आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका, प्रशासन, युतीचे समीकरण बदलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही वर्षांतील घडामोडी पाहता, राजकारण कात टाकत आहे असे दिसते. मत मिळवणे, प्रशासन करण्यापासून सरकारविरोधात बंड कसे पुकारावे इथपर्यंत सर्व प्रक्रिया बदलली आहे. तीन घटनांवरून हे स्पष्ट होते. मतदारांचे विचार बदलले, हे दिल्लीतील आपच्या विजयाने स्पष्ट केले. सरकार क्रांतिकारी धोरणाकडे झुकते आहे, हे नोटबंदीवरून दिसले. तर याविरोधात ज्याप्रकारे विरोधक एकत्र आले आहेत, त्यावरून तरी सध्या एकजुटीची गरज बदलली आहे, असे म्हणता येईल. दिल्लीत आपचा विजय ही एक विसंगती होती, यात शंका नाही. कारण राजकारणाची पार्श्वभूमी किंवा वारसा नसणाऱ्या पक्षाचा जन्म झाला अन् दिल्लीतील जनतेनेही त्यांनाच संधी दिली. दिल्लीतील निवडणूक प्रचाराचे तंत्रही वैशिष्ट्यपूर्ण होते. यात मध्यमवर्गाला राजकारणात सक्रियतेने सहभागी होण्यास प्रेरित केले गेले. बंगळुरू आणि चेन्नईतील तरुण-तरुणींना पक्षात स्थान मिळाले. २०१५ च्या या निवडणुकीत या पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या. ‘नवा विचार’ या निकालात अधोरेखित केला गेला.
निवडणुकांप्रमाणेच प्रशासनातही बदल झाले. गेल्या अडीच वर्षात पंतप्रधानांनी विविध मोहिमांमधून आपली सक्रियता उमटवली. नोटबंदीच्या निर्णयाद्वारे त्यांनी जनतेकडून खूप अपेक्षा केल्या आहेत. या निर्णयामुळे त्यांना मोठा पराभव पत्करावा लागू शकतो. मात्र यामुळे प्रशासनाचे स्वरूपच बदलले. त्यामुळे धाडसी निर्णय हे प्रशासनाचे वैशिष्ट्य बनले आहे. याचप्रमाणे युती किंवा आघाडीचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी ही एकजूट विचारधारेच्या आधारे होत होती. मात्र गेल्या दोन वर्षात सत्ताधारी पक्षाचा तिरस्कार करण्याासाठी काही पक्ष एकत्र येत आहेत. राजद, जदयूपासून तृणमूल काँग्रेस, माकपपर्यंतचे सर्व पक्ष भाजपविरुद्ध एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकारणातील हा बदल जाणून त्यानुसार अनुकूलन साधणारेच आपली प्रतिमा टिकवून ठेवू शकतील.
ऋत्विका भट्टाचार्य, २८
सीईओ, स्वानीती इनिशिएटिव्ह
बातम्या आणखी आहेत...