आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्यग्रस्त स्थिती मान्य का करत नाही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक नैराश्यग्रस्त देशांमध्ये भारताचा समावेश आहे. ३६ टक्के भारतीय आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर गंभीर नैराश्याचा सामना करतात.

हा आजार मुंबईसारख्या शहरी भागात दर शंभर व्यक्तींपैकी तिघांमध्ये आढळतो, असा अंदाज आहे. या तिघांपैकी एक जण विक्षिप्ततेच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला असतो. आपण डेंग्यू, स्वाइन फ्लूवर चर्चा करतो, मात्र नैराश्याबाबत मौन का धारण करतो, हे कळत नाही.

मी नुकताच ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट पाहिला. त्यात २५ वर्षीय तरुणी नैराश्यात असल्याचे दर्शवले आहे. पण अनेकांच्या दृष्टीने तिच्याकडे सर्वकाही अाहे, फक्त काही गोष्टी स्वीकारून तिला पुढे जाण्याची गरज आहे. भौतिक सुखाशी नैराश्याचा संबंध नाही. केवळ नकारात्मक बाब टाळून हा आजार दूर करता येत नाही. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. हा एक मानसिक आजार असून त्याकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. मी एका लेखकाचे समीक्षण वाचले होते. त्यात त्यांनी आलिया भट्टचे नैराश्य सामान्य असल्याचे म्हटले होते. त्यांनी लिहिले होते की, या पिढीकडे सर्वकाही आहे, तरीही या तरुणांना नैराश्य का येते, हे कळत नाही. चित्रपटातील तरुणीचा प्रेमभंग झालेला असतो. त्यामुळे वचन-शपथांबाबत तिच्या मनात भीती असते. चित्रपटात ती ओरडून म्हणते, ‘हाँ मैं क्रेझी हूं और थेरपिस्ट के यहाँ जा रही हूं,’ हे दृश्य मला फार आवडले. कारण आपल्याकडे डॉक्टरांकडे जाणे म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारीच नाही तर पागल झाल्याचे समजले जाते.

भावी पिढी मोकळ्या वातावरणात वाढवली पाहिजे, असे केवळ बोलून उपयोग नाही. मुलांना कणखर बनवले पाहिजे. दीपिका पदुकोण, रॉबिन विल्यम्ससारखे लोक नैराश्यावर उघड बोलत आहेत, तर आपणही सुरुवात करायला हवी.
रीती बहल, २६
संस्थापक, लिटिल जार, मार्केटिंग हेड, नॅचरली जस्ट ब्यूटिफुल
बातम्या आणखी आहेत...