आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचा आणखी एक स्मार्ट पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगलची अँड्राइड ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांची जगभरातील संख्या एक अब्ज २० कोटी आहे. आणि एक अब्ज २० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या केवळ १० कोटी आहे. गुगलला आपला ग्राहक अधिक वाढवायचा आहे व त्या पद्धतीने या कंपनीने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या या मोबाइलच्या बाजारपेठेत मायक्रोमॅक्स, कार्बन, स्पाइस, अँडी, लाव्हा, झोलो, शिओमी, मोटोरोला, सॅमसंग अशा देशी-विदेशी मोबाइल कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ही बाजारपेठ इतकी िचघळली
आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञान जेवढे स्वस्त देता येईल, तेवढे प्रयत्न या कंपन्यांकडून सुरू आहेत. बाजारपेठेत अशी परिस्थिती आहे की काही कंपन्यांना हाताशी घेऊनही आपल्या धंद्याचा विस्तार करता येतो.
सोमवारी गुगलने भारतीय बाजारपेठेत उतरवलेला अँड्रॉइड वन स्मार्टफोन हा मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाइस या कंपन्यांच्या भागीदारीतून तयार झालेला आहे. या फोनची िकंमत सहा हजार रुपयांच्या वर असून या फोनच्या माध्यमातून गुगल आपल्या अँड्राॅइड ऑपरेटिंग सिस्टिमचा प्रसार भारतातील तळागाळातील जनतेपर्यंत
करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच गुगल या प्रयत्नातून देशातील विविध मोबाइल कंपन्या, मोबाइलमधील सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या छोट्या कंपन्या व फोनमधील अॅप्लिकेशन यांना एका छत्राखाली आणून एक नवी बाजारपेठ तयार करत आहे. या बाजारपेठेमुळे ग्राहकांना स्वस्त दरात फोन िमळतीलच; पण इंटरनेटच्या प्रसारामुळे ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावत जाऊन ग्रामीण जनतेलाही माहिती तंत्रज्ञानाच्या लाटेत अधिक सामावून घेता येईल, असा गुगलचा दावा आहे. गुगलने इंटरनेटशिवाय यूट्यूबची सेवाही ग्राहकांना देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत अँड्रॉइडमुळे देशातील स्मार्टफोनची बाजारपेठ विस्तारली होती
व ग्राहकांना गुगल मॅप्स, गुगल क्रोम अशा बहुपयोगी सेवा िमळाल्या होत्या. ग्राहकाला या सेवा देताना देशी कंपन्यांनी अँड्राॅइडच्या माध्यमातून सॅमसंगसारख्या विदेशी कंपन्यांचा सामना केला होता. ही पार्श्वभूमी गुगलला लक्षात घ्यावी लागल्याने त्यांनी आपल्या भागीदारीत सॅमसंगला सामावून घेतले नाही, यामध्ये नव्या स्पर्धेचे स्वरूप लक्षात येते.