आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सततची सागरी वादळे अमेरिकेसाठी धोकादायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दशकांमधील संशोधने आणि काही महिन्यांमधील वाढलेल्या तापमानामुळे अमेरिकेवर नैसर्गिक संकट उद्भवू शकते. मोठे वादळ, पूर, भूस्खलनासारख्या आपदांना अमेरिकेला तोंड द्यावे लागू शकते. अमेरिका व लगतच्या खंडांवर या घटनांचे दुष्परिणाम होतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्चचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. यात अमेरिकेत चक्रीवादळ आणि सागरी वादळ येण्याची दाट शंका वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत सागरी वादळांची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. हे चांगले संकेत नाहीत. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात घट झाली नाही तर नैसर्गिक संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याचे सर्वाधिक परिणाम ईशान्य तसेच आखाती भागांना भोगावे लागू शकतात.

तीव्र वादळांच्या संख्येतही वाढ होऊ शकेल. यामुळे ७० टक्के अधिक पाऊस पडेल. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणावर पूर येईल. पण या संकटाचे स्वरूप ग्रंथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे नसेल. वायव्य भागात मुळातच आर्द्रता अधिक आहे. मध्य अमेरिकेला कधीही दुष्काळाचा किंवा अतिवृष्टीचा सामना करावा लागू शकतो. यात आर्द्रतेची भूमिका महत्त्वाची असते. अतिवृष्टीमुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढते. यामुळे तापमानात वाढ होते. परिणामी संपूर्ण देशात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पर्यावरण शास्त्रज्ञांनी मागील काही वर्षांत न्यू इंग्लंड आणि लुसियाना प्रांतातील पूरस्थितीचा अभ्यास केला. यात समोर आलेल्या तथ्यांनुसार, अशा प्रकारची संकटे अचानक उद्भवू शकतात. यांची पूर्वसूचना देता येत नाही. तरीही जागतिक तापमानवाढीच्या या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

शास्त्रज्ञांनी या संशोधनात अमेरिकन खंडाला चार चार चौरस किलोमीटर ग्रीडमध्ये विभागले व कॉम्प्युटर सिम्युलेशनद्वारे अतिवृष्टीचे दर तासाला मोजमाप केले. या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक आंद्रेया प्रेन म्हणतात, विविध भागांतील वातावरणात फरक आहे. काही भागांना अतिवृष्टीमुळे होणाऱ्या वादळांचा फटका बसणार नाही. वायव्य पॅसिफिक क्षेत्रात अशी वादळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे देशाला अशा आपत्तींना तोंड देण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवावी लागेल. मध्य पश्चिम क्षेत्रात एरवी दुष्काळ असतो, मात्र तेथे अचानक अतिवृष्टी झाल्यास जमिनीचे नुकसान होऊ शकते. जमिनीसाठी नियमित पाऊस आवश्यक असतो. पण दुष्काळ आणि अतिवृष्टी एकत्र आल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
तातिआना श्लसबर्ग, पर्यावरण रिपोर्टर
© The New York Times
बातम्या आणखी आहेत...