आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुमसत असलेल्या सिरियाला सावरण्याची हीच योग्य वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुकूमशहा असदचा जुलमी छळ सहन करणाऱ्या सिरियावर जेव्हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील विमानांनी बॉम्ब टाकणे बंद केले तेव्हा रशियन विमानांनी बॉम्बफेक सुरू केली. याआधी असदच्या सैनिकांनी तेथे उच्छादच मांडला होता. गेल्या चार वर्षांत सिरिया उद्ध्वस्त केला. अलीकडच्या पाच महिन्यांत रशियन बाँबहल्ल्यास तोंड दिल्यानंतर सिरियाच्या लोकांसाठी आता सुटकेची बातमी आली आहे. त्यांना मानवी मदत पोहोचवली जाणार आहे.

अमेरिका आणि रशियाने अलीकडेच बैठक घेऊन सिरियामध्ये बाँबफेक करणे थांबवण्याचा निर्णय घेतला. तेथील नागरिकांसाठी मानवी साह्य पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाला यासाठी तयार करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या बैठकीत ज्या लोकांनी आपले आश्वासन पूर्ण करण्याचे वचन दिले ती मंडळी ही जबाबदारी कितपत पार पाडतील याची ही परीक्षा आहे. यात सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अली असद आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दोन महत्त्वाचे नेते आहेत. मानवी मदत पाेहोचवण्याच्या कारणाने तेथे बाँबहल्ले थांबले तर हेच मोठे यश म्हणावे लागेल. मात्र, असे हल्ले एक किंवा काही आठवड्यांपुरते मर्यादित असू नयेत. आश्वासन पाळायचेच तर बाँबहल्ले होऊच नयेत.

रशियनांच्या बाँबहल्ल्यामुळे असद यांना कोणता फायदा झाला ते पाहूया. सेनेने जमिनीवर ऑपरेशन चालवून देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम भागावर ताबा मिळवला आहे. पुतीन यांनीसुद्धा सिरियाच्या विनाशामध्ये सहभाग घेतलेला आहे. पाच महिन्यांत रशियन बाँबहल्ल्यात १४०० सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडले. यात ५२७ महिला आणि लहान मुले होती. हे सर्व सिरियन राज्यकर्ते असद यांचे क्रौर्य कायम राहावे यासाठी करण्यात आले. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. रशियन विमानांनी क्लस्टर बाँब तर टाकलेच; परंतु लक्ष्य न ठरवता हल्ला करण्यावर बंदी आहे. मशिदी आणि रूग्णालयावर बाँब टाकण्यात आले. सिरियामध्ये विमाने पाठवून पुतीन यांनी सुरुवातीपासून दुटप्पी भूमिका घेतली आहे. इसिस आणि दहशतवाद्यांवर हल्ला करू, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु असदविरोधकांना ठार मारण्यात आले. काही दिवसांपूर्वी जेव्हा अमेरिका, सिरिया आणि रशियादरम्यान बोलणी चालू होती तेव्हाच रशियन विमानांनी हल्ल्यांचा जोर वाढवला होता. तेथे हजारो लोक असून त्यांच्याकडे जेवण, राहण्यासाठी जागा किंवा उपचारही मिळत नाहीत. बाँबहल्ले रोखले गेल्याने शांतता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी आश्वासन पाळावे हीच अपेक्षा आहे.

© The New York Times