आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल वाॅरची ठिणगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारे जग डिजिटल हाेत असतानाच सायबर गुन्हेगारी, व्हायरस अाणि हॅकर्सनी जगभरातील युजर्सना वेठीस धरले अाहे. ‘याहू’च्या ५० काेटी युजर्सचा पर्सनल डाटा हॅकर्सनी ज्या पद्धतीने जाळे टाकून पळवला त्यापासून जगभरातील तमाम नेटकऱ्यांनी धडा घेण्याची गरज अाहे. याहूवरील ईमेल युजर्सचा जाे डाटा हॅक करण्यात अाला त्यानिमित्ताने जगभर ‘सरकार पुरस्कृत डिजिटल वाॅर’ची चर्चा सुरू झाली अाहे. किंबहुना या प्रकरणाकडे त्याच दृष्टिकाेनातून पाहिले जात असले तरी त्यातील नेमके तथ्य शाेधण्याचे काम अद्याप सुरू अाहे. २०१४ मध्ये काही रशियन हॅकर्सनी याहूूच्या डझनावारी ईमेलधारकांची वैयक्तिक माहिती हॅक केल्याचे याहूच्या तपासात निष्पन्न झाले हाेते. मात्र, ५० काेटी युजर्सची माहिती नेमकी त्यांनीच पळवली की नाही; याविषयी अजूनही संभ्रम अाहे.
तथापि, ‘टंबलर’वर टाकलेल्या पाेस्टमध्ये काेण्या ‘स्टेट स्पाॅन्सर्ड अॅक्टर’ने ही माहिती चाेरली असल्याचे याहूने म्हटले. ईमेल अकाउंटवरील वैयक्तिक माहिती चाेरली जात असल्याचा सुगावा याहूला वर्षभरापूर्वीच लागला; युजर्सशिवाय त्यांच्या मित्र, मैत्रिणींच्या, कुटुंबीयांच्यादेखील अकाउंटवरील डाटा हॅक केला जात हाेता. पीस नावाच्या एका हॅकरने याहू युुजर्सच्या लाॅगइन अाणि पासवर्ड डिटेल्सची अाॅनलाइन विक्री सुरू केली तेव्हा ही बाब उघडकीस अाली. अाता तर सुरक्षा अाणि तपास यंत्रणेशी संबंधित तज्ज्ञ, अधिकारीच सांगताहेत की, सरकार पुरस्कृत हॅकिंगचा काेणीही लक्ष्य ठरू शकताे. युजर्सच्या पर्सनल अकाउंटवरील माहिती मिळवणे ही अगदीच किरकाेळ बाब अाहे. हॅकर्स त्यापलीकडे पाेहाेचले असून पर्सनल ईमेलवरील पत्रव्यवहारदेखील अाॅनलाइन करत अाहेत.
सेलफाेन किंवा संगणकीय व्यवस्थेत ‘टाॅप सिक्रेट’ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही नव्याने विकसित हॅकिंग स्ट्रॅटेजीमुळे ते अशक्य ठरते अाहे. ‘स्टेट स्पाॅन्सर्ड हॅकर्स’नी अंथेम अाणि प्रेेमिरा ब्ल्यू क्राॅस या विमा कंपनीतील लक्षावधी लाेकांचे रेकाॅर्ड चाेरले; त्यात सामाजिक सुरक्षितता क्रमांक, अाराेग्यविषयक तपशील, जन्मतारीख, पत्ते, ईमेल, पासवर्ड, व्यवसाय-नाेकरी इत्यादीचा अंतर्भाव अाहे. एकंदरीत व्यक्ती म्हणून जी काही अाेळख असते ती सगळीच माहिती चाेरली. याशिवाय युनायटेड एअरलाइन्सच्या लक्षावधी प्रवाशांचा डाटा, अमेरिकेच्या पर्सनल मॅनेजमेंट कार्यालयातील फिंगरप्रिंट्स, सिक्युरिटी क्लिअरन्स रेकाॅर्डदेखील हॅकर्सनी चाेरल्याचे उघडकीस अाले. काही गुप्तचर यंत्रणा असा डाटा विकत घेतात अाणि त्यातील अन्याेन्य संबंध अाेळखून उपयुक्त तपासासाठी त्याचा वापर करतात. अमेरिकी गुप्तचर यंत्रणादेखील त्यास अपवाद नाही. कुठल्याही देशात हे घडू शकते. हॅकिंग अाणि व्हायरसचा वापर एखादा देश इतरांविरुद्ध करणारच नाही असे गृहीत धरायचे तरी कसे? एकंदरीत गांभीर्य लक्षात घेता संभाव्य विश्वयुद्ध माहितीचे हॅकिंग किंवा व्हायरसच्या माध्यमातून लढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संरक्षणच नव्हे तर सार्वजनिक अाणि प्रत्येक व्यक्तीचा डाटा सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मग हा डाटा व्हाॅट्सअॅपवरील असाे की फेसबुकवरचा. याहूवरील हॅकिंगच्या निमित्ताने पडलेल्या ठिणगीतून भविष्यात डिजिटल युद्ध सुरू झालेे तर व्हायरस अाणि हॅकर्स अण्वस्त्रांपेक्षाही शक्तिशाली ठरू शकतात. कारण या डाटाचा वापर काेण, कशा पद्धतीने कुठल्या कारणासाठी करेल याची संबंधितास कल्पना असणार नाही. देश काेणताही असाे अापल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयाेग हाेण्याची
भीती प्रत्येक नागरिकाला वाटत असते, तरीही प्रत्येक खासगी बाबींच्या ‘पब्लिक शेअरिंग’चा माेह काेणालाही अावरत नाही, हेदेखील तितकेच खरे.
विशेषत: भारताला ‘डिजिटल इंडिया’ बनवण्याचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न हाेत असताना सायबर गुन्हेगारी चिंताजनक पद्धतीने वाढत चालली अाहे. अापल्याकडेही प्रत्येक खासगी तपशील अाधार कार्डशी संलग्न केला जाताे ‘अाधार’ कार्डसाठी दिलेल्या माहितीचा गैरवापर हाेण्याची भीती जेव्हा नागरिकांनी व्यक्त केली त्या वेळी केंद्र सरकारला सर्वाेच्च न्यायालयात या माहितीचा गैरवापर करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागले हाेते. एकंदरीत काय तर गुप्ततेचा हक्क अाणि माहितीचा हक्क या एकाच नाण्याच्या दाेन बाजू अाहेत. ‘माहिती अधिकाराचा’ हक्क नागरिकांना मिळाला अाहे, तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणावरून जर सरकारने नागरिकांकडे चाैकशी केली तर त्यात वावगे वाटायला नकाे. मात्र, सरकारनेदेखील कायद्याची चाैकट माेडायला नकाे. अमेरिकेत विचारस्वातंत्र्य अाणि विचार व्यक्त केल्यानंतरचे स्वातंत्र्य दाेन्हीही बाबी ठळकपणे दिसतात; अापल्याकडे ते अाहे का, असे मानणाऱ्यांचे परस्परविराेधी गट अाहेत हे निश्चित.
बातम्या आणखी आहेत...