आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द इकोनॉमिस्ट : जगातल्या १० टक्के कंपन्या कमावतात ८० टक्के नफा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस... काही जुन्या व नव्या अशा विशाल मल्टिनॅशनल कंपन्यांचा समूह आता जागतिक अर्थव्यवस्थेला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत आहे. या घडामोडी जगाच्या कल्याणासाठी चांगल्या आहेत की वाईट ?
बड्या मल्टिनॅशनल कंपन्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करत बाजारपेठेवर नियंत्रण व एकाधिकारशाही प्रस्थापित करून स्पर्धा संपवत आहेत. त्यामुळे कंपन्यांचे विलीनीकरण किंवा अधिग्रहण वाढत आहे. १९९० मध्ये ११,५०० कंपन्या मोठ्या उद्योग समूहात विलीन किंवा त्यांचे अधिग्रहण झाले होते. २००८ नंतर ही संख्या प्रतिवर्षी ३० हजारपर्यंत वाढत गेली. १९९० च्या दशकात जगात तीन मोठ्या मोटारगाड्या उत्पादक कंपन्या होत्या, ज्यामध्ये सुमारे १२ लाख कामगार होते व त्यांची वार्षिक उलाढाल २५० अब्ज डॉलरच्या घरात होती. हे चित्र २०१६ मध्ये वेगळे आहे. एकट्या सिलिकॉन व्हॅलीत अग्रेसर असलेल्या तीन कंपन्यांची वार्षिक उलाढाल २४७ अब्ज डॉलर असून या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या फक्त १ लाख ३७ हजार आहे.

३१ ऑगस्ट १९१० मध्ये थिअोडोर रुझवेल्ट यांनी कान्सास राज्यात ओसावाटोमी इथे एक अत्यंत रोमांचकारी भाषण केले होते. या भाषणात त्यांनी इशारा देताना म्हटले की, “अमेरिकेची अर्थव्यवस्था काही मोजक्याच कंपन्यांच्या हातात आहे व या कंपन्या मूठभर लोकांसाठी बेहिशेबी संपत्ती निर्माण करत आहे. या कंपन्यांचेच राजकारणावर नियंत्रण असून ज्या आर्थिक समानता संधीवर हा देश उभा राहिला आहे तो देश कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात जात आहे. अशा कंपन्यांच्या कारभाराला आवर घालण्यासाठी सरकारने वेळीच प्रयत्न केले पाहिजेत.’ रुझवेल्ट यांचे हे भाषण आजच्या काळालाही लागू होते. अॅपल, गुगल, अॅमेझॉन या कंपन्यांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर इतके वर्चस्व आहे की जसे वर्चस्व रुझवेल्ट यांच्या काळात यूएस स्टील, स्टँडर्ड ऑइल अँड सिअर्स, रोबक अँड कंपन्यांचे अर्थव्यवस्थेवर वर्चस्व होते.

१९८० व १९९० च्या दशकात मॅनेजमेंट गुरू असे सांगत होते की बड्या कंपन्याच कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा दाखवण्याचे काम करत असतात. अमेरिकेत एटी अँड टी या एका बड्या टेलिकॉम कंपनीचे विभाजन झाले व सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांचे खासगीकरण झाले. प्रख्यात मॅनेजमेंट गुरू पीटर ड्रकर यांनी त्या वेळी म्हटले होते की, “द फॉर्च्यून ५००’ कंपनीची यादी बनवण्याचा काळ आता इतिहासजमा झाला. “द नेचर ऑफ द फर्म’ (१९३७) या पुस्तकात विचारवंत रोनाल्ड कोएस यांचे अशाच आशयाचे म्हणणे होते. ते म्हणतात, बाजारात स्वस्त सेवा देण्यासाठी कंपन्या असणे गरजेचे आहे. पण आता कंपन्यांचे आकारमान वाढत आहे.

मॅकेंझी ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थेचे म्हणणे आहे की, जगातल्या एकूण आर्थिक उलाढालीतला ८० टक्के नफा हा १० टक्के कंपन्या कमावतात. १ अब्ज डॉलर व त्यापेक्षा अधिक उलाढाल करणाऱ्या कंपन्या व ज्यांची बाजारपेठेतील हिस्सेदारी ६५ टक्क्यांहून अधिक आहे अशा कंपन्या एकूण नफ्यातील ६० टक्के हिस्सा कमावतात. ही आकडेवारी कंपन्यांच्या विस्ताराबरोबरच कंपन्यांचे विलीनीकरण, अधिग्रहणामुळे झालेली आहे.

१९९० मध्ये ११,५०० कंपन्यांचे विलीनीकरण किंवा अधिग्रहण झाले, ज्यांची उलाढाल जगाच्या एकूण उत्पादनात २ टक्के होती. २००८ नंतर हे प्रमाण प्रतिवर्षी ३० हजारपर्यंत वाढले. त्या वेळी या कंपन्यांची उलाढाल जगाच्या जीडीपीत ३ टक्के होती. अमेरिकेत या आर्थिक उलाढाली अधिक दिसतात. १९९४ मध्ये फॉर्च्यून १०० कंपन्यांचा जीडीपीतील हिस्सा ३३ टक्के होता. तो २०१३ मध्ये ४६ टक्के इतका वाढला. याच कालावधीत फॉर्च्यून ५०० कंपन्यांचा हिस्सा ५७ टक्क्यांहून ६३ टक्क्यांपर्यंत वाढला. अमेरिकेत शेअर बाजारात ज्या कंपन्यांची नोंदणी होते त्याचे प्रमाण घटले आहे. १९९७ व २०१३ या काळात हे प्रमाण अर्धे झाले आहे. कंपन्यांचा विस्तार होत असला तरी मध्यम दर्जाच्या कंपन्यांच्या मालाच्या विक्रीत गेल्या २० वर्षांच्या काळात तिपटीने वाढ झाली आहे. बाजारपेठ जेवढी केंद्रीकृत होत निघाली आहे तेवढे नफ्याचे प्रमाण वाढत आहे. अशा काळात स्टार्टअपसाठी वातावरण योग्य नाही.

सिलिकॉन व्हॅलीतील ज्ञान व माहितीचे आदानप्रदान करणाऱ्या कंपन्या या सगळ्या आर्थिक उलाढालींचा मोठ्या प्रमाणात फायदा घेताना दिसत आहेत. पे-पाल या पेमेंट सिस्टिमचे निर्माते व फेसबुकमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार पीटर थिएल म्हणतात, ही स्पर्धा हरणाऱ्यांसाठी आहे. मात्र युरोपमध्ये हे चित्र असे नाही. २००९ मध्ये युरोपमध्ये ज्या १९ बड्या कंपन्या होत्या त्या आता १७ झाल्या आहेत. याचे कारण असे की, बड्या व शक्तिशाली कंपन्या आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी व आपला विस्तार वाढवण्यासाठी दबाव आणत आहेत. मोठ्या संख्येने वकील, सल्लागार कंपन्या व अन्य सेवा उपलब्ध असल्याने हा एकूण आर्थिक कारभार वैश्विक होत आहे. त्याला डिजिटायझेशनची जोड असल्याने या कंपन्या आपले डिजिटल नेटवर्क राबवून आपल्या क्षमता वाढवत आहेत. मॅकेंझी ग्लोबल इन्स्टिट्यूटचे जेम्स मॅनयिका म्हणतात, पूर्वी कर्मचाऱ्यांची संख्या व मालमत्ता यावर कंपन्यांचे मोजमाप होत असे. आता तसे नाही. वॉलमार्ट व एक्झॉन या कंपन्या तशा होत्या. आता डिजिटल कंपन्यांच्या मालमत्ता कमी असतात, पण उलाढाल प्रचंड असते.
बातम्या आणखी आहेत...