आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद टाळणे खरंच आपल्या हाती नसते?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आणि नंतर अशा दोन्ही वेळी वादात सापडला आहे. प्रदर्शनापूर्वीचा वाद अनपेक्षित उद््भवला असला तरी प्रदर्शनानंतरचा वाद टाळणे निश्चितच दिग्दर्शकांच्या हातात होते.

चित्रपटात अभिनेत्रीने दिवंगत गायक मोहंमद रफी यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे नवा वाद उद््भवला आहे. अनुष्का शर्माच्या तोंडी रफी यांच्याबद्दल ‘वो गाते नहीं, रोते हंंै..’ हे वाक्य आहे. मोहंमद रफी यांनी भारतीय संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिले असून त्यांनी गायलेली असंख्य गाणी अजरामर झाली आहेत. संवादलेखक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांना याची माहिती असणे साहजिक आहे. त्यामुळे रफी साहेबांविषयी उल्लेख करताना काही मर्यादांचे भान बाळगणे आवश्यक होते. एकीकडे भारतात गुरूंचे नाव मुखातून उच्चारताना आपले कान ओढणारे किंवा कानाला हात लावणारे शिष्य आहेत, तर दुसरीकडे महान कलाकारांबद्दल किंवा गुरूबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करताना अजिबात तारतम्य न बाळगणारे लोक आहेत. चित्रपटसृष्टीत हा प्रकार अनेकदा पाहावयास मिळतो.

या चित्रपटात अभिनेत्रीसाठी हे संवाद लिहिले असले तरी प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी तिला हे वाक्य म्हणण्यास नकार देता आला असता. अशा प्रकारची उथळ वक्तव्ये हल्लीच्या रिअॅलिटी शोमध्ये सर्रास केली जातात. चित्रपट हे जनसंवादाचे तसेच मनपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. अनेक चर्चांमध्ये चित्रपटातील कथा, प्रसंगांचे दाखले दिले जातात. त्यामुळे अशा गोष्टींचे भान दिग्दर्शकाने राखलेच पाहिजे. चित्रपटसृष्टीतील लोकांवर जनता भरभरून प्रेम करते,मात्र असे लागणे म्हणजे जनतेच्याच भावनांचा अनादर आहे. ज्यांना रफी कळलेच नाही तेच अशी वक्तव्ये पसरवतात. त्यांनी त्यांच्याच भ्रमात राहावे. रफी यांच्या खऱ्या चाहत्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
पार्थिवी जोशी, २५
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, गांधीनगर
बातम्या आणखी आहेत...