आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द इकोनॉमिस्ट : जीवाणूजन्य आजारात उपाशी राहणे चांगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकशास्त्र : आजीबाईचा सल्ला येल विद्यापीठाने मानला

ताप आल्यानंतर जेवण करणे चांगले आणि सर्दी झाली असल्यास उपाशी राहणे चांगले हे आजीबाईच्या सल्ल्यावर अवलंबून आहे. आजारी व्यक्तीने उपाशी राहू नये, असे वैद्यकशास्त्रही मानते. येल विद्यापीठाच्या रसलॉन मेडझितॉव्हच्या नेतृत्वाखाली संशोधनकर्त्यांच्या टीमने सॅल मासिकात प्रकाशित संशोधनात म्हटले की, हिवताप झालेल्या उंदराला जबरदस्तीने खाऊ घातले तर तो जिंवत होता, तर जीवाणूचा संसर्ग झालेल्या उंदराला खाऊ घालणे धोकादायक सिद्ध झाले.
डॉ. मॅडझितॉव्ह यांचे संशाेधन जीवशास्त्रज्ञांच्या प्रयोगाने प्रेरित होते. बहुतांश प्राणी संसर्गामुळे प्रभावित झाल्याने खाणे टाळतात. अलीकडील वर्षांत अनेक संशोधनांत आजारी जनावरांना जबरदस्तीने खाऊ घालण्यात आले तर त्यांच्या मरण्याची भीती अधिक होती, तर त्यांना खाऊ न घातल्याने परिस्थिती उलट झाली. डॉ. मॅडझितॉव्ह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याची तपासणी करण्यासाठी उंदरांच्या समूहात हिवताप विषाणू आणि दुसऱ्या समूहात विषबाधा करणारे जीवाणू लिस्टेरिया मोनोसाइटोजीन्सचे संक्रमण केले. काही उंदरांना जबरदस्तीने धान्य खाऊ घातले, तर काहींना सलाइन देण्यात आले. जीवाणूच्या संक्रमणाने प्रभावित झालेल्या उंदरांना जबरीने खाऊ घातले होते त्यांचा मृत्यू झाला, पण सलाइन दिलेले उंदीर जिवंत राहिले. हवेतील संक्रमणामुळे प्रभावित झालेले ७७ टक्के उंदीर धान्य खाल्ल्याने जिवंत होते, पण सलाइन दिलेल्यापैकी केवळ १० टक्के उंदीर जिंवत राहिले.
या प्रयोगामुळे हवेत पसरलेल्या आणि जीवाणंूच्या संसर्गात ग्लुकोज आवश्यक होते, तसे तर कीटक आणि उंदराच्या इम्यून सिस्टिमवर ग्लुकोजचा काही परिणाम झालेला नाही. याशिवाय त्यांनी संक्रमित पेशींचे जीवशास्त्र उलटफेर केले. हवेतील संसर्गामुळे परिणाम झालेल्या अनेक पेशी मरत होत्या. त्यांना ग्लुकोज दिल्याने त्यांची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढली. त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नाही. जीवाणूंची परिस्थिती याउलट होती. प्रथिने जळाल्यानंतर संक्रमण झालेले उंदीर जिंवत राहिले. परंतु पेशीत ग्लुकोज जाण्याने तीव्र हालचाल करणारे रसायन फ्री रॅडिकल्स पेशींना नुकसान पोहोचवतात. या हानीमुळे त्यांची जिंवत राहण्याची क्षमता नाहीशी होते. हवेतील संक्रमणासाठी ग्लुकोज चांगले का ठरते आणि जीवाणूंच्या संसर्गासाठी ते वाईट का असतात हे स्पष्ट झालेले नाही.
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
From The Economist, translated by DB Corp, published under licence. The original article, in English, can be found on www.economist.com
बातम्या आणखी आहेत...