आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीला इंटरनेटचे तगडे आव्हान, जाहिराती ओसरल्याने उत्पन्नात घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्हीवर दिसणाऱ्या दैनंदिन मालिका व अन्य मनोरंजनपर कार्यक्रम यांची घटिका आता भरत आली आहे. कारण टीव्हीचे प्रेक्षक नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या पसंतीचे कार्यक्रम आपल्या वेळेनुसार पाहत आहेत. तसेच अनेक ग्राहक फेसबुक, स्नॅपचॅट या सोशल मीडियातून आपल्या आवडीचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. त्यामुळे आता वेगवेगळी चॅनल पाहण्याऐवजी एकाच चॅनलवर कार्यक्रम पाहण्याची सोय झाली आहे. इंटरनेटने आपले जगणे अगदीच बदलले आहे. त्याने ब्रॉडकास्ट टेलिव्हिजनचे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. एक म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब व स्नॅपचॅट या सोशल प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांना मोफत व्हिडिओ पाहण्याची सोय झाली आहे. या मोफत व्हिडिओंबरोबर झळकणाऱ्या जाहिरातींनी सुमारे १२००० अब्ज रुपयांची उलाढाल केली आहे. हे उत्पन्न टीव्ही माध्यमांसाठी धोक्याची सूचना आहे. कारण जाहिरातींची बाजारपेठ इंटरनेटकडे वळाली आहे.  

विशेष म्हणजे ग्राहकांना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, हुलू या सेवांच्या माध्यमातून मिळणारे व्हिडिओ प्रीमियम क्वालिटीचे (उच्च दर्जाचे) असतात. नेटफ्लिक्सचे सुमारे ९ कोटी ४० लाख कोटी ग्राहक दरदिवशी कमीतकमी दोन तास कार्यक्रम पाहतात. इंटरनेटचे हे अर्थशास्त्र आता हळूहळू केबल टीव्हीचे व्यावसायिक मॉडेल नष्ट करत जात आहे. १९९५ मध्ये अमेरिकेत केवळ ४१ चॅनेल  उपलब्ध होते व प्रेक्षक आठवड्यातून केवळ १० चॅनेल पाहत असे. नीलसन या रिसर्च कंपनीने आपल्या २०१३ च्या अहवालात अमेरिकेत १८९ एकूण चॅनलपैकी फक्त १७.५ चॅनल पाहिली जात असे नमूद केले आहे. तसेच लीचमॅन रिसर्च ग्रुपच्या म्हणण्यानुसार गेल्या १० वर्षांत अमेरिकेत पे-टीव्हीचे शुल्क वाढत जाऊन मासिक ६५०० रु. झाले आहे. यामुळे ग्राहक इंटरनेटकडे वळाला असल्याचे निरीक्षण मांडले आहे. अमेरिकेत गेल्या सहा वर्षांत ब्रॉडकॉस्ट व केबल टीव्ही बघणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत ११ टक्क्यांची घसरण झाली आहे व ही घसरण १२ ते २४ वयोगटांत ४० टक्के इतकी आहे. पण थेट प्रक्षेपण करणारे कार्यक्रम विशेषत: क्रीडा स्पर्धावर इंटरनेटने अजून कुरघोडी केली नाही. २०१५ मध्ये थेट प्रक्षेपित झालेल्या १०० कार्यक्रमांमध्ये ९३ खेळाचे कार्यक्रम होते व त्यातील जाहिरातींवरचा खर्च ५० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.  ईएसपीएन चॅनलचे ९ कोटी ग्राहक आहेत व त्यांना दरवर्षी ५३५ अब्ज रुपये शुल्कापोटी मिळतात. अन्य चॅनल्सपेक्षा क्रीडा चॅनलचे शुल्क अधिक आहे.  
बातम्या आणखी आहेत...