आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरचे भविष्य अंधकारमय, कंपनीचा विस्तार मंदावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रज्ञान... वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीचे भवितव्य अंधारात
ट्विटर निर्माते जेक डोर्सी हे पूर्वी मालिश करण्याचे काम करत होते. आता ते आपल्या कंपनीचा आजार दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जुलै २०१५ मध्ये त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह डिक कोस्टोलो यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. कारण कोस्टोलो यांच्या कार्यकाळात ट्विटर कंपनीचा विकास मंदावला होता. अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले होते.
आता डोर्सी यांच्याकडे सूत्रे असूनही ट्विटरच्या समस्या काही दूर होत नाहीत. कंपनीच्या भविष्यावर संशय व्यक्त होऊ लागले आहेत. ट्विटरचे युजर्स (सध्या ३१ कोटी ३० लाख) वाढत नाहीयेत.
२००८ मध्ये ट्विटर कंपनी मंडळाने डोर्सी यांना परत बोलावले होते व त्यांच्या कल्पनाशक्तीतून काही करिष्मा घडेल असे कार्यकारी मंडळाला वाटत होते. पण डोर्सी यांच्या कार्यकाळात कंपनीचा समभाग कोसळून अर्धा झाला आहे. याचे मूळ ते स्वत: आहेत. कंपनीला एक पूर्णवेळ प्रमुखाची गरज आहे. डोर्सी यांनी आपला वेळ ट्विटर व एक वित्तीय कंपनी स्क्वेअर यामध्ये विभागला आहे. त्यांनी आपली अधिकतर गुंतवणूक स्क्वेअर कंपनीत गुंतवली आहे. ते कंपनीत उशिरा येतात. त्यामुळे अन्य वरिष्ठ कर्मचारी उशिरा येतात. आता कर्मचारी म्हणतात की, कंपनीत पार्टटाइम प्रमुख असल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर पडताना दिसतोय.
या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काही विशेषज्ञांनी डोर्सी यांना असा सल्ला दिला आहे की, ट्विटरवरची १४० शब्दांची मर्यादा वाढवण्याची गरज आहे. (ते वाढवण्यास डोर्सी राजी नाहीत) लाखो बनावट अकाउंट बंद करण्याची गरज आहे. डोर्सी यांच्या अकाउंटवरचे ३८ लाख फॉलोअर हे बनावट आहेत, असे एका कंपनीचे म्हणणे आहे. ट्विटरची बाजारपेठ मिळवण्यासाठी फेसबुक व स्नॅपचॅट आक्रमक झाल्या आहेत. पूर्वी बातम्या वाचण्यासाठी लोक ट्विटर पाहत होते. आता लोक फेसबुककडे वळले आहेत. टि्वटरच्या अशा कारभारामुळे इंटरनेटच्या विश्वात एक विशाल कंपनी होण्याची संधी त्यांनी गमावली आहे.
बातम्या आणखी आहेत...