आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Crowd Sourcing By Dr.Sharmishtha Sharma

क्राऊड सोर्सिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया अभियानाची नुकतीच सुरुवात केली. यात लाँच केलेल्या १४ प्रकल्पांत डिजिटलाइज इंडिया प्लॅटफाॅर्म (डीआयपी) जगातील सर्वात मोठे क्राऊड सोर्सिंग माॅडेल आहे. यात कोट्यवधी लोकांना सरकारी कागदपत्रांच्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जोडले जात आहे. शेवटी क्राऊड सोर्सिंग म्हणजे काय?
चार गरीब मुलांना अवघ्या दोन तासांत आयआयटीला प्रवेश घेण्यासाठी दोन तासांत २५ लाख रुपये मिळतात. हे क्राऊड सोर्सिंगनेच शक्य होते. क्राऊड सोर्सिंग हा व्यावसायिक शब्द आहे. याला सर्वप्रथम जेफ हॉव आणि मॉर्क रॉबिन्सन यांनी सुरुवात केली होती. या प्रक्रियेत तत्काळ पैसे किंवा लोकांना आॅनलाइन काम मिळते आणि काही लोक यात जोडले जातात. यात क्राऊड आणि आऊटसोर्सिंगचा जोड आहे. यामागे कोणाचे तरी कार्य, लोकांची गर्दी आऊटसोर्स करण्याची कल्पना आहे. पैसे जमवायचे असतील तर ते क्राऊड फंडिंग असे म्हटले जाते. स्टार्टअप्स अशी पद्धत वापरतात.
याची उदाहरणे
स्नेह शर्मा आणि शिव आनंद हे एमएस युनिव्हर्सिटी वडोदरा येथील विद्यार्थी आहेत. त्यांच्या मनात दुर्लभ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचे संग्रहालय करण्याचा विचार आहे. जगभरात त्यांनी पैसे उभे करण्यासाठी फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावर अभियान चालवले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी फंड्सबरोबरच काही कल्पनाही दिल्या. या प्रक्रियेस क्राऊड सोर्सिंग म्हटले जाते.
क्राऊड सोर्सिंग अशी असते
ओपन फोरममध्ये लोकांचे मत मागितले जाते. लोकांमध्ये खुली स्पर्धा ठेवण्यात येते. जी टॉप एंट्री असेल तिची निवड होते आणि विजेत्यास मान्यता दिली जाते. याचा अर्थ असा की, सूचना लोकांमधून (क्राऊड) येतात. क्राऊड सोर्सिंगमध्ये खर्च कमी आणि प्रचार जास्त, पण वेगाने
होतो. सरकारसुद्धा याचा गतीने वापर करते आहे. कारण यात शासनाची पॉलिसी किंवा प्रचार मोहीम लोकांपर्यंत पोहोचते.
सबका साथ सबका विकास
१५ ऑगस्ट रोजी जाहिरातीसाठी क्राऊड सोर्सिंग केली गेली. विषय आहे, "सबका साथ सबका विकास' यात हजारो एंट्री आल्या. म्हणजे इतक्या लोकांपर्यंत सरकारची माहिती पोहोचली. त्यांनी हा विषय बारकाईने समजून घेतला. महिला बालविकास मंत्रालयाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेसाठी एसएमएस स्पर्धा आयोजित केली आहे. मंत्रालयाने एसएमएसच्या मजकुराबाबत लाेकांचे मत विचारले आहे.
क्राऊड सोर्सिंगचे प्रकार
जेफ होवद्वारे याचे काही प्रकार सांगण्यात आले आहेत.
१. क्राऊड क्रिएशन
क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीज ही याची प्रचलित पद्धती आहे. यात चित्रपट, टीव्ही, भाषा अनुवाद किंवा वैज्ञानिक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आवाहन केले जाते. याचे उदाहरण नॅशनल ऑडूबन सोसायटीज ईबर्डमध्ये अमॅच्युअर बर्डवाॅचर्स रिपोर्ट आणि त्यांच्या मायग्रेशन पॅटर्नचा उल्लेख आढळतो. मंगळावरील मोहिमेसाठी नासाच्या लोकांनी याचा प्रयोग केला होता. भारतात मायजीओव्ही २.० ला ओपन सोर्स टेक्नॉलाॅजीच्या रूपात बिल्ट केले आहे. यामागे नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर काम करत आहे. हा शासनाचा महत्त्वपूर्ण विभाग आहे. येथे लोकांशी थेट संपर्क साधता येतो. ही एक प्रकारची चर्चा करण्याची फोरम आहे. सरकारने देशात प्रत्येक व्यक्तीचे खाते बँकेत सुरू करण्यासाठी जनधन योजना सुरू केली. ते नावसुद्धा मायजीओव्ही पोर्टलवर आयोजित स्पर्धेतून निघाले.
२. क्राऊड व्होटिंग
क्राऊड व्होटिंगमध्ये एक समाजाचा निष्कर्ष माहिती करून घेता येतो. वृत्तपत्राचा आलेख, म्युझिक आणि चित्रपट इत्यादीवर असलेले कॉमेंट्स किंवा निकालाचा यात समावेश आहे. याला क्राऊड सोर्सिंगचे सर्वात प्रचलित स्वरूप म्हणता येईल. यासाठी होव यांनी १:१०:८९चा सिद्धांत दिला आहे. तो १०० लोकांमध्ये असतो. याचा अर्थ असा की,
*१ टक्का लोक काही रचनात्मक तयार करतात.
*१० टक्के या विचाराशी सहमती दर्शवतात.
*८९ टक्के लोक या कृतीचा उपयोग करतात.
*१० टक्के लोकांसाठी मत आणि रेट कंटेंट ही सहमती मानली जाते. इंटरनेटवर अनेक मेकॅनिझम मतदानासाठी असतात. यात एखाद्या आलेखाची रेटिंग इत्यादी करू शकता. क्राऊड व्होटिंगचे उदाहरण रिअॅलिटी शोचे निकाल हेसुद्धा पाहता येतात.
३. क्राऊड विस्डम
एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा भविष्यातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी विस्डम ऑफ क्राऊड्सचा सिद्धांत लागू होतो. क्राऊड विस्डमच्या उदाहरणात बाजारातील भविष्याचा वेध घेतला जातो. जशी हॉलीवूड स्टॉक एक्स्चेंज किंवा सिम एक्स्चेंजमध्ये असते.
४. क्राऊड फंडिंग
यात कॉर्पोरेट संस्था लोकांना किंवा समूहांना अार्थिक मदत करत असतात आणि विकसनशील देशांत बाजारात फंडिंग कमी होत असते. किंवा एक पोर्टल असते, जे कर्ज देते. ते विकासशील देशाच्या बाजारात काम करणा-या नव्या आंत्रप्रिन्युअरला मदत करते. कारण त्या देशात त्यांना मदत करणारा कोणी नसतो. अशा प्रकारे सेलाबँड त्यांना मदत करतो. ते हॉलीवूडच्या मोठ्या लेबलद्वारे स्वीकारले जात नाही. क्राऊड सोर्सिंगचे तीन मॉडेल आहेत, जे फंड उभारण्यासाठी लागू केले जातात.
>डोनेशन मॉडेल :
या प्रारूपात लोक एखाद्या प्रकल्पात कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता अार्थिक मदत करतात.
>लेंडिंग मॉडेल :
यात गुंतवणूकदार प्रकल्पात कर्जाच्या रूपात पैसे लावतात. यात त्यांना पैसे परत कसे मिळतील याच्या अटी ठरलेल्या असतात.
>इन्व्हेस्टमेंट मॉडेल :या प्रकल्पात गुंतवणूकदार इक्विटी घेतो.
क्राऊड सोर्सिंगचे गुण-दोष
क्राऊड सोर्सिंगच्या प्रयोगामुळे कंपन्यांकडून आणि लोकांना योग्य फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर योग्य किमतीवर काम करू शकता. ज्या तज्ज्ञांना तुम्ही कामावर ठेवत आहात त्यांना योग्य रक्कम देऊ शकता. यात दोष इतकाच आहे की, क्राऊड सोर्सिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे काँट्रॅक्ट नसते. काम करणारे कधीही पळून जातात. तुमच्या कल्पनेचा वापर करून तो पुढे जाऊ शकतो. तरीसुद्धा मोठी आणि महत्त्वाची कामे कॉर्पोरेट ई- काॅमर्स इत्यादी विकसित करण्याची बाब असेल तर यात केवळ तज्ज्ञच नव्हे, तर मॅनेजमेंटची टीम तयार ठेवावी लागेल. यात अशा प्रकारच्या कल्पनेचा प्रयोग सावधगिरीने केला पाहिजे.