आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँडविड्थ आणि त्याचे उपयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या काळात बँडविड्थ प्रत्येक घराशी संबंधित आहे. मग तो कॉम्प्युटर, लॅपटॉप असो, माेबाइल असो की कार्यालयातील मोठमोठ्या फाइल्स ट्रान्सफर करण्याचा विषय असो. बँडविड्थशिवाय ते चालूच शकत नाहीत. तुमच्या घरी इंटरनेट कनेक्शनची स्पीड बँडविड्थवर अवलंबून असते. बँडविड्थमुळेच या वस्तूंचा वापर करणे सोपे जाते. बँडविड्थ म्हणजे काय यासंदर्भात जाणून घ्या...
बँडविड्थ शब्दाचा वापर दाेन प्रकारे होतो. पहिला इंटरनेटच्यासंदर्भात. यात किती डाटा ठरावीक काळात ट्रान्समिट केला जातो आहे, हे बँडविड्थमुळे समजते. तो बिट्स प्रति सेंकद (बीपीएस) या दराने मोजला जातो. यात तो एक बँडची फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथची रेंज दाखवतो.
इंटरनेटच्या संदर्भात
जितकी जास्त बँडविड्थ असेल तितक्या वेगाने डाटा ट्रान्सफर करता येतो. हा डाटा बिट्समध्ये माेजला जातो. ज्या दराने डाटा ट्रान्सफर केला गेला आहे, तो बिट्स प्रति सेकंद या हिशेबाने मोजला जातो. एक किलोबिट म्हणजे एक हजार बिट्स आणि मेगा बिट्स अर्थात एक हजार किलोबिट. हा दर जितका जास्त असेल तितकीच इंटरनेटची स्पीड असेल. हाय बँडविड्थचा अर्थ २ ते ४ एमबीपीएस या दराने डाटा ट्रान्सफर करणे ४ जी (फोर्थ जनरेशन) बँडविड्थ म्हणजे ३ जी पेक्षा जास्त स्पीड आहे, हे उघड. परंतु देशात काही ठिकाणीच अशी स्पीड मिळते. सामान्यत: ब्राउझिंगसाठी २ एमबीपीएस बँडविड्थ पुरेशी मानली जाते.
डाटा डाऊनलोड किंवा अपलोड करताना स्पीड वेगवेगळी असते. डाऊनलोडचा अर्थ एखाद्या माहितीचा डाटा एखाद्या उपकरणात सेव्ह करणे. अपलोडबद्दल बोलायचे झाल्यास मजकूर एखाद्या वेबसाइटवर छायाचित्र किंवा व्हिडिओप्रमाणे अपलोड केला जाऊ शकतो.
समजा तुम्ही महाविद्यालयात ऑनलाइन अॅडमिशन फाॅर्म भरणार असाल किंवा एखाद्या कंपनीची नोंदणी करत असाल, त्याप्रमाणेच मजकूर अपलोड होत असतो. साधारणत: डाऊनलोडची स्पीड अपलोडपेक्षा जास्त असते. अशा प्रकारच्या सेवा देणा-या कंपन्या आपल्या जाहिरातीत स्पीडचा उल्लेख करतात. जर कंपनी २० एमबीपीएस स्पीड देण्याचे आश्वासन देत असेल, तर ती सर्वाधिक स्पीड आहे. मात्र, चांगल्या परिस्थितीतच ती मिळू शकते. परंतु युजर्स जास्त असतील तर स्पीड कमी होणारच. यासाठी युजर्सनी प्लॅन घेताना आपल्या जवळच्यांना किंवा शेजा-यांना या सर्व्हिस प्रोव्हायडरची स्पीड कशी आहे, हे विचारावे.
हे आपण एका उदाहरणावरून जाणून घेऊया- एक व्यवसायिक आहे. दिवसभर काम करून तो जेव्हा घरी पाेहोचतो. तेव्हा प्रथम तो आपला स्मार्टफोन बंद करतो. पत्नी इंटरनेटद्वारे टीव्हीवर मालिका पाहत आहे. अचानक त्या व्यावसायिकाला जाणवते की, न्यूज चॅनेलवर काही कमोडिटीजच्या किमती पाहायच्या आहेत, परंतु घरात टीव्हीवर मालिका चालू आहेत. मुलगा टॅब्लेटवर ऑनलाइन गेम खेळतो आहे. मुलगी डेस्कटॉपवर एचडी मूव्ही डाऊनलोड करते आहे. शेवटी तो आपला स्मार्टफोन चालू करतो आणि आपल्या कामाच्या बातम्या पाहतो.
येथे उल्लेखनीय गोष्ट अशी की, व्यावसायिकाच्या घरात सर्व उपकरणे इंटरनेट सेवा देणा-या एकाच कंपनीच्या माध्यमातून चालू आहेत. ती सर्व वायफायद्वारे कनेक्टेड आहेत. याचे कारण असे की, बँडविड्थ खूप चांगली आहे. त्यामुळे व्यत्ययाशिवाय सर्व डाटा डाऊनलोड करू शकते.
बँडविड्थ म्हणजे काय?
इंटरनेटच्या संदर्भात पाहिल्यास अशा प्रकारे ती समजून घेता येते : समजा तुम्ही एखाद्या महामार्गावरून जात आहात. तुम्हाला अ ठिकाणाहून ब ठिकाणचे अंतर किती, ते जाणून घ्यायचे आहे. तुमच्या वाहनाची गती किती असावी, हे रस्त्याच्या रुंदीवर अवलंबून नसते. रस्त्यावर वाहने किती आहेत तेसुद्धा पाहावे लागणार आहे. समजा या महामार्गावरून एका तासात एक हजार वाहने जाण्याची क्षमता आहे, तर ती त्याची बँडविड्थ आहे.
आणखी उदाहरण, जर तुम्हाला एका टाकीत पाणी भरायचे असेल, तर त्याला किती वेळ लागतो ते पाइपचा व्यास आणि पाण्याच्या दाबावर अवलंबून असेल. येथे पाण्याचा जो व्यास असेल आणि पाण्याचा जो दाब असेल त्यावरून पाण्याचा फ्लो लिटर प्रति सेंकदावरून ठरेल. ती त्याची बँडविड्थ असेल. अशा प्रकारे इंटरनेट उपकरणात बँडविड्थ मेगाबिट्स प्रति सेकंद या हिशेबाने ठरते.
मोबाइल तंत्रज्ञानासंदर्भात
त्या व्यावसायिकांच्या दृष्टीने समजून घेऊया- हा व्यावसायिक आपल्या अमेरिकेतील भावाला फोन लावतो. त्यानंतर तो आपले छायाचित्र आणि एक व्हिडिओ भावाला पाठवतो. या सर्व कम्युनिकेशन्समध्ये डाटा, बँडविड्थ किंवा स्पेक्ट्रमद्वारे पाठवला जातो. तो आपणास मोबाइल सेवा देणा-या कंपनीकडे सरकारद्वारे देण्यात आलेला आहे. स्पेक्ट्रम रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. तो नॅशनल रिसोर्स आहे. याच्या फ्रिक्वेन्सीला हर्ट््झमध्ये मोजावे लागते. हे नाव प्रसिद्ध जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिक हर्ट््झ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
२०१५ च्या आरंभी दूरसंचार मंत्रालयाने आणि सूचना प्रसारण मंत्रालयाने २१००, १८००, ९०० आणि ८०० मेगाहर्ट््झच्या बँड्सच्या लिलावाची घोषणा केली होती.
व्हाॅइस कॉलच्या संदर्भात
इंटरनेटवर डाटा ट्रान्समिशनच्या तुलनेत व्हाॅइस ट्रान्समिशनमध्ये खूप कमी बँडविड्थ लागते. याचे कारण असे की, इंटरनेटद्वारे ट्रान्सफर केले जाणारे ऑडिओ, व्हिडिओ आणि छायाचित्रांची फाइल साइज खूप जास्त असते, तर व्हाॅइस कॉलमध्ये खूप लहान फाइल असते. सामान्यत: व्हाॅइस काॅलमध्ये एकीकडून जी व्यक्ती बोलत असते ती केवळ ५० टक्के कालावधीतच बोलते. याचा अर्थ असा की, प्रत्येक कॉलमध्ये जी फाइल ट्रान्सफर होते ती तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी असते.
काॅर्पोरेट वर्ल्डमध्ये याचा अर्थ
बँडविड्थची आणखी एक बाजू आहे. ती याच्या तांत्रिकदृष्ट्या वेगळी आहे. कॉर्पोरेटमध्ये या शब्दाचा जो वापर असतो तो काम करण्याची क्षमता असणे किंवा नसण्याशी संबंधित आहे. ते उपलब्ध असलेले साधन म्हणजे वेळ, संसाधन इत्यादीवर अवलंबून असते.
एखादे काम पूर्ण करण्यासाठी जर पुरेसे बँडविड्थ नसेल तर ते कार्य शक्य नाही. जर एखाद्या कार्यालयात एका ग्राहक सेवा केंद्रातील प्रतिनिधीकडे कोणा दुस-या व्यक्तीचे काम आले, तर र्इमेलवर वेगाने वाढणा-या ग्राहकांच्या तक्रारींना त्याला पुरेसे बँडविड्थ (क्षमता) नसल्याने उत्तरे देता येत नाहीत, असेही घडू शकते. म्हणजे त्याच्याकडे ते अतिरिक्त काम करण्याची क्षमता नाही. यासाठी जास्तीचे काम दिल्यानंतर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असे म्हटले जाते की, माझी इतकी बँडविड्थ नाही.