आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाच्या साधनांत अामूलाग्र बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी केवळ धनिक वर्गाच्या आनंदाचे साधन असलेली अनेक  मनोरंजनाची साधने आता तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली आहेत. अब्जावधी लोक मोबाइलवर आवडते गाणे ऐकू शकतात, व्हिडिओ पाहू शकतात, गेमही खेळू शकतात. ‘द लाँग टेल’ या तंत्रज्ञानावरील पुस्तकात लेखक क्रिस अँडरसन म्हणतात, इंटरनेटने कोणत्याही उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ खुली केली आहे. कोणताही नायक यूट्यूबवर लोकप्रिय ठरू शकतो.  व्हर्च्युअल ऑनलाइन टीव्ही चॅनल चालवून कोट्यवधी रुपये कमावता येऊ शकतात.  

व्यावसायिक पातळीवरही मनोरंजनाचे लोकशाहीकरण झाले आहे. आज तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाला मोठी लोकप्रियता आणि शक्तिशाली व्यासपीठ मिळू पाहत आहे. फेसबुक, गुगल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, डिस्ने (चीनमध्ये अलिबाबा आणि टेनसेंट) यासारख्या बड्या कंपन्यांचा मनोरंजन जगतात बोलबाला आहे. सामान्यत: मोबाइल स्क्रीन किंवा सर्च रिझल्टमध्ये जे वरील स्थानी असते, तेच ग्राहकाकडून पाहिले जाते. लोकप्रिय होते. त्यामुळे आता धडाकेबाज हिट (लोकांची मिळणारी पसंती) करणे पूर्वीपेक्षा अधिक फायद्याचे ठरते. ‘हिट मेकर्स’ पुस्तकाचे लेखक डेरेक थॉम्पसन म्हणतात, सर्वांनाच हिट हवे असतात. इतरांसोबत शेअर करता यावा, अशा अनुभवाच्या शोधात लोक असतात.  

नेटवर्कमुळे सोशल मीडियावर सर्वात मोठ्या हिटचा प्रभाव लहानशा हिटपुढे चमत्कारिकरीत्या वाढून जातो. चित्रपट व्यवसायात हा मुद्दा सविस्तर मांडला जातो. २०१६ मध्ये जगभरात प्रदर्शित झालेल्या हजारो चित्रपटांपैकी (फक्त अमेरिकेत ७०० ) बॉक्स ऑफिसवर पहिल्या पाचात आलेले डिस्नेने बनवले होते. या कंपनीने गेल्या वर्षी ‘स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स’सह १३ चित्रपट प्रदर्शित केले. जगातील चित्रपट उत्पन्नात कंपनीचा वाटा २० टक्के झाला. डिस्नेने प्रमुख घटना, प्रसिद्ध चरित्र आणि जगात लोकप्रिय असलेल्या कथांवर लक्ष केंद्रित केले आहे. काही वर्षांपूर्वी स्टुडिओच्या अपयशामुळे कंपनी २०- २५ साधारण चित्रपट तयार करत होती.  

२००५ मध्ये बॉब आइगर हे कंपनीचे सीईओ झाल्यानंतर कंपनीने पिक्चर अॅनिमेशन स्टुडिओ, मार्व्हल एंटरटेनमेंट आणि २०१२ मध्ये ‘स्टार वॉर्स’ची निर्माता कंपनी लुकास फिल्म १५.५ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली. ब्लॉक बस्टरचा प्रभाव डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्पष्ट आहे. आयट्यून्स किंवा अॅमेझॉनवर एखादा आयटम (व्हिडिओ किंवा ऑडिओ) स्टोअर करण्यासाठी थोडे पैसे लागतात. त्यामुळेदेखील याचा पुरवठा अधिक आहे.  

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अनिता एलबर्स यांनी नेस्लन सर्वेक्षणावरून सांगितले की, २००७ मध्ये अमेरिकेत ३९ लाख म्युझिक ट्रॅक विकले गेले. यात ९१ टक्के ट्रॅकची विक्री १०० पेक्षा कमी होती. सर्वाधिक विक्री झालेल्या ३६ ट्रॅकचा संपूर्ण विक्रीतील वाटा ७ टक्के होता. मागील वर्षी ही स्थिती आणखीच गंभीर होती. वेगवेगळ्या अशा ८७ लाख ट्रॅकची एक एकच कॉपी विकली गेली. चित्रपटगृहांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे अर्थशास्त्र धमाकेदार म्युझिक, टीव्ही स्ट्रीमिंगपासून वेगळे असू शकते. मात्र आजच्या डिजिटल काळात चित्रपट आणि अन्य मनोरंजनाच्या साधनांमध्ये खूप साम्य आहे. ज्या गोष्टीची अधिक माहिती असते, त्याच गोष्टी ग्राहक खरेदी करतात. इंटरनेटमुळे ब्रँडेड नसलेली गोष्ट मोफत मिळावी, अशी ग्राहकाची अपेक्षा असते. या वस्तू बनवण्यासाठी फार पैसे लागत नाही, अशी त्यांची समजूत असते. याउलट प्रसिद्ध ब्रँडसाठी कितीही किंमत मोजण्याकडे ग्राहकांचा कल असतो. 
 
ऑनलाइन व्यासपीठांनाही पसंती
{ सर्च इंजिन आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे अशी स्थिती उद्भवली आहे. फेसबुक, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर प्रचंड मनोरंजनाची सामग्री उपलब्ध आहे. कलाकार, लेखकांना ते जगभरात पोहोचण्याची संधी देतात.  एखाद्या कलाकाराची लोकप्रियता ही केवळ त्याच्या देशातीलच असते असे नाही. 
{ चीनमधील ७१ कोटींहून अधिक नागरिकांनी प्रसिद्ध होण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. लाखो चिनी इंटरनेट युजर्स लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून परस्परांचे मनोरंजन करतात.  
{ ब्लॉकबस्टरचे वाढत्या वर्चस्वाने भविष्यात मनोरंजनाची अनेक साधने बदलू शकतील. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक कंपन्यांचे विलीनीकरण होईल. उदाहरणार्थ- एटीअँडटी 
( टेलिकॉम व पे टीव्ही फर्म) आणि टाइम वॉर्नर या हॉलीवूड कंपनीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved. 
बातम्या आणखी आहेत...