आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही निवृत्तीनंतरची बकेट स्ट्रॅटेजी स्वीकारली आहे काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार, फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य
कोणत्याही निवृत्त व्यक्तीसमोर गरजेपुरते धन जमा करण्याचे सर्वात मोठे आव्हान असते. जून २०१४ मध्ये निवृत्त झालेल्या रविशंकर यांना हीच समस्या भेडसावते आहे. कोणतीही व्यवस्थित गुंतवणूक योजना न करता त्यांनी मुदत ठेव आणि पोस्ट ऑफिसच्या योजनेत पैसे गुंतवले. तसे पाहू जाता त्यांचा निर्णय चांगला होता. कारण, यात ठरावीक उत्पन्न मिळणारच होते. परंतु यात अनेक अडचणी येतात. जे उत्पन्न येते त्यावर कर लागतो. परतावा भरला जातो, तो योग्य प्रकारे भरलेला नसतो. मुदती ठेवीतही कर लागतो. त्याचबरोबर पुन्हा यात गुंतवणूक करणे जोखमीचे असते. दुसरीकडे डेबिट म्युच्युअल फंडात उत्पन्न ठरलेले नसते. तुम्ही त्यांनी दिलेल्या परताव्यावर अवलंबून राहता. डेबिट मार्केटमध्ये नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करावा लागतो. तथापि रविशंकर यांनी डेबिट मार्केटमध्ये रक्कम गुंतवण्याचा पर्याय निवडलेला नाही. तुम्ही अशा प्रकारे योजना आखत असाल तर तुमची योजना करप्रणाली आणि महागाईचा चुकीचा अंदाज किंवा अंदाज न आल्याने बारगळते. निवृत्त झाल्यानंतर २५ ते ३० वर्षांपर्यंतच्या कालावधीत आयुष्य कंठावे लागते. एक अनिश्चित व्याजदर आणि ठरलेल्या परताव्यानुसार तुम्हाला आरामदायी जीवन जगणे शक्य होत नाही. तुमच्याजवळील गुंतवणुकीचे तुम्हीच नियोजन करावे. यासाठी तुम्हाला आवश्यक तेवढा पैसा मिळायला हवा अन् तोही जेव्हा तुम्हाला कष्टाची कामे करता येणे शक्य नसताना. निवृत्तीनंतर अशी कोणती योजना असावी, जी निवृत्तीनंतरच्या कालावधीत तुमच्या सर्व गरजा भागवू शकेल. यासाठी बकेट स्ट्रॅटेजी समजून घ्या. तिचे कार्यही समजून घ्यावे लागेल. ही स्ट्रॅटेजी नावाप्रमाणेच आहे. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओची बकेट बनवावी, असे ही नीती सांगते. त्यामुळे वेगवेगळ्या अवधीसाठी तुमची गरज भागवता येऊ शकते. उदा. ३ ते १० वर्षांपर्यंत. १० वर्षांहून अधिक कालावधीसाठी. वेगवेगळ्या कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट बकेट तुमची गरज पूर्ण करते, तरीही यासाठी वेगवेगळा पोर्टफोलिओ असावा. तत्काळसाठी रोख गुंतवणुकीने पूर्ण होते. यामुळे तुमचा दोन वर्षांपर्यंतचा खर्च निघू शकतो. ३ ते १० वर्षांपर्यंतच्या खर्चासाठी असलेल्या बकेटमध्ये अल्पावधी आणि मध्यमावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल. १० वर्षांवरील कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास इक्विटीसारख्या योजना आहेत. यामुळे योग्य वाढ तर मिळेलच, शिवाय महागाईसुद्धा सहन करता येण्यासारखी आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पैशाची ग्रोथ ठरवू शकता. काही अन्य गरजा एखाद्या अन्य बकेटद्वारे पूर्ण करता येतात. सांगण्याचे तात्पर्य असे की, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार वर्षांचा कालावधी वाटून घ्यायचा आहे. त्या हिशेबाने तुम्हाला पैसे कधी कधी लागणार आहेत, याची माहिती घ्या. तुम्ही कमी वयात निवृत्ती घेणार असाल तर तुम्हाला ४ बकेट तयार कराव्या लागतील. उशिराने निवृत्ती घेणार असाल तर तुमच्या हातात पुढील १० वर्षे असतील अन् तुम्हाला २ बकेट तयार कराव्या लागतील. कारण, दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. रविशंकर यांची परिस्थिती आपण चांगल्या प्रकारे जाणतो. ते वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त झाले. त्यांच्याकडे २ कोटी रुपये आहेत. हा पैसा त्यांनी आयुष्यभरात जमवला आहे. आपण त्यांच्या धोरणाप्रमाणे गेलो तर सर्व धन ठरावीक उत्पन्नाच्या पर्यायातच गुंतवले जाते. ही रक्कम जास्तीत जास्त १५ वर्षांपर्यंत कामी येईल. कारण, महागाई आणि करांमुळे परताव्यावर परिणाम होतो. त्यासाठी त्यांनी ३ बकेट बनवणे गरजेचे आहे.
पहिली बकेट :
पहिले ५० लाख रुपये
मुदत ठेवी आणि मनी मार्केट म्युच्युअल फंड : यामुळे तुमचा दोन वर्षांचा खर्च भागू शकतो. ही गुंतवणूक अल्पावधीसाठी असल्याने बहुतांश रक्कम िनघेल आणि बचत खात्यात जमाही होईल. मनी मार्केट म्युच्युअल फंड तरल मार्केट मानले जाते, परंतु यातूनसुद्धा २ वर्षांचा खर्च निघून जाईल.
दुसरी बकेट : दुस-या ५० लाखांची
मध्यम मुदती म्युच्युअल फंड, बाँड्स आणि अल्पबचत योजना - या बकेटातून ३ ते १० वर्षांच्या उत्पन्नात आपल्या गरजा पूर्ण करता येतात. तसे पाहिले तर मूळ रक्कम वाचवून एका चांगल्या उत्पन्नाची वाढ होऊ शकते. त्यावर महागाईचा परिणाम होणार नाही. तथापि तुम्ही कशा त-हेने रक्कम काढत आहात किंवा खर्च करत आहात, त्या हिशेबाने पोर्टफोलिओ तयार होईल. यासाठी अल्पावधी किंवा दीर्घमुदती गुंतवणूक करू शकाल. म्युच्युअल फंडात एमआयपीसुद्धा या पोर्टफोलिओमध्ये घेऊ शकता. होल्डिंग ३ वर्षांचे असेल तर ते दीर्घमुदती करता येते.
तिसरी बकेट : तिसरे ५० लाख
इक्विटी आणि दीर्घमुदती बाँड्स : ही शेवटची बकेट आहे. यात १० वर्षांहून अधिक आणि २५ वर्षांपेक्षा कमी अवधीसाठी रक्कम गुंतवता येते. ही दीर्घमुदती गुंतवणूक असेल. यात महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळेल. यासाठी या पोर्टफोलिओमध्ये रक्कम ग्रोथ असेटमध्ये लावला पाहिजे. यात विशेषत्वाने इक्विटी असेल. इक्विटीमध्ये निवृत्ती लक्षात घेऊन रक्कम लार्ज कॅप फंडात जावी. त्यामुळे सातत्य टिकून राहते आणि या शेअर्सचे भाव खाली येत नाहीत. काही रक्कम दीर्घमुदती इन्कम फंडमध्ये गुंतवण्यात यावी. वर दिलेली बकेट हे केवळ उदाहरण आहे. ती कशा प्रकारे तयार होईल आणि त्यात काय असेल हा निर्णय तुमची जोखीम घेण्याच्या क्षमतेवर रक्कम काढण्याच्या गरजेच्या हिशेबाने ठरेल.
दीर्घमुदतीसाठी उत्पन्न निर्माण करणारे प्रॉडक्ट कमी वयाएेवजी जास्त वयासाठी घेतले पाहिजे. कारण, कमीत कमी रकमेत जास्त फायदा मिळायला हवा. अशा प्रकारे दीर्घमुदतीचे करमुक्त बाँड्ससारखे फिक्स इन्कम प्रॉडक्ट
किंवा कॉर्पोरेट बाँड बकेट स्ट्रॅटेजीमध्ये
येतात. यावर महागाईचा परिणाम होत
नाही. योग्य परिस्थिती आणि स्वत:च्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्हाला निवृत्तीची योजना तयार करायची आहे, ज्यायोगे तुम्हाला दीर्घकाळ फायदा मिळत राहावा.