिक संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सहिष्णुता काय माेदींच्या केवळ दीड वर्षाच्या कार्यकाळात संपुष्टात अाणली जाऊ शकते? अाणि अाता तरी असे वेगळे काय हाेत अाहे जे काँग्रेसच्या कार्यकाळात कधी घडलेले नाही. काँग्रेसच्या मतपेढीच्या धाेरणामुळेच जातीय-धार्मिक हिंसाचार नित्याचाच परिपाठ जणू बनला हाेता.

एकीकडे अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन हाेत अाहे, देशाला जगभरात सन्मान मिळताे अाहे, अांतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारताकडे चालून येत अाहेत, एकापाठाेपाठ एक अशा विविध संस्था भारताला अग्रमानांकन देत अाहेत अाणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे नेतृत्व जगभरात प्रशंसेस पात्र ठरले अाहे; नेमके हे पाहून अामच्या काही राजकीय विराेधकांना पंतप्रधान माेदी अाणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वाढती लाेकप्रियता पचनी पडत नाहीय. राज्य सरकारांच्या निष्क्रियतेचे खापर केंद्राच्या माथी फाेडण्याचा खटाटाेप सुरू अाहे. समाजवादी पक्षाचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशात दादरी प्रकरण घडले, कलबुर्गी यांची हत्या काँग्रेसशासित कर्नाटकात घडली, तर महाराष्ट्रात काँग्रेसचेच सरकार असताना अंनिसचे नरेंद्र दाभाेलकर यांची हत्या झाली. मात्र, या सगळ्या प्रकरणांसाठी िवराेधी पक्षनेते केंद्र सरकारला दाेषी ठरवू पाहत अाहेत. लेखक हे सृजनशील असतात, जे वास्तवाची जाण ही अधिक व्यापक अर्थाने यावी यासाठी अापल्या लेखन काैशल्याच्या माध्यमातून त्याचे प्रकटीकरण करत असतात. काही असाधारण बाबी त्यांच्या नजरेस येत असतील तर त्याप्रती विराेध प्रकट करणे हा त्यांचा अधिकार अाहे. दादरी अाणि कलबुर्गी प्रकरणांच्या नंतर काही लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा धडाका सुरू केला, अर्थातच याविषयी माझा काही अाक्षेप नाही. मात्र, भाजपचे सरकार केंद्रात असल्यामुळेच या घटना घडत असल्याचे सांगितले जात अाहे, त्याला माझा अाक्षेप अाहे.

काही कपटी धर्मनिरपेक्षवादी देशभरात अराजक माजल्याचे भ्रामक वातावरण निर्माण करण्याचा उपद्व्याप करत अाहेत. त्यांच्या गटात काही माेजके लेखक, चित्रपट निर्माते, कलाकार सामील झाले अाहेत. जेव्हा काश्मिरातील अमर काव्य अाणि साहित्य पेटवून देण्यात अाले त्या वेळी या सगळ्यांचा अावाज कुठे हरवला हाेता? काश्मीर खाेऱ्यातील बुद्धिजीवी पंडितांची माेठ्या प्रमाणावर हत्या केली जात असताना, त्यांच्या जिभा कापल्या जात असताना हे तथाकथित अकादमीवाले कुठे दडून बसले हाेते? कलबुर्गींची हत्या झाली तेव्हा लक्षात अाले की िहंदू दक्षिणपंथीयांचे कारस्थान अाहे; परंतु मुंबईत बाॅम्बस्फाेट झाला तेव्हा कळले की, दहशतवादाचा काेणता धर्म अाणि रंग नाही. जेव्हा घाेटाळ्यांच्या माध्यमातून कित्येक लाख काेटींचे सार्वजनिक धन लुटले जात हाेते त्या वेळी मूक प्रेक्षक बनून राहिले हाेते. लेखिका तस्लिमावर हल्ला झाला त्या वेळी ही मंडळी का गप्प बसली? पैगंबर माेहंमद यांच्यावरील चित्रपटाचे संगीतकार ए. अार. रहेमान अाणि दिग्दर्शक माजिद माजिदी यांचे ताेंड बंद करण्यात अाले तेव्हा यांचा अावाज का नाही निघाला? अाणीबाणीच्या काळात प्रमुख वर्तमानपत्रांचा अावाज दाबून टाकण्यात अाला त्या वेळी याच बुद्धिजीवींपैकी काही जणांनी तर अाणीबाणीचे स्वागत केले हाेते. वरिष्ठ न्यायमूर्तींना डावलून खास मर्जीतल्या चाहत्यांना पदाेन्नती देण्यात अाली त्या वेळीदेखील हे गप्प बसलेले हाेते. केवळ एका व्यक्तीची मर्जी राखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात अाली तेव्हादेखील मूक प्रेक्षक बनून राहिले. १९८४ मध्ये शिखांचा संहार करण्यात अाला त्या वेळी या बुद्धिजीवींनी ताेंड उघडले नव्हते. नागरिकांचे मूलभूत अधिकार अाणि भारताच्या घटनात्मक बाबींवरच अाणीबाणीच्या माध्यमातून हल्ला चढवण्यात अाला त्या वेळी काेणत्या लेखकाने अाणीबाणीला विराेध दर्शवत अापला पुरस्कार परत करण्याची हिंमत दाखवली हाेती? मुळातच नरेंद्र माेदींचा उदय काही लाेकांच्या पचनी पडत नाही अाणि ते संधीच्या शाेधात असून जिथे कुठे अक्षम्य घटना घडत अाहेत, विशेषत: त्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्याच राज्यात घडत असतानाही त्याचा फायदा घेत पंतप्रधान अाणि देश दाेघांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न करत अाहेत. जर देशातील प्रत्येक गुन्ह्याकडे पंतप्रधानांनीच लक्ष द्यायचे तर संबंधित राज्य सरकारची गरजच काय? असा प्रश्न अाग्र्याचे स्तंभलेखक सय्यद इफ्तिखार जाफरी यांनी या साऱ्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला अाहे. एक मात्र खरे की, या बुद्धिजीवींपैकी काही लाेक राजकीय हेतूने प्रेरित झालेले, तर काही वैचारिकदृष्ट्या भरकटले अाहेत हे अाता लाेकांना पुरेसे समजले अाहे. यांपैकी काहींनी तर नरेंद्र दाभाेलकर किंवा कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेधदेखील व्यक्त केला नव्हता; परंतु अाता अचानक केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी सरसावले अाहेत, त्यांना हीच वेळ का याेग्य वाटली? बिहारमध्ये निवडणुका हाेत अाहेत म्हणून? केरळातील रा. स्व. संघ, अभाविप अाणि भाजप कार्यकर्त्यांवर डाव्यांनी केलेले अत्याचार अाठवावेत, नक्षलवाद्यांनी हजाराे निर्दाेष लाेकांची हत्या केली तरीदेखील हे गप्प बसून राहिले कारण ताेंड उघडले तर माअाेवादी हिंसाचार करू लागतील हे त्यांना पुरते ठाऊक हाेते. जर अशा घटनांवर पंतप्रधान माेदींची प्रतिक्रिया अपेक्षित असेल तर त्यांना राज्यात कायदा अाणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचाही उल्लेख करावाच लागेल. मग हे राजकीय दृष्टिकाेनातून याेग्य ठरेल? या भारतातील लाेक बुद्धिमान तर अाहेतच अाणि मला विश्वास अाहे की, या दुर्दैवी माेहिमेमागील कारस्थान ते समजून घेतील अाणि त्यास याेग्य उत्तरही देतील. या देशातील नागरिकांना विकास हवा अाहे, विकासाच्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष विचलित हाेऊ नये, अशीच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भूमिका अाहे.