आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर फुलत अाहेत कळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय अत्यंत कमी पण तिच्याकडे बघितले तर ती चांगली १६-१७ वर्षांची दिसते, तिच्यातील शारीरिक बदल लपून राहत नाहीत, तिला लवकर येणारी पाळी, त्यामुळे तिची हाेणारी घुसमट, शरिरातील बदलांमुळे पालकांची वाढणारी काळजी अशा अनेक बाबी अाता चिंतेच्या ठरू लाागल्या अाहेत. याच विषयावर हे विचारमंथन...
 
जागतिक आरोग्य दिनानिमित्त अायाेजित एका कार्यक्रमात विषय निघाला, ‘आजकाल मुलींना १०व्या वर्षीच पाळी येऊ लागली आहे. कसे समजवायचे हो इतक्या लहान मुलींना?’ तितक्यात दुसरीकडून उत्तर अाले, ‘हो ना माझी मुलगी आठच वर्षांची आहे. आताच तिच्या स्तनांची वाढ सुरु झाली आहे. वेळेआधीच मोठी वाटायला लागली आहे ती. तिलाही जरा अवघडल्यासारखेच होते हो?’
 
खरंच आहे ! तीन दशकांपूर्वी भारतीय मुलींमध्ये पाळी सुरू होण्याचे वय होते १४ - १५ वर्षे. सध्या हे वय आहे १० - १२ वर्षे. ‘सगळंच इन्स्टंट ’च्या या जमान्यात लवकर वयात येणाऱ्या मुली, त्यांच्या पाळीशी संबंधित समस्या यांमुळे पालकांच्या मुख्यत्वे आईच्या चिंतेत अधिकच भर पडली आह. यामागे अनुवंशिकता हे कारण नक्कीच नाही कारण बऱ्याचदा आईला पाळी आली १५व्या वर्षी तर आता मुलीला पाळी आली १०व्या वर्षी. वाढते वजन, व्यायामाचा अभाव, फास्ट- फूडचे वाढते सेवन आणि अन्नामधून होणारा केमिकल्स आणि हार्मोनसचा मारा हि काही प्रमुख कारणे निदर्शनास आली आहेत.
 
शाळांमधून याविषयावर अनेक मार्गदर्शनपर व्याख्याने घेतली जातात पण बऱ्याचदा तोपर्यंत मुलींना पाळी सुरु झालेली असते.खरी गरज आहे ती पाळी येण्याआधीच मुलींना याविषयी माहिती देण्याची. पुढे येणाऱ्या शारीरिक बदलांविषयी तिला मानसिक रित्या तयार करण्याची. पाळी निश्चित कधी येईल, हे आपल्याला सांगता येत नाही,त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा पाळी येते तेव्हा मुलगी घाबरून जाते. म्हणून घरात आईने, आजीने किंवा बहिणीने मुलीला सोप्या भाषेत याविषयी आधीच माहिती द्यावी. यासाठी स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला देखील घेता येईल. पाळी सुरु होण्यापूर्वी शरीरात विविध बदल होतात. जसे कि शरीराला गोलाई येणे, स्तनांची वाढ होणे, काखेत जांघेत केस येणे. पहिली पाळी येण्यापूर्वी काही आठवडे आधी मुलीला पांढऱ्या रंगाचा स्त्राव जाऊ लागतो. तेव्हा बऱ्याच मुली घाबरून जातात. हे सर्व बदल नैसर्गिक असून यांविषयी मुलींना माहिती द्यावी. सॅनिटरी पॅड्सचा वापर कसा करावा हे समजावून मुलींच्या बॅगेत १-२ पॅड्स ठेऊन द्यावे. पाळीच्या काळात स्वतःची स्वच्छता कशी राखावी याविषयी माहिती द्यावी. ते दिवस रक्तस्त्राव नॉर्मल आहे पण त्यापेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल तर ते अयोग्य आहे, हे मुलींना सांगावे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, अशा वयात मासिक पाळी दरम्‍यान घ्‍यावयाची काळजी...  
 
 
 
 

 
बातम्या आणखी आहेत...