आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Hindu Family Adoption Law By Sunita Khariwal

हिंदू कुटुंबात दत्तक घेण्यासाठीचे कायदे खूप गुंतागुंतीचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दत्तक प्रक्रियेत मुलाला त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांपासून घेऊन जे दत्तक घेऊ इच्छितात त्यांच्याकडे सोपवले जाते. दत्तक विधानाची पद्धत फक्त हिंदू परंपरेमध्येच आहे. आपला वंश वाढावा आणि आपले श्राद्ध करणारे कोणीतरी असावे, ही दोन कारणे सांगितली जातात. मुलगा आपल्या पूर्वजांना नरकात जाण्यापासून वाचवतो, अशी धारणा आहे. हिंदू म्हणजे धर्माने हिंदू. यात वीरशैव, लिंगायत, ब्राह्मो, प्रार्थना किंवा आर्य समाज किंवा बौद्ध, जैन व शीख येतात. जे मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन व यहुदी नाहीत, तेही हिंदू मानले जातात. यात हिंदू, बौद्ध, जैन वा शीख धर्मातील आईवडिलांच्या औरस आणि अनौरस संततीचाही समावेश आहे. मुलगा असो वा मुलगी, दत्तक म्हणून कोणालाही घेता येते. पुरुष वा स्त्री यापैकी कोणीही दत्तक घेऊ शकते. त्याला किंवा तिला दत्तक मुलाचे पालनपोषण करण्याची क्षमता आणि अधिकार असावा लागतो.

दत्तक घेणारा पुरुष असेल तर...
* त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन चांगले असावे आणि सज्ञान असावा.
* जर तो विवाहित असेल तर त्याच्या पत्नीची दत्तक घेण्यास सहमती असली पाहिजे. जर ती बेपर्वा असेल किंवा तिने हिंदू धर्माचा त्याग केलेला असेल किंवा तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सिद्ध झाले असेल तर तिच्या परवानगीची गरज नाही.
* जर मुलगी दत्तक घ्यायची असेल तर दत्तक घेणा-या पित्याचे वय मुलीपेक्षा कमीत कमी २१ पेक्षा जास्त असावे.
दत्तक घेणारी महिला असेल तर...
* तिचे मानसिक संतुलन चांगले असावे आणि ती सज्ञान असावी.
* जर अविवाहित असेल तर आणि विवाहित आहे तर तिच्या पतीचे निधन झाले असेल किंवा घटस्फोटिता असेल किंवा पतीने संन्यास घेतलेला असेल वा हिंदू धर्माचा त्याग केलेला असेल अथवा तिचे मानसिक संतुलन ढळलेले आहे असे सिद्ध झाले असेल.
* जर मुलगा दत्तक घ्यायचा असेल तर आईचे वय त्याच्यापेक्षा २१ वर्षे मोठी असणे अनिवार्य आहे.
* महिला विवाहित असेल तर पतीलाच दत्तक घेण्याचा अधिकार असतो. मात्र, त्यात पत्नीची स्वीकृती असणे गरजेचे आहे.

दत्तक घेण्यासाठी या अटीसुद्धा
दत्तक घेताना आई-वडिलांचा जीवित किंवा दत्तक मुलगा, नातू किंवा पणतू असू नये. अशा प्रकारे जर एखाद्या मुलीला दत्तक घेतले जात असेल, तर दत्तक घेणा-या मातापित्यांची जीवित किंवा दत्तक मुलगी नसेल किंवा तिच्या मुलाची मुलगी दत्तक घेताना असू नये. दत्तक घेण्याची प्रक्रिया जन्मदात्या माता-पित्याची संतती दिल्यानंतर आणि दत्तक घेणा-या मातापित्यांनी ती घेतल्यानंतर पूर्ण होते.
दत्तक कोणाला देता येते?
* ज्या व्यक्तीला एखादी मुलगी किंवा मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार आहे, तर त्याला खालील नियमांचे पालन करावे लागेल.
* माता-पिता किंवा पालकाव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती एखाद्या मुलीला दत्तक देऊ शकत नाही.
* जर वडील असतील तर मुलास दत्तक घेण्याचा त्यांनाच अधिकार आहे, परंतु हा अधिकार आईच्या सहमतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जर आईचे निधन झाले असेल किंवा हिंदू धर्म सोडला असेल, तर तिच्या स्वीकृतीची गरज नाही.
* वडिलांचे निधन झाले असेल किंवा त्यांनी संन्यास घेतला असेल किंवा त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असेल वा हिंदू धर्म सोडला असेल, तरच आई आपले मूल दत्तक देऊ शकते.
* माता-पिता या दोघांचेही निधन झाले असेल तर किंवा त्यांनी संन्यास घेतला असेल किंवा मुलांचा त्याग केलेला असेल, दोघांचेही मानसिक संतुलन ठीक नसेल किंवा मुलांच्या आईवडिलांचा ठावठिकाणा माहिती नसेल तर त्या मुलांचा पालक दत्तक देऊ शकतो. यासाठी कोर्टाची परवानगी आवश्यक आहे. न्यायालय दत्तक देण्यापूर्वी मुलांच्या भल्यासाठीच दत्तक दिले जात आहे ना, याची खात्री करून घेईल. न्यायालय मुलाचे वय आणि त्याची क्षमता पाहून त्याची इच्छाही लक्षात घेईल.
दत्तक घेणारा कायदेशीररीत्या सक्षम असावा- एका मुलास एका वेळी एकच माता-पिता दत्तक घेऊ शकतात. ज्या कुटुंबात त्याचा जन्म झाला आहे, तेथून त्याचे हस्तांतरण होते.
फक्त यांनाच दत्तक घेता येते
* तो हिंदू असला पाहिजे
* याआधी कोणाला दत्तक गेलेला नसावा
* दत्तक गेलेल्या मुलाचे वय १५ वर्षांहून अधिक नसावे
* तो अविवाहित असावा
* जर दत्तक जाणारा मुलगा विवाहित असेल तर त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणेच त्याला दत्तक जाता येते, अन्यथा नाही.

दत्तक घेण्याचा परिणाम
एका दत्तक मुलाला अथवा मुलीला दत्तक घेणारेच दत्तक विधानाच्या तारखेपासून त्यांचे आई-वडील मानले जातील. दत्तक घेण्याच्या तारखेपासून मुलगा कायदेशीररीत्या आईवडिलांजवळ राहतो. तेच त्याचे कायदेशीर पालक असतात. अशा तऱ्हेने तो कुटुंबातील सर्व लाभांचा हकदार असतो. दत्तक गेलेला मुलगा त्याच्या जन्मदात्या आईवडिलांच्या कुटुंबातील समस्त कायदेशीर लाभ घेऊ शकत नाही. जन्मदात्या आईवडिलांची संपत्ती वा वारसा हक्कात त्याचा हिस्सा नसतो, तरीही दत्तक जाण्यापूर्वी मुलाच्या नावावर असलेली संपत्ती दत्तक गेल्यावरही त्याच्या नावावर राहील. मात्र, त्याच्यावर काही जबाबदारी सोपवलेली असल्यास त्याचे पालन त्याला करावे लागेल. उदाहरणार्थ, दत्तक गेलेल्या मुलावर त्याच्या आजीची जबाबदारी असेल, तर त्याचे पालन त्याला करावे लागेल.