आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील: लाखाची मेजवानी, हजाराची टिप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन दिनानिमित्त खास भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात भाग घेण्यासाठी प्रत्येक जोडप्यास साडेतीन लाख रुपये मोजावे लागतील. अनेक र्शीमंत लोक या सोहळ्याचा आनंद घेतील, असा विश्वास हॉटेल व्यवस्थापनास आहे. त्यांचे भोजन तयार करणार्‍यांना तीन दिवस आधीच त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. भोजनात कॅव्हियरचाही समावेश असेल. स्टड्रजेन नावाच्या माशांच्या अंड्यांना कॅव्हियर म्हणतात. हे मासे इराण आणि रशियाजवळच्या समुद्रातून मिळतात. त्याबरोबरच परदेशातून आयात केलेले वाग्युबीफही शिजवले जाणार आहे. सोबतच डकच्या यकृतापासून बनवला जाणारा फुई ग्रास नावाचा पदार्थ या भोजनात असेल. या भोजन सोहळ्यात फ्रान्सहून आयात केलेली वाइनही पाजली जाणार आहे. एक प्लेट कॅव्हियर सहसा 12 हजार रुपयांना मिळते. नेहमी परदेशवारी करणार्‍या उच्चभ्रू लोकांना त्यांना या महागड्या खाद्यपदार्थांची कदर असते. मात्र, हे पदार्थ खाल्ले म्हणजे शरीरात अतिरिक्त ऊर्जा निर्माण होते, असा याचा अर्थ होत नाही. हा फक्त उच्चभ्रू लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्याचा खटाटोप आहे. जर एखाद्या सामान्य माणसाला कॅव्हियर दिले, तर तो त्यास पोह्यासारखे खाईल, जे व्यवस्थित शिजवलेले नसेल. तज्ज्ञ म्हणतील की, ‘बंदर क्या जाने अदरक का स्वाद’. खरे तर खाद्यपदार्थापेक्षाही अधिक चव शिजवली जाते आणि ती लोकप्रिय बनवणे हीदेखील एक कला आहे. पंचतारांकित हॉटेलांत मुख्य शेफचे वेतन लाखात असते. मात्र, वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबास मोफत स्वादिष्ट भोजन देणार्‍या गृहिणींची आपण किती कदर करतो? त्यांचे आजपर्यंत कुणीही आभार मानलेले नाहीत.
असो, काही व्यक्तींच्या एका वेळच्या भोजनाचा खर्च हजारो काही लोकांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त आहे. अजब-गजब भारताच्या विराट आर्थिक दरीचे यापेक्षा मोठे उदाहरण कोणते असू शकते? आदिवासी भागांचा विचार केला तर तेथील सगळ्या रहिवाशांना हेही माहीत नसेल की साडेतीन लाख रुपये म्हणजे एकावर किती शून्य लिहावे लागतात. या प्रकरणाची एक बाजू अशी आहे की, ज्या लोकांनी आपल्या बुद्धी व मेहनतीने अगणित संपत्ती मिळवली आहे, त्यांना साडेतीन लाख रुपयांचे भोजन करण्याचा अधिकार आहे आणि स्वातंत्र्यही. समान संधी एक आदर्श स्वप्न आहे, परंतु दोन वेळचे अन्न मिळवण्याचा अधिकार सर्वांना असायला हवा. या देशात असे कितीतरी लोक असतील ज्यांना संपूर्ण आयुष्यात एकदाही संपूर्ण भोजन मिळाले नसेल. संपूर्ण भोजन अर्थात कॅव्हियर नव्हे, तर केवळ दोन भाकरी, डाळ व भाजी. बस एवढेच स्वातंत्र्य आहे की, एकच भाजी तीन वाट्यांमध्ये वाढून आपल्या कल्पनेने तीन चवींना जन्म द्यावा. वास्तवातील कसर कल्पनेतून भरून काढावी. मन रिझवण्याची कल्पना चांगली आहे.
खरे तर समानता, स्वातंत्र्य व बंधुभाव हे माणसाचे नेहमीच आदर्श स्वप्न आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक राजकीय व्यवस्था तयार करण्यात व अवलंबण्यात आल्या आहेत. आज आपल्या देशात कोणत्याही राजकीय पक्षाकडे सिद्धांत नाहीये. सर्वच सत्तालोलूप आहेत. सर्वांनाच सत्ता व ताकद आपण तमासगिरांनीच दिली आहे. कधी गर्दी बनून, कधी टाळ्या वाजवून, कधी घोषणा देऊन.
खरे तर कोणतीही राजकीय विचारधारा वा व्यवस्था यशस्वी होण्यासाठी प्रत्येक माणसाचा विचार स्वतंत्र, नि:पक्ष असायला हवा. आपल्या शिक्षण संस्था तर केवळ परीक्षा उत्तीर्ण होणेच शिकवतात, कोणत्याही किमतीत यश मिळवणे शिकवतात. वाटेवर चालताना खाली पडलेल्या सहप्रवाशाच्या पाठीवर पाय ठेवून पुढे जाता आले तर ध्येय गाठणे शक्य आहे, असे शिक्षण दिले जात आहे. जेथे सगळ्या शिक्षण संस्थाच व्यावसायिक बनल्या आहेत, तेथे आयुष्याची प्राथमिक शाळा अर्थात कुटुंबातूनच योग्य मूल्य रुजवण्याची अपेक्षा बाळगली जाऊ शकते. मात्र, जीवनाचा संघर्ष आणि धावपळ इतकी निर्दयी झाली आहे की, वर्तमान पिढीस भावी पिढीस शिकवण्यास वेळ कुठेय? असो, साडेतीन लाखांचे भोजन करणारा 35 हजारांची टिपही देत असावा, कारण 10 टक्के टिप देणे हा उच्चभ्रू लोकांच्या सामाजिक जीवनाचा अलिखित नियम आहे. त्यापेक्षा कमी टिप दिली तर त्या पांढर्‍याशुभ्र कपड्यातील वेटरच्या कपाळावर आठय़ा पडतात. आपण स्वत:च आपले अज्ञान व कामचुकारपणाद्वारे जीवनाची अशी मेजवानी तयार केलीय आहे टिप हीच आपली एकमेव आशा उरली आहे. दयनीयतेला कोणतीही सीमा नाही.
jpchoukse@bhaskarnet.com