आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On American Journalist James Folly, Divya Marathi

मानवतेला काळिमा फासणारे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी पत्रकार जेम्स फोली यांची इराकमधील इस्लामिक बंडखोर संघटना आयएसआयएसने केलेली नृशंस हत्या अमेरिका व ब्रिटनमध्ये तणाव निर्माण व्हावा, यादृष्टीने एक चाल असू शकते. जेम्स फोलीचे एका धारदार शस्त्राने डोके धडापासून वेगळे करण्यात आले व हे कृत्य करणा-या दहशतवाद्याचे उच्चार ब्रिटिश पद्धतीचे असल्याने एकाएकी संशयाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच आयएसआयएसने फोलीच्या हत्येचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध केल्याने त्याचे पडसाद जगभरात उमटणे साहजिकच होते.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना तातडीने आपला परदेशी दौरा रद्द करून मायदेशी यावे लागले, तर अमेरिकेने जेम्स फोलीच्या हत्येचा बदला घेऊ, अशी धमकी दिली आहे. पण या घटनेच्या निमित्ताने आयएसआयएस या इस्लामिक बंडखोर संघटनेचे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य जगापुढे आले. फोली हा लिबियातील यादवीचे वृत्तांकन करण्यासाठी आले होते. त्यानंतर २०१२ पासून स‍िरियात त्यांनी असाद सरकार व आयएसआयएसच्या कारवायांबाबत वृत्तांकन सुरू केले होते. पण त्याच वर्षी नोव्हेंबर महनि्यात त्यांचे आयएसआयएसच्या बंडखोरांनी अपहरण केले होते. त्यांचा ठावठिकाणा कित्येक महिने अमेरिकेला कळू शकलेला नव्हता, पण नंतर त्यांच्या सुटकेसाठी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेकडे लाखो डॉलरची खंडणी मागितल्याने फोली जविंत असल्याचे अमेरिकेला कळले होते. अमेरिकेने खंडणीही देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची हत्या केल्याचे आता सांगितले जात आहे. लाखो डॉलरच्या खंडणीसाठी पत्रकारांना ओलीस ठेवणे हा एक नवा प्रकार अशांत अशा पश्चमि आशियात सर्रास दिसू लागला आहे. त्यामुळे फोली यांची हत्या करताना बंडखोरांनी अमेरिकेने स‍िरियावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे, पण पैसे दिले असते तर त्याची सुटका झाली असती, असेही सांगितले आहे. या बंडखोरांनी स्टीव्हन सॉटलोफ या आणखी एका अमेरिकी पत्रकाराचीही फॉलीसारखी हत्या करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे.