आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायब्राॅइड्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फायब्राॅइडसला लियाेमॅमास वा मॅमास ही म्हटले जाते. कारण ते गर्भाशयामधील स्मूथ मस्कूलर टिश्यूपासून (मॅमेट्रियम) तयार होतात. हे लहान बीजाच्या आकाराचे असतात. साधारणत: ते नजरेस येत नाहीत, पण अनेकदा खूप मोठे होतात. यामुळे गर्भाशय वाढते वा यामुळे मॅन्सुरल ब्लीडिंग अधिक होते. हे टिश्यू एकाऐवजी अनेक असू शकतात. ते हळूहळू वा मग वेगाने वाढू शकतात. ते एकाच आकाराचे असू शकतात.
फायब्राॅइड कर्करोगात रूपांतरित होऊ शकतात, पण त्याचे प्रमाण एक टक्का इतके आहे. फायब्राॅइड्सची वाढ वेगाने होत असेल, तर तपासणी करायला हवी. याची लक्षणे दिसत नसल्याने बहुतांश महिला याविषयी जागरूक नसतात. मॅन्स्ट्रूअल ब्लीडिंग वाढल्यावर फायब्राॅइड्सची लक्षणे असल्याचे लक्षात येते.
मॅन्स्ट्रुअल ब्लीडिंग बराच काळ सुरू राहते. त्यामुळे शरीरात खालच्या बाजूला
(पेल्व्हिक रिजन) वेदना होतात व वारंवार लघवी येते. याशिवाय महिलांमध्ये आंबट ढेकर, कंबरेत वेदना व अशक्तपणाच्या
तक्रारींचे प्रमाण वाढते. शरीरात हे नेमके कोठे आहे, त्यांचा आकार व संख्या किती आहे, यावर फायब्राॅइड्सची लक्षणे ठरतात. तीन प्रकारचे फायब्राॅइड्स असतात.
१) सबम्युकोसल फायब्राॅइड्स : हे गर्भाशयामध्ये युटरिनच्या लायनिंगमुळे कॅविटीमध्ये तयार होणारे फायब्राॅइड्स असतात. बराच काळ राहिल्यामुळे खूप ब्लीडिंग होते. अनेकदा गर्भवतीला त्रासदायक ठरतात.
२) सबसॅरोसल फायब्राॅइड्स : गर्भाशयाच्या बाह्य भागात आढळणा-या या फायब्राॅइड्सला सबसॅरोसल फायब्राॅइड म्हटले जाते. अनकेदा युरिनरी ब्लॅडरवर त्याचा दाब पडण्यामुळे वारंवार लघवी लागते. जड आणि गर्भाशयाच्या मागील भागात असणा-या फायब्राॅइडमुळे रेक्टमवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे मणक्याची नस दुखावली जाऊ शकते वा कंबरेत वेदना होऊ शकतात.
३) इंट्राम्युरल फायब्राॅइड्स : गर्भाशयामधील मांसपेशींच्या भिंतीवर असणा-या फायब्राॅइड्सला इंट्राम्युरल फायब्राॅइड्स असे म्हणतात. आकाराने मोठे असलेल्या फायब्राॅइड्समुळे गर्भाशयाचा आकार खराब होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळीचा कालावधी वाढून वेदनाही होतात.
फायब्राॅइड्स का होतात?
हे महिलांमध्ये गर्भधारणेच्या काळात होतात. त्याचे नेमके कारण माहित नसले तरी संशोधन असे सांगते...
जेनेटिक बदल : अनेक फायब्राॅइड्स गुणसूत्रांमधील बदलांमुळे होते. ते सामान्य युटेराइन मसल्स सेल्सपेक्षा वेगळे असतात. कुटुंबातील सर्वच महिलांना फायब्राॅइड्स असल्याचीही उदाहरणे आहे. हार्मोन्स अॅस्ट्रोजन व प्रोजेस्टिराॅन हे दोन हार्मोन्स युटरिनच्या आतील भागात मासिक पाळीच्या वेळी असे
बदल करतात. यातच फायब्राॅइडसची वाढ होते, असे मानले जाते. त्यात अॅस्ट्रोजन व प्रोजेस्टिराॅन मोठ्या संख्येने असतात. मेनाेपाॅजनंतर हार्मोन्सची निर्मिती थांबल्यामुळे हे फायब्राॅइड्स आकुंचन पावतात.
वाढीची अन्य कारणे
मांसाहार, दारू, हिरव्या पालेभाज्या तसेच फळे कमी खाण्यामुळे फायब्राॅइडसची वाढ होते.
फायब्राॅइड्स व फर्टिलिटी : साधारणत: फायब्राॅइड्स गर्भधारणा होण्यात अडथळे निर्माण करत नाही, तरीही गर्भ न राहणे वा प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता कायम राहते. सबम्युकोसल फायब्राॅइड्स गर्भ राहू देत नाही वा अनेकदा गर्भपात होतो. अशा प्रकरणात डाॅक्टर फायब्राॅइड्स काढून टाकण्याचा सल्ला देतात. फायब्राॅइड्समुळे फॅलोपियन ट्यूब ब्लाॅक झाली आहे वा त्यात काही अडथळे निर्माण झाले आहेत, असे खूप कमी पाहण्यात आहे.
अशी करा तपासणी
पेल्व्हिक रिजनच्या सोनोग्राफीमुळे फायब्राॅइड्सचे निदान करता येते. ज्या रुग्णांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त ब्लीडिंग होते, त्यांचा कंप्लिट ब्लड काउंट (सीबीसी) जाणून घेण्यास सांगितले जाते. याद्वारे अॅनिमिया तर नाही ना याचीही तपासणी होते.
याशिवाय अन्य टेस्ट असतात.
याद्वारे थायराॅइडचीही शक्यता तपासली जाते. पुष्कळ वेळा सबम्युकोसल फायब्राॅइडसच्या बाबतीत स्टिरिओस्कोपी करण्यास सांगितले जाते, तर कधी कधी एमआरआय (मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग) करण्याचाही सल्ला दिला जातो. स्टिरिओस्कोपीमध्ये एक सलाइन गर्भाशयामध्ये इंजेक्ट केली जाते. त्याद्वारे ते उघडता येते आणि गर्भाशयाची तपासणी होते.
घ्यावयाची काळजी
पुष्कळ वेळा महिलांचे फायब्रॉइड्स इतके लहान असतात की, याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.
उपचार : यावर उपचार केल्याने मासिक पाळीशी संबंधित हार्मोन्स नियंत्रित राहतात. अशा प्रकारच्या उपचारातून फायब्रॉइड्सना नष्ट तर करता येत नाही, पण त्यांना आकुंचित करता येते. हार्मोन्स (जीएन-आरएच) रिलीज करण्यासाठी गोनाडोट्रॉपिन हे औषध दिले जाते.
यामुळे अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिरॉन हार्मोन्सचे उत्पादन थांबते. परिणामी, अस्थायी स्वरूपात मेनोपॉजनंतरची स्थिती काही काळापर्यंत तशीच राहते. याच काळात मासिक चक्र थांबते, फायब्राॅइड्स आकुंचन पावतात व अॅनिमियाच्या स्थितीत सुधारणा होतात, पण हा अस्थायी उपचार आहे. इतर गोळ्यांचेही उपचार आहेत. पण त्यामुळे फायब्राॅइड्सचा आकार कमी होत नाही. वेदनेपासून सुटका व्हावी यासाठी नाॅनस्टरोडियल अँटी इंफ्लेमेटरी ड्रग्जचे उपचारही आहेत.
सर्जरीशिवायही दूर होतात
एमआरआयच्या मदतीने करण्यात येणा-या उपचारातही सर्जरीची गरज नसते. त्यात कुठेही कापावे लागत नाही. ध्वनी लहरींनी
फायब्राॅइड्सला लहान लहान टिश्यूत रूपांतरित करतात, पण पैसा खूप लागत असल्याने याचा प्रयोग अभावानेच हाेतो.
लहान सर्जरीद्वारे
काही प्रक्रिया युटेराइनच्या फायब्राॅइड्सला दूर करतात. त्यात अॅम्बोलिक एजंट्सना गर्भाशयाच्या सप्लाय आरटीमध्ये इंजेक्ट केले जाते. यामुळे पुरवठा बंद होतो. त्यामुळे ते एकतर आकुंचन पावतात वा नष्ट होतात. ओव्हरीज आणि अन्य अंगांमध्ये रक्त पुरवठा न होण्यामुळे काही जटिल समस्या उद््भवू शकतात, तरीही फायब्राॅइड्सच्या सर्जरीमध्ये अजूनही लॅप्रोस्कोपिक मॅक्टामीचेच चलन आहे. यात पोटात तीन- चार लहान लहान छिद्रांतून दुर्बिणीद्वारे आॅपरेशन
करता येऊ शकते. या उपकरणात लागलेला कॅमेरा पोटाच्या आतील अवस्था दाखवतो. काही वेळा गर्भाशय काढण्याचे वा स्ट्रकटाॅमीचे आॅपरेशन करण्यात येते.