आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांची आयुष्यभराची प्रतिष्ठा पणाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत संपूर्ण अमेरिकेला प्रदक्षिणा मारली. फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना, नेवादा, कोलेरॅडो, आयोव्हा, मिशिगन, विस्कॉन्सिन, पेन्सिलव्हेनिया, न्यू हॅम्पशायर आणि मिनिसोटाला भेट दिली. जास्तीत जास्त लोकांशी भेटले. यापूर्वी त्यांनी असे कधीच केले नव्हते. त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रचार तंत्रातूनच ही निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.
तरीही त्यांच्या विजयाबाबत अद्याप साशंकताच आहे. याउलट हिलरी क्लिंटन यांचे भविष्यातील चित्र स्पष्ट आहे. अनेक राज्यांत त्यांना फायदा होऊ शकतो. त्यांना कमीत कमी २७० जागा मिळू शकतात. मात्र जनमताच्या कौलानुसार, ट्रम्प यांना १३० जागा मिळू शकतील. १०० जागा
उमेदवाराचे भविष्य ठरवणाऱ्या असतील. ट्रम्प यांचा सपशेल पराभव होईल असेही नाही. एरिझोना, आयोव्हा, ओहायो, उटा, नॉर्थ कॅरोलिना, फ्लोरिडा, न्यू हॅम्पशायरसारख्या राज्यात त्यांच्या पक्षाला विजय मिळू शकतो.
बातम्या आणखी आहेत...