आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅन अॅप अ डे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे अशी इंग्रजीत म्हण आहे. म्हणजे दररोज सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा अर्थात तंदुरुस्त राहा. त्याच धर्तीवर आता अॅन अॅप अ डे, बट कीप चिल्ड्रन अवे असे म्हणावे लागणार आहे. आजकालची तरुण पिढीच नव्हे तर मुलेदेखील स्मार्टफोनच्या आहारी जात आहेत. स्मार्टफोनवर गेम खेळण्यासाेबतच विविध प्रकारची अॅप ही पिढी लीलया हाताळते.पण आता हाच विषय चिंतेचाही झाला आहे. म्हणजे एकेकाळी टीव्हीमुळे मुले मैदानावर जात नव्हती. आता त्यात स्मार्टफोनची भर पडली. मुलं तासन््तास फोनशी खेळत बसतात,अभ्यास सोडाच, पण आवाज दिला तर त्यांचे लक्षही नसते,अशी पालकांची तक्रार आहे. पालकांच्या या तक्रारीवरचा एक उपाय अर्थात तोही अॅपच्याच रूपाने सापडला आहे.'इग्नोर नो मोर' नावाचे हे अॅप असून अमेरिकेतील टेक्सासच्या शेरॉन स्टँडीफर्ड या महिलने त्याची निर्मिती केली आहे. हे अॅप आपल्या आणि मुलांच्या स्मार्टफोनमध्ये टाकायचे.
स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या मुलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे अॅप कामास येईल, असा दावा तिने केला आहे. तासन््तास स्मार्टफोनवर खेळत बसणा-या मुलांचा स्मार्टफोन हे अॅप लॉक करेल असे स्टीफन यांचे म्हणणे आहे. आपण अॅपमध्ये मुलाचे नाव टाकायचे आणि एक चारआकडी कोड टाकायचा. त्यानंतर मुलाच्या हातातील स्मार्टफोन तत्काळ लॉक होईल आणि हे लॉक उघडण्यासाठी मुलांना पालकांचीच मदत घ्यावी लागेल. पालकांनी पासवर्ड दिला तरच हे लॉक उघडेल. आताच्या पिढीला आपण स्मार्टफोन, इंटरनेट या गोष्टींपासून दूर ठेवू शकत नाही. प्रश्न आहे तो फाजील लाडांचा. अमेरिकेतील असो वा भारतातील स्मार्टफोन किंवा इंटरनेटच्या बाबतीत दोघांचेही दुखणे एकच आहे. तंत्रज्ञानामुळे या समस्यांच्या रेषाही पुसट झाल्या आहेत. स्मार्टफोन किंवा इंटरनेटमुळे मुलांचा एकलकोंडेपणा वाढतो आहे. मुलांचे लाड कितपत करायचे याची लक्ष्मणरेषा पालकांनीच ठरवायला हवी. अन्यथा त्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करण्याची वेळ येऊ नये, इतकेच.