आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीयवादाला आता वंशवादाचे वळण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दलितांकडून विरोध आणि कडव्या प्रतिकाराच्या वाढत्या प्रकरणामुळे एका जुन्या चर्चेला पुन्हा चालना मिळाली आहे. देशभरात सुरू असलेला दलित विरोध अत्याचार आणि भेदभावामुळे भडकला आहे, परंतु हा निश्चितच गोरक्षणापुरताच मर्यादित नाही. रोहित वेमुलाचेच उदाहरण घ्या. त्याच्या आत्महत्येमुळे पहिली ठिणगी पेटली. त्याचा आणि गोमांसाच्या मुद्द्याचा काही संबंध नव्हता. मग जातीयवादाची तुलना वंशवादाशी करता येते का? ही जुनी चर्चा आहे.
या वस्तुस्थितीवर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, परंतु जातीयवादामुळे शतकानुशतके कोट्यवधी भारतीयांना त्रास, अन्याय-अत्याचार सहन करावा लागला. अलीकडचा घटनाक्रम पाहता हा प्रकार अजूनही थांबलेला नाही, उलट ती परंपरा पुढेही चालू आहे, याचे स्मरण करून देतो. ६५ वर्षांतील सकारात्मक कार्यक्रम, शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षणानंतरही सरकार, न्यायपालिका, व्यावसायिक क्षेत्र, काॅर्पोरेट जगतात आणि माध्यमातही खूप कमी प्रमाणात दलित जबाबदार आणि सत्तेच्या स्थानावर, पदावर गेले आहेत, हे विसरून चालणार नाही. जातीयवाद अशी परंपरा आहे की, त्यामुळे होणारे इतर परिणाम तर सोडा, आपल्या २० टक्के भारतीयांना बहुतांश हिंदूंना भयानक असे भेदभाव सहन करावे लागले. त्याशिवाय असे अनेक वर्गही आहेत, ज्यांचा इतर मागासवर्गीयात मागाहून समावेश करण्यात आला. त्यांनाही विविध प्रकारचा त्रास आणि अडचणी सोसाव्या लागल्या. ही मंडळी त्यांच्या अनिवार्य, परंतु कमी उत्पन्न असलेल्या पारंपरिक आणि वडिलोपार्जित जाती व्यवसाय करण्याचा अभिशाप कवटाळून आहेत. पशुपालनापासून लोहारकामासारखी अनेक छोटी-मोठी कामे करीत आहेत.
जर भेदभावाची तीव्रता तसेच त्यातील सखोलता आणि इतिहास पाहिला तर प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेत आणि जगात इतरत्र ज्याप्रमाणे वंशवाद आणि वर्णभेद दिसून येतो त्यापेक्षाही येथील भेदभाव वेगळा आहे, असे सांगणे खूप अवघड आहे. या समस्येकडे ज्या दृष्टिकोनातून दुसरा पक्ष पाहत असतो तो याला तीव्र विरोध करतो. यात साधारणत: तथाकथित उच्च जातीचे लोक असतात. या एकाच धर्मात कला आणि भूमिकेच्या आधारावर जातिव्यवस्था विभागली गेली आहे, असा त्यांचा दावा असतो. ही जातिव्यवस्था उत्तम सामाजिक समरसता आणि व्यवस्थेच्या सोयीसह आर्थिक तथा सामाजिक स्थैर्यासाठी बनवण्यात आली होती.
मनुवादी विचारसरणीच्या या मंडळीचे असेही म्हणणे होते की, मनूच्या दृष्टिकोनातून कोणतीही जात उच्च किंवा नीच नव्हती. प्रत्येक जातीला एक भूमिका देण्यात आली होती. जर एखादे काम करण्याचे कौशल्य एखाद्या परिवारात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्यात येत असेल तर त्यात काय चुकीचे आहे? अशा प्रकारे व्यवसायसुद्धा वडिलोपार्जित झाले. आता ही तर आपल्याच बुद्धीप्रमाणे आत्मप्रौढी मिरवण्यासारखी स्थिती झाली. मग इतरांना ती पटो अथवा न पटो. ही एक परंपरा किंवा उच्चकुळातील वंशजांनी त्यांच्या सोयीसाठी रचलेले एक कथानक आहे. ते एकलव्यापासून रोहित वेमुलापर्यंत आणि आता गुजरातेतील स्वयंघोषित गोरक्षकांनी त्यांच्या दलित सहकाऱ्यांना ढोरे वाहून नेण्याचे काम देण्यावरून योगेश सारखेडा यास मारहाण केली आणि त्याने या प्रकरणी आत्महत्या केली. अशा लाखो उदाहरणांवरून ते सिद्धही करता येईल. हे तर केवळ एक उदाहरण आहे.
मनूचा उद्देश जो काही असेल, परंतु आता जातीयवादाने आता वंशवादाचे स्वरूप धारण केले आहे, हे सिद्ध करण्यासाठीआमच्याकडे अानुवंशिक आणि मानव वंशशास्त्रीय असे दोन्ही शास्त्रीय पुरावे पुरेसे आहेत. ही देशात सामाजिक समरसतेला धोका उत्पन्न करणारी तसेच लाजिरवाणी बाब आहे. यावर्षीच्या जानेवारीमध्ये “हिंदू’च्या मोहित एम. राव यांनी एका अभ्यासावर अाधारित अहवाल प्रसिद्ध केला. हे अध्ययन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स(एनआयबीएमजी) च्या संशोधनकर्त्यांनी केले होते. संशोधनकर्त्यांनी या प्रश्नावर विचार करण्यासाठी विविध समाजाच्या जीन्सचा अभ्यास केला. उच्चवर्गात एंडोगॅमी (सगोत्र विवाह)म्हणजे आपल्या जातीत गेल्या ७० पिढ्यांपासून विवाह करण्याची प्रथा सुरू झाली. इतिहासाच्या दाखल्यानुसार १५०० वर्षांपूर्वी हिंदू गुप्तकाळात अशा विवाहाची सुरुवात झाली, असा निष्कर्ष काढला. त्यांचे संशोधन प्रोसेडिंग्ज ऑफ युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकासारख्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
संशोधकांनी निष्कर्ष काढला की, त्या काळात सामाजिक रूपांतरणामुळे जातीमध्ये विवाह करण्याच्या विरोधात सामाजिक व्यवहारावर बंधने घालणारे नियम आले. ज्यांचा धर्मशास्त्रात उल्लेख होता. सावधपणे करण्यात आलेल्या अनुवांशिक अभ्यासानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, या सर्वांची छाप भारतीयांच्या डीएनएवर पडलेली आहे. डीएनएमध्ये पैतृक जीन्सचा एक संपूर्ण ब्लॉक दिसून आला आहे. जे ७० पिढ्यांपासून सुरू झाले होते. ते प्रत्यक्षात आतापर्यंत उलटता आलेले नाही. जर याबाबतीत तुम्हाला काही संशय वाटत असेल तर तुम्ही सर्व वृत्तपत्रे आणि दलितांकडून विरोध आणि कडव्या प्रतिकाराच्या वाढत्या प्रकरणामुळे एका जुन्या चर्चेला पुन्हा चालना मिळाली आहे. देशभरात सुरू असलेला दलित विरोध अत्याचार आणि भेदभावामुळे भडकला आहे.
बातम्या आणखी आहेत...