Home »Editorial »Columns» Article On Gender Discremenation In Silicon Valley

सिलिकॉन व्हॅलीलाही महिलांच्या प्रगतीचे वावडे

दिव्‍य मराठी | Apr 21, 2017, 03:00 AM IST

  • सिलिकॉन व्हॅलीलाही महिलांच्या प्रगतीचे वावडे
अमेरिकेतील उबेर टॅक्सी सेवेविरोधात कंपनीतील माजी कर्मचाऱ्याने तक्रार केली आहे. कंपनीत पात्र महिलांना पदोन्नती दिली जात नाही तसेच महिला हिंसाचाराच्या तक्रारीदेखील गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, अशी या महिलेची तक्रार आहे. महिलांकडून भेदभाव होण्याचे आरोप उबेरप्रमाणेच गुगलसारख्या दिग्गज कंपनीवरही होतात. अमेरिकेतील कामगार विभागाने गुगलवर पुरुषांपेक्षा महिलांना कमी वेतन दिल्याचा आरोप केला आहे. गुगलने हा आरोप फेटाळला असला तरी तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषत: सिलिकॉन व्हॅलीत हा दोष नक्कीच आहे.
व्हॅलीत २१० महिलांच्या सर्वेक्षणानुसार, ६० टक्के महिला गैरवर्तणुकीला सामोऱ्या गेल्या आहेत. दोनतृतीयांश महिलांनी महत्त्वाच्या संधींपासून आपल्याला वंचित ठेवल्याचे म्हटले. पेस्केल या रिसर्च फर्मच्या मते, अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात केवळ २१ टक्के एक्झिक्युटिव्ह महिला आहेत. अन्य क्षेत्रात हे प्रमाण ३६ टक्के आहे. अनुभव, शिक्षण आणि जबाबदार पदे निभावणाऱ्या महिलांचेही वेतन कमी आहे. या समस्या केवळ सिलिकॉन व्हॅलीतच आहेत, असे नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितासारख्या अभ्यासक्रमांना मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण घसरले आहे. अमेरिकेत २०१३ मध्ये केवळ १८ टक्के महिलांनी कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. १९८५ च्या तुलनेत ३७ टक्क्यांची ही घसरण आहे. वेतनातही अशीच तफावत आहे.
व्हेंचर कॅपटॅलिस्ट म्हणजेच जोखीम घेऊन नव्या प्रकल्पांत गुंतवणूक करणारे लोक हे तंत्रज्ञान उद्योगासाठी देवासमान असतात. आपल्या प्रभावाद्वारे कोणती स्टार्टअप यशस्वी होते किंवा कोणती नाही, हे ते ठरवत असतात. या लोकांमध्ये बहुतांश पुरुष आहेत. व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये सुमारे ६ टक्के महिला सभासद आहेत. १९९९ मध्ये त्या १० टक्के होत्या. पहिल्या १०० व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये गुंतवणुकीची जबाबदारी देण्यात आलेल्या महिला ४० टक्क्यांहून कमी आहेत.
बाजारातील तत्त्वानुसार, सर्वोत्कृष्ट संकल्पनांवर पैसा लावला जावा. मग ती पुरुषाची असो वा महिलेची. पण प्रत्यक्षात आकडेवारी वेगळीच आहे. ब्लूमबर्गच्या संशोधनानुसार, अमेरिकेत २ कोटी डॉलर किंवा त्याहून उलाढाल असलेल्या स्टार्टअपच्या संस्थापकांमध्ये ७ टक्केच महिला आहेत. दहा पैकी नऊ वेळाच पुरुष उत्तम संस्थापक असल्याचे सिद्ध झाले आहे. महिलांनी स्थापन केलेल्या फर्मला (७.७० कोटी डॉलर) पुरुषांच्या तुलनेत (१० कोटी डॉलर) कमी फंडिंग मिळते. बदलाचा दबाव झुगारून देण्यात व्हेंचर कॅपिटल इंडस्ट्री यशस्वी ठरली आहे.
अनेक अध्ययनांतून हे सिद्ध झाले आहे की, लैंगिक वैविध्य असलेली टीम अधिक यशस्वी असते. व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये जास्त संख्येने महिला असल्यास आतापर्यंत दूर असलेल्या महिला उद्योजकांकडून फंडिंग मिळू शकते. स्टार्टअप संस्कृतीला आकार देण्यात व्हेंचर कॅपिटल महत्त्वाची भूमिका बजावतात. सिलिकॉन व्हॅलीला अत्यंत असामान्य, विलक्षण महत्त्व आहे. मात्र, येथील पुरुषांनी आता परिपक्व होण्याची वेळ आली आहे.

Next Article

Recommended