आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत दिवाळी अंकांचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अनुभव’
युनिक फीचर्सने ‘अनुभव’ मासिकाचा दिवाळी अंक आणला आहे. ख्यातनाम साहित्यिक, नाटककार विजय तेंडुलकर यांच्या शेवटच्या काळातील अखेरचा लेख हेच या अंकाचे निराळे वैशिष्ट्य. याशिवाय अनिल अवचट यांचा टोकियोतील ओरिगामीचा अनुभव, गौरी कानेटकरांचा एक मध्यमवर्गीय 22-23 वर्षांची तरुणी पारधी मुलींच्या वसतिगृहात जाऊन राहते, तिथे जो अनुभव आला त्यातून ‘काळोखाच्या लेकी’ हा लेख साकारला आहे. प्रसिद्ध चित्रकर्ती अमृता शेरगिल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साधना बहुळकर यांचा रसग्रहणात्मक लेख आहे.
>संपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी
पृष्ठे : 178 मूल्य : 100 रुपये

पुढील स्लाईड्‍सवर...'मणिपुष्पक'