आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिसमध्ये हल्लेखोरांचा सहज वावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्स पोलिसांनी पॅरिस हल्ल्याचा गोपनीय अहवाल गृह मंत्रालयास सादर केला आहे. त्यात हल्ल्याचे संकेत मिळूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे स्पष्टपणे म्हटले आहे. प्रमुख हल्लेखोरांवर आंतरराष्ट्रीय वॉरंट जारी केलेले असूनही तीन महिन्यांपर्यंत पॅरिस ते बेल्जियमला ये-जा करत होते. यावरून युरोपातील प्रवेश सीमांवर कडेकोट बंदोबस्त नव्हता, असे निदर्शनास आले. कारण हल्ला सिरियातील इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेला होता.

पॅरिसवर दहशतवादी हल्ल्यानंतर १७ आठवड्यांनी फ्रान्स पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने गृह मंत्रालयास सविस्तर अहवाल सादर केला आहे. मात्र हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता पॅरिसच्या हल्लेखोरांनी योजना कशा प्रकारे आखली आणि हल्ल्याचा कट कसा पार पाडला याची माहिती देण्यात आलेली नाही. हल्लेखोर सिरियातील इसिसच्या शाखेचे होते. त्यांना काही महिन्यांपूर्वीच या हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले . या कटातील चार प्रमुख हल्लेखोर तीन महिन्यांपासून पॅरिस ते बेल्जियम सहज वावरत होते.

बनावट कागदपत्रे तयार करण्यात निष्णात असलेल्या बेल्जियममधील काही लोकांचे सहकार्य घेतले गेले. हल्लेखोरांना पॅरिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यास सांगण्यात आले होते. यामुळे कदाचित पोलिसांचे लक्ष विचलित करत आपला उद्देश साध्य करून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. दहशतवादविरोधी पथकाने रेकॉर्ड, संशयित आरोपींची चौकशी आणि ताब्यात मिळालेल्या वस्तूवरून तसेच गुप्त माहितीच्या अाधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा गोपनीय अहवाल गृह मंत्रालयास सोपवण्यात आला. द न्यूयॉर्क टाइम्सला त्यांची प्रत मिळाली आहे. यात फ्रान्समधील गुप्तहेरांच्या ढिसाळ कामगिरीचाही सविस्तर आढावा घेतला आहे.

१३ नोव्हेंबर २०१५ च्या हल्ल्यांनंतर तपासी अधिकाऱ्यांनी पॅरिसची नाकाबंदी करून प्रत्येक ठिकाणची झडती घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना काही बॉक्स सापडले. त्यात डिस्पोझेबल माेबाइल होते. पॅरिस आणि आजूबाजूच्या शहर व परिसरातील ई-मेलचा डेटा तपासला गेला. पॅरिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उच्च क्षमता असलेल्या बॉम्बची अनेक तुकड्यांतून सामग्री येथे बाहेरून आणण्यात आली होती. या बॉम्बचे साहित्य एकत्रित जोडणी करून साखळी हल्ला चढवण्यात आला. तपासकर्त्यांना हल्ल्यानंतर समजले की, हल्ल्याच्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. हीच त्यांची मोठी चूक ठरली. गांभीर्य दाखवले असते तर हल्ला टाळता आला असता. इसिसचे दहशतवादी युरोपात मोठा हल्ला घडवणार आहेत, असा इशारा पूर्वीच मिळाला होता. फ्रान्स पोलिसांनी नुकतीच बेल्जियममधून सलाह आब्देसलाम यास अटक केली . हा पॅरिस हल्ल्याचा लॉजिस्टिक प्रमुख होता. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा घटक आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून ते मिळवतीलच. बेल्जियम पोलिस मुख्यालयात आरोपीला आणण्यात आले असून हल्ल्यात सहभागी असलेला तो एकमेव सहकारी जिवंत उरला आहे.

५५ पानी अहवालात हल्ला कशा प्रकारे करण्यात आला, यासाठी अमलात आणलेल्या नव्या पद्धतीची माहिती मिळते. राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांना या अहवालाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. हल्ला घडवून आणणारी व्यक्ती इसिसच्या बाहेरील विंगमधील होती. तिला पॅरिसमध्ये आत्मघाती जॅकेटचा वापर, वेगवेगळ्या ठिकाणी फायरिंग आणि लोकांना ओलीस ठेवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यामागे पोलिसांना हैराण करण्याचा हेतू होता. अहवालात युरोपातील सीमेवर ठोस उपाययोजना नसल्याचाही उल्लेख आहे. याचाच हल्लेखोरांनी फायदा उचलला. बेल्जियममध्ये हल्लेखोरांना बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या त्या नेटवर्कची माहिती घेतली जात आहे. त्यांच्यातील ई-मेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संवाद झाल्याची माहिती हाती लागली नाही. त्यांनी निश्चितच कूट भाषेचा वापर केला असावा. आब्देसलामच्या अटकेमुळे याची माहिती मिळू शकते.

हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयावरून आतापर्यंत सहा देशांतील १८ लोकांना अटक करण्यात आली. हल्लेखोर बेल्जियम ते पॅरिसपर्यंत सहज वावरत हाेते. ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी मानली जात आहे. ही बाब गंभीरपणे घेण्यात आली.

कारण पॅरिसमधील तीन हल्लेखोरांच्या विरोधात यापूर्वीच आंतरराष्ट्रीय अटकेचे वॉरंट निघालेले आहे. तरीही ते सहजपणे इकडून तिकडे फिरत होते. फ्रान्समधील गुप्तहेर संस्थेचे माजी प्रमुख अॅलन श्वेट यांनी म्हटले आहे की, आम्ही माहिती उघड करत नसतो. अरबी किंवा सिरिलिक भाषेतील त्यांची नावे भाषांतरित करावीत यावरही आमची सहमती नाही. कोणी युरोपात डेन्मार्क किंवा अॅस्टोनियाहून येतो तेव्हा आम्हालाच कळत नाही की, स्पेन किंवा फ्रान्समध्ये त्याची नोंदणी कशी करावी?

सुरक्षा अधिकारी आतापर्यंत नागरिकांना इशारा देत अाहेत की, हल्ल्याची शक्यता कायम आहे. युरोपातून जाणारे आणि सिरिया-इराकहून येणाऱ्या सर्व लोकांची माहिती घेऊ शकत नाही. पश्चिमेकडील गुप्तहेर अधिकाऱ्यांनी सांगितले, युरोपात आजपर्यंत इसिसचे दहशतवादी जाळे कार्यरत आहे. अहवालाच्या अाधारे या दहशतवादी संघटनेत किती लोक सहभागी झाले आहेत, किती लोकांना बॉम्बचे प्रशिक्षण देऊन पाठवण्यात आले, असे प्रश्न या अहवालाच्या अाधारे उपस्थित होत आहे. अचूक माहिती देणाऱ्या सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

© The New York Times
बातम्या आणखी आहेत...