आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठेकेदारांच्या मक्तेदारीला लगाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेत मिळणारे बेचव व दर्जाहीन जेवण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. विशेषत: लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणा-या प्रवाशांना रेल्वेतल्या निकृष्ट जेवणावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नसतो. अस्वच्छ पँट्री, उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ, जेवणात अळ्या असणे किंवा शिळे किंवा बुरशीजन्य पदार्थ मिळाल्याचे अनुभवही प्रवाशांना आलेले आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी आता रेल्वे सरसावली आहे.
रेल्वेने आता प्रवाशांना ई-केटरिंग सेवेद्वारे इंटरनेट अथवा फोनवरून खासगी हॉटेलकडे अन्नपदार्थ मागण्याची सुविधा दिली आहे. हा प्रयोग पश्चिम रेल्वे विभागात मुंबई-दिल्ली मार्गावर राबवण्याचा रेल्वेचा प्रयत्न असून या प्रयोगाला प्रवाशांची पसंती मिळाल्यास कालांतराने तो अन्य मार्गावर राबवण्याचा रेल्वेचा विचार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आपल्या प्रवासाची तारीख व वेळ, पीएनआर क्रमांक, प्रवासाचा मार्ग, कोणत्या रेस्टॉरंटला ऑर्डर द्यायची याची माहिती किमान एक तास अगोदर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ला द्यावी लागणार आहे. या सेवेमुळे एक स्पर्धा निर्माण होऊन प्रवाशांना उत्कृष्ट प्रतीचे जेवण मिळू शकेल. आंतरराज्यातून प्रवास करताना, आपल्याला आवडणारे, हवे असलेले खाद्यपदार्थही सहजपणे उपलब्ध होतील. दक्षिणेच्या प्रवाशाला केवळ उत्तरेतील जेवणावर अवलंबून राहता येणार नाही तसेच अन्य प्रांतातल्या प्रवाशाला स्वत:च्या प्रांताचे जेवण मिळू शकेल.
या सेवेमुळे रेल्वेने नेमलेल्या खासगी ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत निघेल, शिवाय खासगी उपाहारगृह असलेल्या व्यावसायिकांना नवा ग्राहक वर्ग मिळू शकतो. त्यांच्यावरही जेवणाचा दर्जा उत्तम ठेवण्याची जबाबदारी पडणार आहे. हा प्रयोग राबवताना त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार, हा एक प्रश्न आहे. कारण रेल्वे प्रवासाचे वेळापत्रक ही मोठी समस्या आहे. पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा अपघातामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडू शकते तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर धावत नसतात. अशा वेळी प्रवाशांना ही सुविधा कशी उपलब्ध होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण ही सेवा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर अडचणीही लक्षात येतील