आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलालांचे बोर्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटाला विनाकात्री मार्केटमध्ये आणण्यासाठी सेन्सॉर बोर्डचे एका झटक्यात प्रमाणपत्र मिळवणे ही आता फक्त काही पैसे फेकून पूर्ण करण्याची औपचारिकताच उरली आहे असे उघडपणे म्हणायला सेन्सॉर बोर्डाचे निलंबति अध्यक्ष राकेश कुमार यांनी संधी दिली आहे. कुमार यांना अटक झाली ती ‘मोर डऊकी की ब‍िहाव’ या छत्तीसगडमधील चित्रपटाच्या प्रमाणपत्रासाठी लाच घेतल्याप्रकरणात. त्यांच्याबरोबर सेन्सॉर बोर्डचे सदस्य सर्वेश जैस्वाल यांनाही अटक झाली, शिवाय कुमार यांना ५ ते ६ लाख रु.ची लाच आणून देणा-या श्रीपती म‍िश्रा या एजंटलाही अटक करण्यात आली आहे. कुमार यांना निलंबति केले गेले असले तरी यानमिति्ताने सेन्सॉर बोर्ड भ्रष्टाचाराने क‍िती पोखरले गेले आहे हे उघड झाले आहे.
समाजामध्ये खोलवर रुजलेले चित्रपटाचे माध्यम प्रत्येकाच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनला असतानाच्या कुठला चित्रपट पडद्यावर आणायचा, त्यातील कुठली दृश्ये कापायची वा नाहीत हे सद‌्सदविवेकबुद्धीने नव्हे तर पैशाची किती बंडले टेबलाखालून दिली जातात यावरून ठरवायचे कुमार यांचे धोरणच लाजरिवाणे आहे. पंधरा दविसांचा कालावधी लागणा-या प्रमाणपत्राची उपलब्धी केवळ तीन ते चार दिवसांवर आणण्यासाठी दीड लाख रु. तर एका आठवड्यासाठी २५ हजार रु. अशा रकमा कुमार यांनी ठरवल्या होत्या. "सिंघम रिटर्न्स"साठी रोहित शेट्टी व "किक" चित्रपटासाठी त्या चित्रपटाचे नरि्माते गुप्तपणे कुमार यांना भेटूनही गेले होते. या बगि बजेटच्या चित्रपटांवरून आतापर्यंत किती चित्रपटांच्या बाबतीत असे घोटाळे घातले गेले हे सांगणे कठीण आहे. ‘शाहदि’ या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यावरुन दगि्दर्शक हंसल मेहता यांनी माहिती अधिकाराचा अर्ज भरला होता.
कुमार यांनी रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतला नव्हता की आमरि खानच्या ‘देल्ली बेल्ली’ चति्रपटाच्या बाबतीत हात वर करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे लाचखोरीतून मिळणा-या नफ्यावर चित्रपटाचे प्रमाणपत्र ठरवायचे ही पद्धत कायदा विकत घेणा-यांच्या सोयीची आहे, तितकीच निर्मिती मूल्यांशी तडजोड न करता अभिव्यक्तीचा आग्रह धरणा-या कलावंतांवर अन्याय करणारी आहे. कुमारसारखी अशी किती
माणसे या क्षेत्रात दलाली करत असतील हे शोधणे आता व्यवस्थेपुढचे खरे आव्हान आहे.